शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

मुख्यमंत्र्यांच्या कन्येविरुद्ध एक हजार शेतकरी लढणार निवडणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 9:34 AM

लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा करणा-या सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

- धर्मराज हल्लाळेलोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा करणा-या सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या कविता या निजामाबाद मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांच्याच मतदारसंघात हळदी आणि ज्वारीच्या किमान आधारभूत किमतीसाठी एक हजार शेतकरी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक गावातून पाच शेतक-यांनी अर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात तेलंगणा सरकारने शेतकरी हिताच्या महत्त्वपूर्ण योजना समोर आणल्या. रयतू बंधू अर्थात शेतकरी मित्र ही त्यांचीच योजना वर्षामध्ये दोन वेळा प्रत्येक शेतक-याला चार हजार प्रमाणे एकूण आठ हजार रुपये बी-बियाणे व खते खरेदीसाठी मिळणार आहेत. मोदी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर शेतक-यांना दोन हजार रुपये देऊ केले. याउलट तेलंगणाने मे २०१८ पासूनच ही योजना अंमलात आणली आहे. परंतु शेतमालाला हमीभाव मिळाला नसल्याने शेतक-यांमध्ये असंतोष असल्याचे निजामाबादमध्ये दिसून येत आहे. विशेषत: हळदी उत्पादक शेतकरी नाराज आहेत. एकरी दीड लाख रुपये खर्च केला. त्या मोबदल्यात २० क्विंटल उत्पादन निघाले अन् त्याला चार ते पाच हजार रुपये भाव मिळाला. अर्थात उत्पादन खर्चही निघाला नाही. हमीभाव आणि लाभ तर दूरच; अशा स्थितीत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुलीच्या मतदारसंघात हजारो शेतक-यांनी उमेदवारी दाखल करून सरकारला कोंडीत पकडण्याचा निर्धार केला आहे. शेतकरी हितासह अनेक लोकाभिमुख निर्णयांमुळे केसीआर यांना दुस-यांदा राज्यात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करता आले. २०१४ च्या तुलनेत यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६३ जागांवरून टीआरएस ८८ जागांवर पोहोचली. शिवाय १७ पैकी ११ मतदारसंघात टीआरएसचे खासदार निवडून आले होते. एकंदर टीआरएसचा राज्यात प्रभाव आहे़ काही मतदारसंघात काँग्रेस जोरदार लढत देईल. फेब्रुवारी महिन्यातच तेलंगणातील निजामाबादमध्ये शेतक-यांचे मोठे आंदोलन झाले होते. ज्वारीला साडेतीन हजार आणि हळदीला पंधरा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र सध्या जे भाव मिळाले त्यात खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतक-यांनीच हजारोंच्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार करणे, हे एक मोठे आव्हान आहे. प्रत्यक्षात हे घडले तर देशातील लक्षवेधी लढाई निजामाबादची असेल. हजार उमेदवार म्हणजे किती मतदान यंत्र लागतील आणि आयोगाला किती कसरत करावी लागेल, याचा अंदाज न केलेला बरा. ज्या राज्यात शेतक-यांसाठी रयतु बंधू आहे. पेरणीच्या पूर्वतयारीसाठी प्रत्येकाला आठ हजार रुपये मिळणार आहेत. गरिबांसाठी एक हजार रुपयांची आसरा पेंशन योजना आहे. शेतीला २४ तास वीज आहे. तरीही शेतमालाच्या आधारभूत किमतीसाठी, हमीभावासाठी शेतकरी राज्याच्या नेतृत्वाला आव्हान देत आहेत. अर्थात शेतीचे अर्थकारण केवळ योजनांनी बदलत नाही, तर त्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित आधारभूत किंमत आणि हमीभाव आवश्यक असल्याचे निजामाबादमधल्या शेतक-यांनी लक्षात आणून दिले आहे.

टॅग्स :Telanganaतेलंगणा