शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

वाचनीय लेख - एक पृथ्वी, एक कुटुंब... आणि एक भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 12:00 IST

आजपासून भारत जी-20 च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत आहे. कोलाहलात सापडलेल्या जगाला भारत नवी दिशा दाखवेल, हे नक्की!

नरेंद्र मोदी

जी-20 समूहाच्या या आधीच्या सतरा अध्यक्ष देशांनी विविध स्तरावर अतिशय लक्षणीय कामगिरी केली आहे. आर्थिक स्थैर्य, आंतरराष्ट्रीय कररचनेचे सुसूत्रीकरण, देशांवर असलेले कर्जाचे ओझे कमी करणे या त्यातल्या महत्त्वाच्या उपलब्धी!

- या भक्कम पायावर भारताला आपल्या अध्यक्षपदाची कारकीर्द घडवायची आहे.- ही जबाबदारी घेत असताना मी स्वत:लाच  असे विचारले, जी-20 आज जिथे आहे, त्याच्या पलीकडे जाऊ शकेल का? जगाच्या  मानसिकतेत एक मूलभूत परिवर्तन करण्यासाठी आपण उत्प्रेरक ठरू शकू का?- हे शक्य आहे! निश्चितच शक्य आहे!!

आपली मानसिकता आजूबाजूच्या परिस्थितीनुसार बनत असते. आपल्या आजवरच्या संपूर्ण इतिहासात माणुसकीकडे दुर्लक्षच केले गेले. आपण, आपल्या मर्यादित संसाधनांसाठी भांडलो, कारण इतरांना ती न मिळू देण्यात, ती नाकारण्यावर आपले अस्तित्व अवलंबून होते.  दुर्दैवाने, आजही आपण त्याच जुन्या शून्य बेरजेच्या मानसिकतेत अडकलो आहोत. आजही अनेक देश भूभाग बळकावण्यासाठी,  संसाधनांसाठी लढाया लढतात. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचा वापर एखाद्या शस्त्रासारखा केला जातो. कोट्यवधी लोकांचा जीव धोक्यात आहे हे माहिती असूनही, लसींचा साठा केला जातो. कुणी म्हणेल, संघर्ष आणि लोभ या मानवाच्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. पण मी याच्याशी असहमत आहे. माणूस सुरुवातीपासून स्वार्थी असता, तर मग एकत्व या मूलभूत तत्त्वाचा उपदेश करणाऱ्या आध्यात्मिक परंपरांनी आपला चिरस्थायी ठसा समाजावर कसा उमटवला असता?

भारतीय विचार सांगतो, की सर्व सजीव प्राणिमात्र; एवढेच नव्हे, तर अगदी निर्जीव गोष्टीसुद्धा, पंचमहाभूतात सामावलेल्या आहेत! ही पंचमहाभूते म्हणजे पांच तत्त्वे आहेत- पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अवकाश. या सर्व घटकांमधील सौहार्द, एकत्व हेच आपल्यामध्ये आहे आणि ते आपल्या भौतिक, सामाजिक तसेच पर्यावरणीय कल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे. भारताचे जी-20 चे अध्यक्षपद, हीच सार्वत्रिक एकत्वाची भावना अधिक दृढ करण्यासाठी काम करेल. 

भारताने निवडलेली संकल्पना आहे : “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’’! आज आपल्याकडे, जगभरातील सर्व लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील, एवढे उत्पादन करण्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध आहेत. आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी झगडण्याची गरज उरलेली नाही. हे युद्धाचेही युग नाही ! हवामानबदल, दहशतवाद आणि महामारी ही आपल्यासमोरची सर्वात मोठी आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना एकमेकांशी भांडून नव्हे, तर एकत्रित काम करूनच करणे शक्य होणार आहे. सुदैवाने, आधुनिक तंत्रज्ञान मानवतेसमोरील व्यापक समस्यांचा सामना करण्यासाठीची साधने उपलब्ध करून देत आहे. आपल्या विशाल आभासी जगात डिजिटल तंत्रज्ञानाच्या सर्वव्यापकतेचा अनुभव आपण घेतो आहोत. भारतात जागतिक लोकसंख्येचा सहावा हिस्सा राहतो.  भाषा, धर्म, चालीरीती आणि धारणा यामध्ये आपल्या देशात कमालीची विविधता आहे! आपला देशही एका अर्थाने  संपूर्ण जगाची एक लहानशी प्रतिकृतीच आहे. सामूहिक निर्णय प्रक्रियेची सर्वात प्राचीन परंपरा असलेल्या भारताचे लोकशाहीचा पाया घालण्यामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. भारतामध्ये कोण्या एका व्यक्तीच्या हुकुमाने नव्हे तर लाखो लोकांच्या मुक्त आवाजाच्या मिश्रणातून निर्माण होणाऱ्या सुसंवादाच्या एका सुरामधून राष्ट्रीय सहमती निर्माण होते. आज भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. नागरिक-केंद्री शासनाच्या मॉडेलमध्ये उपेक्षितांची काळजी घेतली जाते, तरुणांच्या सर्जनशील गुणवत्तेची जोपासना केली जाते.

खुली, समावेशक आणि परस्परांमध्ये प्रक्रिया करता येण्याजोग्या डिजिटल सार्वजनिक सामग्रीची निर्मिती करण्यासाठी भारताने तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे सामाजिक सुरक्षा, आर्थिक समावेशन आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स अशा विविध क्षेत्रात क्रांतिकारक प्रगती झाली आहे. जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी भारताच्या अनुभवांमधून संभाव्य तोडगे मिळू शकतात. भारत आपल्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात विकासाची विविध प्रारूपे जगासमोर सादर करील. ही प्रारूपे इतरांसाठी, विशेषतः विकसनशील देशांसाठी उपयुक्त ठरू शकतील. भारताचे जी-20 चे प्राधान्यक्रम केवळ सदस्य राष्ट्रांसोबतच नव्हे; तर अन्य  सहप्रवासी देशांसोबत सल्लामसलत करून ठरवले जातील. भारताचे प्राधान्य आपल्या ‘एकसंध कुटुंबातल्या (वन फॅमिली)’ सुसंवादाने आपल्या ‘सामायिक भविष्यात (वन फ्युचर)’मध्ये आशा उत्पन्न करून आपली ‘एक वसुंधरा (वन अर्थ)’ संपन्न करण्याला असेल. पृथ्वी या आपल्या ग्रहाची स्थिती सुधारण्यासाठी निसर्गाचा विश्वस्त म्हणून जीवन जगण्याच्या भारतीय परंपरेवर आधारित शाश्वत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला भारत प्रोत्साहन देईल! अन्न, खते आणि वैद्यकीय उत्पादने यांचा जागतिक पुरवठा राजकारणरहित राहील, हे सुनिश्चित करण्याचा भारताचा प्रयत्न असेल, जेणेकरून भू-राजकीय तणावांमध्ये भर पडणार नाही. ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना नेहमीच प्राधान्य देण्याची भारताची भूमिका असेल. महाविनाशकारी शस्त्रांमुळे निर्माण झालेले धोके कमी करण्यासाठी सर्वाधिक शक्तिशाली देशांदरम्यान प्रामाणिक संवाद व्हावा, असा भारताचा प्रयत्न असेल! भारताचा ‘‘जी-20 जाहीरनामा’’ सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती आधारित आणि निर्णायक असेल. चला, आपण सगळे भारताचा जी-20 अध्यक्षपदाचा कार्यकाळ यशस्वी व्हावा, यासाठी एकत्र येऊन काम करू या!

(लेखक देशाचे पंतप्रधान आहेत)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत