शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
2
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
3
वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
4
थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
5
८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
6
भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
7
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
8
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
9
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
10
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक स्वभावाने तीळगुळाहून गोड, पण चिडले की समोरच्यावर संक्रांत!
11
५० देशांच्या जीडीपीपेक्षा BMC ची तिजोरी मोठी; पाहा मुंबई महापालिकेच्या सत्तेचे आर्थिक गणित
12
चोराचा कारनामा! मंदिरात चोरी केली, हात जोडून माफी मागितली अन् दागिन्यांवर मारला डल्ला
13
BCCL IPO Allotment Status: बीसीसीएल आयपीओ अलॉटमेंट आज, तुम्हाला मिळालाय का शेअर; GMP किती? जाणून घ्या
14
सरकारी कर्मचारी असा की खासगी; मतदानासाठी भर पगारी सुट्टी मिळणे कायद्याने बंधनकारक!
15
इराण पेटले! १८ दिवसांत २५०० मृत्यू, 'त्या' २६ वर्षांच्या तरुणालाही आज जाहीर फाशी?
16
विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन...
17
एनपीएसधारकांसाठी आली गूड न्यूज, आता मिळणार 'निश्चित' पेन्शनची हमी! प्रकरण काय?
18
२०२६ मध्ये माघी गणपती कधी? पाहा, श्री गणेश जयंती तारीख, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
19
२०२६चा पहिला प्रदोष शिवरात्रि योग: ‘असे’ करा शिव व्रत, पूजेत ‘या’ वस्तू हव्याच; पाहा, मान्यता
20
इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने इम्रान खान-शहबाज शरीफ यांची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

शंभर खड्ड्यांची ओरड करायची की स्वत:च एक बुजवायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 04:18 IST

आपण काय करू शकतो? शंभर खड्डे पडलेत ना, यातला एक खड्डा आपण बुजवू या ! कारण त्यावेळी त्या खड्ड्यातून जो कुणी जाणार होता तो एकतरी वाचेल. आपण तेवढेच करू शकतो. तू किती शहाणा, तू किती चुकलास असे सल्ले देत राहण्यापेक्षा मला हे जास्त संयुक्तिक वाटते.

- गजानन दिवाणआपण काय करू शकतो? शंभर खड्डे पडलेत ना, यातला एक खड्डा आपण बुजवू या ! कारण त्यावेळी त्या खड्ड्यातून जो कुणी जाणार होता तो एकतरी वाचेल. आपण तेवढेच करू शकतो. तू किती शहाणा, तू किती चुकलास असे सल्ले देत राहण्यापेक्षा मला हे जास्त संयुक्तिक वाटते.इतरांना नाव ठेवणे तसे फार सोपे असते. घरातली छोटी अडचण सोडवू न शकणारा घरकर्ता सरपंचापासून पंतप्रधानांपर्यंतच्या चुकांवर भाष्य करीत असतो. आता तर फेसबुकपासून व्हॉटस्अ‍ॅपपर्यंत अशी अनेक साधने अगदी सहज उपलब्ध असल्याने प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रातला तज्ज्ञ होऊन बसला आहे. अचडणी, समस्या, चुका हे सांगणाºयांची मोठी फौजच निर्माण झाली आहे. पण, त्या सोडविणार कोण? प्रत्येकवेळी प्रशासन आणि राजकारण्यांकडे बोट दाखवून आपण मोकळे कसे होऊ शकतो? शिक्षणाचेच पाहा. अक्षरश: बाजार झाला आहे या क्षेत्राचा. गरीब घरातला मुलगा सीए, डॉक्टर होण्याचे स्वप्न बघूच शकत नाही. जिथे पोट भरण्याची भ्रांत तिथे लाखोचे शुल्क कसे परवडणार, ही गरिबांपासून मध्यमवर्र्गींयापर्यंतची सारखीच ओरड. तुम्ही म्हणाल, परिस्थितीच तशी आहे, मी एकटा काय करू शकतो? जालन्यातील मैत्र मांदियाळी ग्रुपने केलेल्या कामाचे उदाहरण यावरील उत्तर आहे. तुमच्याआमच्यासारखा नोकरी-व्यवसाय करून आपला संसार सांभाळणाºयांचा हा ग्रुप. केवळ ३० जणांनी २०१४ साली सुरू केलेला हा ग्रुप आज राज्यभर पसरला आहे. इतरांना नाव ठेवण्यापेक्षा गरजवंतांना शक्य होईल तितकी मदत करणे हेच या ग्रुपचे काम. शिक्षणासाठी पैशांची गरज असलेल्या ४८ जणांना गेल्यावर्षी त्यांनी मदतीचा हात दिला. अशाच कामासाठी हा ग्रुप महिन्याला प्रत्येकी २०० रुपये जमा करतो. ते अपुरे पडत होते म्हणून फेसबुकवरून आवाहन केले. तब्बल २६ जणांचा शैक्षणिक खर्च उचलणारे दानशूर समोर आले. या मदतीतूनच गेल्यावर्षी एक मुलगा पीएसआयची पूर्व परीक्षा पास झाला. एकजण पुण्यात वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापक झाला. मी एकटा काय करू शकतो, त्याचे हे उत्तर. यावर्षी उर्वरित २२ जणांचा प्रश्न त्यांना मार्गी लावायचा आहे. औरंगाबादेतील एका मुलीला दहावीला ९४.६० टक्के गुण मिळाले आहेत. भावाला दहावीत ८९ तर बारावीला ८७ टक्के गुण मिळाले. त्याला सीएच्या पात्रता परीक्षेत २०० पैकी १४७ गुण मिळाले. तीही सीएची तयारी करीत आहे. वडील सेक्युरिटी गार्ड असून त्यांचा दरमहा दहा हजार पगार आहे. मुलाच्या क्लासची दहा हजार आणि मुलीची सहा हजार फी ते कोठून भरणार? ‘मैत्र मांदियाळी’च्या आवाहनानंतर जालन्यातील दोघे दानशूर समोर आले. यावर्षी या सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च मार्गी लागेल, असे या ग्रुपला वाटते. पुढे काय, तर इतर काही प्रश्न आणि त्याची अशीच उत्तरे. जग खूप मोठे आहे कबूल. पण, म्हणून मी काहीच करायचे नाही काय? हे ४८ विद्यार्थी म्हणजे सारे जग नाही. पण शिक्षणाच्या बाजारीकरणावर ओरड करीत बसण्यापेक्षा त्याचा फटका बसणाºया काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आपणच आपल्या माध्यमातून कसे सोडवू शकतो, हे ‘मैत्र मांदियाळी’ने दाखवून दिले आहे. अलीकडेच नाना पाटेकरने ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. तो म्हणाला, ‘आपण काय करू शकतो? शंभर खड्डे पडलेत ना, यातला एक खड्डा आपण बुजवू या! कारण त्यावेळी त्या खड्ड्यातून जो कुणी जाणार होता तो एकतरी वाचेल. आपण तेवढेच करू शकतो. तू किती शहाणा, तू किती चुकलास असे सल्ले देत राहण्यापेक्षा मला हे जास्त संयुक्तिक वाटते...’ नाना म्हटल्याप्रमाणे आपण प्रत्येकाने स्वत:च ठरवून घ्यायला हवे. शंभर खड्ड्यांच्या नावे ओरड करीत बसायचे की स्वत:च यातला किमान एक खड्डा बुजवायचा. शेवटी माझ्या हातात काय, हेच अधिक महत्त्वाचे नाही काय?

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपFacebookफेसबुक