शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

७३ महिला खासदारांसाठी एकच स्वच्छतागृह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 04:47 IST

जपान सध्या एका अतिशय वेगळ्याच कारणानं गाजतं आहे आणि त्यावरून अख्खं जग आश्चर्यचकित झालं आहे.

जपान सध्या एका अतिशय वेगळ्याच कारणानं गाजतं आहे आणि त्यावरून अख्खं जग आश्चर्यचकित झालं आहे. सोशल मीडियावर तर त्यावरून चर्चेचं मोहोळ उठलं आहे. जपानी संसदेत ७३ महिला खासदार आहेत. पण त्यांच्यासाठी किती स्वच्छतागृहे (टॉयलेट्स )असावीत? - फक्त एक ! जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यादेखील यामुळे त्रस्त झाल्या आहेत आणि खुद्द पंतप्रधानांनीच संसद भवनात महिलांसाठी जास्त शौचालयं बांधण्याची मागणी केली आहे. जवळपास ६० महिला खासदारांनी यासंदर्भात एक याचिका सादर केली आहे. याचिकेत म्हटलं आहे की संसदेत महिलांची संख्या वाढली आहे, पण त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत. सध्या संसदेतील खालच्या सभागृहात ७३ महिला खासदार आहेत, पण त्यांच्यासाठी फक्त एकच टॉयलेट आहे! विरोधी डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदार यासुको कोमियामा म्हणाल्या की, संसद सत्र सुरू असताना महिला खासदारांना अनेकदा टॉयलेटबाहेर लांबलचक रांगेत उभं राहावं लागतं.

जपानचं संसद भवन (डायट) १९३६ मध्ये उभारलं गेलं, त्यावेळी देशात महिलांना मतदानाचा अधिकारच नव्हता. त्यामुळे त्यावेळी महिला टॉयलेटचा विचारच केला गेला नाही. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यानंतर डिसेंबर १९४५ मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. त्यानंतर एक वर्षानं म्हणजे १९४६ मध्ये झालेल्या निवडणुकीत महिला खासदार संसदेत निवडून आल्या.जपानी वृत्तपत्र योमियुरी शिंबुननुसार, खालच्या सभागृहाच्या इमारतीत पुरुषांसाठी १२ टॉयलेट (६७ स्टॉल्स) आहेत, तर महिलांसाठी फक्त ९ टॉयलेट असून, त्यात एकूण २२ क्युबिकल्स आहेत.

मुख्य प्लेनरी सेशन हॉलमध्ये; जिथं संसदेचं कामकाज चालतं, तिथे महिलांसाठी फक्त एकच टॉयलेट आहे. सेशन सुरू होण्यापूर्वी अनेकदा रांग इतकी वाढते की महिला खासदारांना बिल्डिंगच्या दुसऱ्या भागात बाथरूमसाठी जावं लागतं. याउलट पुरुष खासदारांसाठी एकमेकांच्या जवळच अनेक टॉयलेट्स आहेत. त्यांना अशा अडचणींना सामोरं जावं लागत नाही. जपानचं संसद भवन टोक्योमध्ये आहे. याचं बांधकाम १९३६ मध्ये झालं. त्या काळात राजकारणात महिलांचा सहभाग जवळपास नगण्यच होता. 

जपान प्रगत देशांमध्ये गणला जात असला, तरी महिलांच्या बाबतीत अनेक गोष्टींत त्यांचे विचार पारंपरिकच आहेत. त्यामुळेच ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये त्यांचं रँकिंग दरवर्षी बरंच खाली असतं. यावर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये जपान १४८ देशांमध्ये ११८ व्या स्थानावर राहिला. राजकारणासह इतरही अनेक गोष्टींमध्ये  महिलांचा सहभाग पुरुषांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. स्वत:चा व्यवसाय चालवणाऱ्या महिला जपानमध्ये अतिशय कमी आहे. माध्यमांमधला त्यांचा सहभागही कमीच आहे. 

निवडणुकीदरम्यान महिला उमेदवार सांगतात की, त्यांना अनेकदा लैंगिकतावादी (सेक्सिस्ट) टिप्पण्यांचा सामना करावा लागतो. त्यांना नाउमेद केलं जातं, त्यांची खिल्ली उडवली जाते. ‘राजकारणात तुमचं काय काम? राजकारणात येण्यापेक्षा बायकांनी लग्न करून मुलं जन्माला घालावीत आणि मुलं, आपलं घर-संसार सांभाळावा’, असे उपरोधिक सल्ले तर त्यांना कायमच ऐकावे लागतात. जपानमध्ये सध्या खालच्या सभागृहात ४६५ खासदारांपैकी ७३ महिला आहेत. मागच्या संसदेत हा आकडा ४५ होता. वरच्या सभागृहात २४८ पैकी ७४ सदस्य महिला आहेत. सरकारचं ध्येय आहे की संसदेच्या किमान ३० टक्के जागांवर महिला असाव्यात. 

English
हिंदी सारांश
Web Title : One Toilet for 73 Female MPs: Shocking Reality in Japan

Web Summary : Japan's parliament has only one toilet for 73 female MPs, sparking outrage. Built when women lacked voting rights, facilities are inadequate. Prime Minister seeks more toilets amidst gender inequality concerns, highlighted by a low Global Gender Gap ranking.
टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीJapanजपान