डॉ. विजय दर्डा चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांची बहीण सुजाता शाह सेजेकन भारतातील बंगळुरू शहरात राहते. बालेन निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी झाल्यानंतर एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले होते, 'भारत आणि नेपाळचे नाते शतकानुशतकांचे जुने आहे, आणि ते कोणीही बिघडवू शकत नाही. जे झाले ती एक तात्पुरती स्थिती होती. आता परिस्थिती सकारात्मक असेल!' बालेन पंतप्रधान होताच दोन्ही देशांचे नाते सुधारेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला होता.
सुजाता यांची इच्छा पूर्ण झाली आहे. केवळ ३५ वर्षे वयाचे रॅप गायक बालेन यांनी नेपाळचे पंतप्रधानपद सांभाळले आहे. मागच्या एक-दीड दशकात भारत आणि नेपाळच्या नात्याला वादळी परिस्थितीमुळे खोलवर जखमा झाल्या; त्यावर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न बालेन करतील काय? भारत आणि नेपाळ यांच्यातील नाते कम्युनिस्ट पक्षाच्या उदयाच्या आधी जसे होते तसे होईल का? तसे व्हावे असे त्यांना मनापासून वाटते का? ते चीनशी कसे संबंध ठेवू इच्छितात? जगभरातील महाशक्तींसाठी नेपाळ हा कूटनीतीमध्ये महत्त्वपूर्ण देश असल्याने असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत.
नेपाळच्या जनतेने बालेन यांच्यावर गाढा विश्वास टाकला आहे. २००८ सालानंतर तेथे आघाडी सरकारे चालली, परंतु आता बालेन यांचा राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष भरपूर बहुमताने निवडून आला. याचा अर्थ बालेन यांच्याकडे नेपाळचे नशीब बदलण्याची ताकद आहे.
मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी आपल्या शैलीची झलक दाखवली. ज्या जेन-झी आंदोलनामुळे ते पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले, त्या आंदोलनात सरकारी गोळीबारात बरेच तरुण मारले गेले होते. या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या गौरी बहादूर कारकी आयोगाने सुशिला कारकी यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला अहवाल सादर केला होता. त्या अहवालानुसार दोषी असणाऱ्यांवर बालेन यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर तत्काळ नेपाळचे माजी पंतप्रधान आणि नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे नेते के. पी. शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक करण्यात आली.
पंतप्रधान असताना आणि नसतानाही चीनच्या मांडीवर खेळणारे नेते म्हणून ओली ओळखले जातात. रमेश लेखकसुद्धा चीनच्या म्हणण्यानुसारच वागत होते. या दोघांची अटक हा चीनला अत्यंत कठोर संदेश आहे. चीनने नेपाळला आपला मांडलिक करण्याचा प्रयत्न करू नये, हे बालेन यांना सुचवायचे आहे. चीनने आत्तापर्यंत उघडपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही; परंतु दोघांना झालेल्या अटकेकडे त्या देशाचे लक्ष जरूर असणार.
बालेन यांनी चीनला या आधीसुद्धा एक झटका दिला आहे. के. पी. शर्मा ओली पंतप्रधान असताना त्यांनी झापा संसदीय क्षेत्रात 'नेपाळ चीन फ्रेंडशिप इंडस्ट्रीयल पार्क' निर्माण करण्यासाठी शिलान्यास केला होता. परंतु बालेन यांनी आपल्या जाहीरनाम्यात हा प्रकल्प हटवण्याचे आश्वासन दिले होते. हा प्रकल्प चीनच्या 'बेल्ट अँड रोड' पुढाकार योजनेचा भाग आहे. याचा अर्थ बालेन चीनच्या मतानुसार वागणारे नाहीत.
भारतासाठी हा शुभसंकेत मानता येईल. पण नेपाळ चीनपासून दूर राहील म्हणजे भारताच्या मताप्रमाणे वागेल, असेही गृहीत धरणे योग्य नव्हे. बालेन काठमांडूचे महापौर असताना त्यांनी 'आदिपुरुष' या चित्रपटावर बंदी घातली होती. सीतेचे जन्मस्थळ जनकपूर हे नेपाळमध्ये असताना चित्रपटात सीतेचा जन्म भारतात झाल्याचे दाखवले होते, हे त्याचे कारण. के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान असताना प्रकाशित केलेल्या एका नकाश भारताच्या उत्तराखंड राज्याचा काही भाग नेपाळ असल्याचे दाखवले होते. बालेन यांनी हा नकाः काठमांडूच्या महापौर कार्यालयात टांगला हो नेपाळी राष्ट्रवाद भक्कम करण्यासाठी जे काही कर लागेल, तेच बालेन शाह करतील; हे नक्की. नेपाळच् तरुणांना आवडणार नाही असे कोणतेही काम करणार नाहीत; परंतु नेपाळचे हित कशात आहे याकडेही ते जरूर लक्ष देतील.
नेपाळची भूमी चहूकडून घेरलेली आहे. भारताः या देशाची १२५० किलोमीटर लांबीची सीमा आहे, चीनबरोबर १४१४ किलोमीटरची सीमा आहे. म चीनची सीमा उंच डोंगर आणि बर्फाळ शिखरां आहे. याचा अर्थ भारताशी नेपाळचा व्यापार जित सुलभ होऊ शकतो, तितका चीनबरोबर होऊ शव नाही.
भारताशी नेपाळचे सांस्कृतिक संबंध आहे शिवाय, बालेन मधेशी आहेत. मूळच्या भारर्त असलेल्या लोकांना मधेशी म्हटले जाते. चीनशी म नेपाळचा कोणताही सामाजिक आणि सांस्कृति संबंध नाही. एकंदरीत, बालेन अपेक्षापूर्ण नजं भारताकडे पाहतील, असे दिसते. त्या अपेक्षां सन्मान भारताने केला तर मैत्रीचे नवे पर्व सुरू होई जुन्या जखमा भरून येतील आणि भारत-नेपाळच् नातेसंबंधात नवे माधुर्य येईल. दोन्ही देशांसाठी उत्तम संधी आहे. सगळे चांगले होईल, अशी आ करूया.
vijaydarda@lokmat.com
Web Summary : Nepal's new PM Balen Shah faces the challenge of mending strained relations with India, navigating China's influence, and prioritizing Nepal's interests. His initial actions suggest a shift away from China, offering a potential opportunity for improved India-Nepal ties, if expectations are met.
Web Summary : नेपाल के नए प्रधानमंत्री बालेन शाह के सामने भारत के साथ तनावपूर्ण संबंधों को सुधारने, चीन के प्रभाव से निपटने और नेपाल के हितों को प्राथमिकता देने की चुनौती है. उनके शुरुआती कदमों से चीन से दूरी का संकेत मिलता है, जिससे भारत-नेपाल संबंधों में सुधार की संभावना है, बशर्ते अपेक्षाएं पूरी हों.