शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

स्मार्ट नव्हे, आता चर्चा साध्या, ‘बोरिंग’ आणि ‘डम्ब’ फोनची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 08:18 IST

स्मार्टफोनच्या मायावी जाळ्यातून वाचण्यासाठी, काळाची चक्रं उलटी फिरवण्यासाठी पुन्हा जुन्या, बटनांच्या कीपॅडच्या मोबाइलची चर्चा आणि निर्मिती सुरू झाली आहे..

प्रसाद शिरगावकर, आंतरराष्ट्रीय स्तरावर मुक्तस्रोत तंत्रज्ञान प्रशिक्षक आणि वक्ते 

तुमचा पहिला मोबाइल फोन जर तुम्ही वीस-पंचवीस वर्षांपूर्वी वापरला असेल तर तुम्ही नोकिया किंवा मोटोरोला कंपनीचा छोटासा स्क्रीन आणि बटनांचं कीपॅड असलेला मोबाइल वापरला असेल. त्या फोनमधून तेव्हा फक्त दुसऱ्याला फोन करणं किंवा एसएमएस पाठवणं ह्या दोनच गोष्टी करता यायच्या. 

पुढे आयफोन आणि ॲण्ड्रॉइडचे स्मार्टफोन बाजारात आले. मोठं ‘टच स्क्रीन’, इंटरनेट सतत जोडलेलं, कॅमेरा, जीपीएस, ॲप्स अशा असंख्य सोयी ह्या फोनमध्ये झाल्यामुळे आपण झपाटल्यासारखे स्मार्टफोन वापरायला लागलो. आपल्या रोजच्या आयुष्यात स्मार्टफोनचा वापर चिंताजनक पातळीपर्यंत वाढला आहे. जगभर सगळीकडेच हे घडत आहे. फक्त भारतातला डेटा बघितला तर, सर्वसामान्य वापरकर्ता प्रत्येक दिवशी सरासरी सात तास मोबाइल वापरतो. जगभरातले आकडेही ह्याच्या जवळपास आहेत. मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्या निर्माण होताना दिसत आहेत.  यावर उपाय म्हणून, ‘आपण काळाची चक्रं उलटी फिरवून बघूया का’ असा विचार काही कंपन्यांनी केला ! 

त्यांनी एक प्रयोग करून स्मार्टफोनच्या ऐवजी जुने ‘साधे’ फोन तयार केले. ह्या फोनमधून फक्त कॉल्स आणि मेसेजेस करता येतील अशी सोय ठेवली. ह्या कंपन्यांपैकी एक गंमतशीर उदाहरण म्हणजे ‘हायनिकेन’ नावाची बिअर तयार करणारी कंपनी! हायनिकेनने ‘बोरिंग फोन’ नावाचा फोन तयार केला आहे. जुन्या काळी जसे उघडता मिटता यायचे तसा हा फ्लिप फोन. मोठी बटणं आणि छोटा स्क्रीन असलेला. आणखी एक गंमत म्हणजे, एकेकाळी जगभर सगळ्यांच्या लाडक्या असलेल्या नोकिया कंपनीनेही त्यांच्या त्याकाळी सर्वाधिक विक्री झालेल्या Nokia 3310 ह्या मॉडेललाही २०२४ मध्ये नव्या रूपात बाजारात आणलं आहे.

स्मार्टफोन्सची सद्दी असलेल्या सध्याच्या जगात ह्या जुन्या प्रकारच्या साध्या ‘फीचर फोन्स’ना कसा प्रतिसाद मिळेल असा प्रश्न पडू शकतो. पण ह्या दोन्ही कंपन्यांच्या फोन्सना सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक आकडेवारी सांगते, आजही अमेरिकेत साध्या फोन्सना तब्बल एक अब्ज डॉलर्स इतकी बाजारपेठ मिळू शकते! भारतीय बाजारपेठेतून साधे फीचर फोन्स हे कधी पूर्णपणे गायब झालेच नव्हते. स्मार्टफोन्स बरोबरच गेली अनेक वर्ष भारतात नोकिया, मोटोरोला, लावा इत्यादी कंपन्यांचे छोटी स्क्रीन्स, बटणं आणि कमीत कमी फीचर्स असलेले साधे फोन विकले जात होतेच आणि अजूनही ते मिळतात. हे फोन पाच-सातशे ते हजार दीड हजार रुपयांत मिळतात आणि खणखणीत चालतात. कष्टकरी, छोटे व्यावसायिक.. ह्या वर्गाला फक्त फोन करण्या-घेण्यासाठी अत्यंत स्वस्तातले हे फोन नेहमीच वरदान ठरले आहेत. नोकियाने तर अशा काही साध्या फोन्सच्या मॉडेल्समध्ये इंटरनेटची सुविधा देऊन त्यावर यूपीआय ॲपदेखील दिलं आहे. म्हणजे हा फोन फक्त कॉल करणे, एसएमएस करणे ह्या पुरता मर्यादित न राहता रोजच्या आयुष्यात यूपीआयने व्यवहार करण्यासाठीही वापरता येऊ शकतो. एक विचार असा येतो की, ज्या फोनमधून सेल्फी काढता येत नाहीत, इन्स्टाग्राम फीड स्क्रोल करता येत नाही, यू-ट्यूबवरचे व्हिडीओज बघता येत नाहीत, ऑनलाइन शॉपिंग करता येत नाही, गूगल मॅप्स लावता येत नाही, गूगलवर सर्च करता येत नाही, असे फोन्स आजच्या काळात आपण पुन्हा वापरायला लागू का? 

स्मार्टफोन वापरून आपण करत असलेल्या किती गोष्टी आपल्या आयुष्यात खरोखर महत्त्वाच्या असतात, आपल्या आयुष्यात खरोखर काही योगदान त्या देतात का आणि त्यातल्या किती गोष्टी आपल्या वेळेचा आणि शक्तीचा पूर्णपणे अपव्यय करत असतात, हा विचार आपण कधीच करत नाही. हा विचार, हे विश्लेषण आणि आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे.हे करायचंच तर, एखादा जुन्या पद्धतीचा, मोठी बटणं-छोटं स्क्रीन-कमीत कमी सुविधावाला फोन काही महिने वापरून बघायला हवा. हे केलं तर खरंच या स्मार्टफोनवरच्या असंख्य ॲप्सच्या फाफट पसाऱ्याला काही अर्थ का हे आपल्या लक्षात येऊ शकेल. आणि मोबाइलच्या सततच्या वापरापासून आपली कदाचित सुटका होऊ शकेल... करून बघितलं पाहिजे!prasad@aadii.net

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन