शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

यापुढील लढा संविधानयुक्त भारतासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 02:44 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीला वेगळा संदर्भ व अर्थ आहे. सध्या संघाच्या नेतृत्वाखालील भाजपाकडे देशाची धुरा आहे. त्यामुळे संघ परिवारालाही बळ मिळाले आहे. अशा स्थितीत

- अर्जुन डांगळेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीला वेगळा संदर्भ व अर्थ आहे. सध्या संघाच्या नेतृत्वाखालील भाजपाकडे देशाची धुरा आहे. त्यामुळे संघ परिवारालाही बळ मिळाले आहे. अशा स्थितीत भारतीय संविधानाची मूल्ये रुजविण्याची, जोपासण्याची जबाबदारी या देशातील वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्यांच्या खांद्यावर आली आहे. भाजपाकडून बाबासाहेबांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्मारकांच्या घोषणा होत आहेत. मात्र, सामाजिक परिवर्तनाचा विचार रुजविण्यासाठी केंद्र शासन पावले उचलताना दिसत नाही. डॉ. आंबेडकर विशिष्ट समाजाची मक्तेदारी नाही. त्यांचा लढा देशाच्या विकासासाठी होता. वंचित, कष्टकऱ्यांना माणूसपणाचे हक्क मिळवून देण्यासाठी होता. महिलांना बाळंतपणाची तीन महिन्यांची रजा, कर्मचाऱ्यांना आठ तास ड्युटी, एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज या बाबी त्यांच्या संकल्पनेतून आल्या. नद्याजोडणी प्रकल्पाची संकल्पनाही त्यांची होती. शेती, सिंचन, वीज, अर्थकारण या सर्व विषयांवर त्यांनी विपुल विचार मांडले. अशा द्रष्ट्या नेत्याचे तत्कालीन नतद्रष्ट सरकारने न ऐकल्याने देशासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.पँथरने झंजावात निर्माण केला होता. पण पँथरला कोणीच स्वाभाविकपणे वाढू दिले नाही. आजचे रिपब्लिकन पक्षही आपल्या कलेने चालावेत, असा सर्वच पक्षांचा प्रयत्न असतो. त्याला काही बळी पडतात. आंबेडकरी चळवळ गटातटांत विभागली आहे. ऐक्य होत नाही, टिकत नाही, तरुणांचा पुढाऱ्यांवर विश्वास नाही आणि कुठल्याही गटाची स्वतंत्रपणे लढण्याची ताकद नाही. त्यामुळै रिपब्लिकन पक्षाचा एकजातीय पाया नष्ट करणे आवश्यक आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा नारा देत भाजपाने देशाची सत्ता मिळविली. भाजपाच्या प्रचारात समान नागरी कायदा, गोवंश हत्याबंदी, राम मंदिर, ३७० वे कलम, हिंदू राष्ट्र, वंदे मातरम् हे मुद्दे नव्हते. मात्र आता ते असे मुद्दे उकरून काढत देशाला सरंजामी मनोवृत्तीकडे घेऊन जाऊ पाहत आहेत. अनिष्ट प्रथा-परंपरांविरुद्ध सध्याच्या सुरू असलेल्या लढ्याबाबत संघाची चुप्पी दिसत आहे. क्रांतीचे चाक वेगाने फिरत असते. त्याच वेळी प्रतिक्रांतीही गतिमान होते. हा संघर्ष सतत चालू आहे. आज तो नव्या स्वरूपात सुरू झाला आहे. कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही, हे ठरविणारे तुम्ही कोण? बाबासाहेब एकेकाळी गांधींना म्हणाले होते, ‘आय हॅव नो मदरलँड’. असे म्हणण्याची वेळ आज तुम्ही आमच्यावर येऊ देऊ नका. यातून केवळ असुरक्षितताच जन्म घेईल. या असुरक्षिततेतून तुम्हाला सत्ता मिळेलही, पण ती सत्ता अराजकता आणि यादवीच्या दिशेने घेऊन जाणारी असेल. रिपब्लिकन जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून हाच प्रयत्न सुरू आहे. आंबेडकरी पक्षांच्या राजकारणाची कोंडी फोडण्याचे काम तरुणच करू शकतात. यातूनच समविचारी व्यक्ती, संघटनांना घेऊन सर्वसमावेशक भूमिका असणारी नवीन ताकद निर्माण होईल.