शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातही हवी बिहार दारूबंदीची चतु:सूत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 05:41 IST

बिहारमध्ये १ एप्रिलपासून नितीशकुमार सरकारने संपूर्ण राज्यात दारूबंदी केली. अतिशय धाडसाचा, राजकीयदृष्ट्या दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय घेऊन नितीशकुमारनी दारूबंदी हा महिलांचा विषय समजल्या जाणाऱ्या विषयाला राजकीय मुद्द्याचे स्वरूप दिले.

- वर्षा विद्या विलास (सामाजिक कार्यकर्त्या)बिहारमध्ये १ एप्रिलपासून नितीशकुमार सरकारने संपूर्ण राज्यात दारूबंदी केली. अतिशय धाडसाचा, राजकीयदृष्ट्या दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय घेऊन नितीशकुमारनी दारूबंदी हा महिलांचा विषय समजल्या जाणाऱ्या विषयाला राजकीय मुद्द्याचे स्वरूप दिले.बिहारमध्ये कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नाही, तेथे दारूबंदीसारखा कायदा कसा अमलात आणला जात आहे याचेच आश्चर्य वाटते. बिहार राज्यात जाऊन तेथील दारूबंदीचा अभ्यास केला असता, यशस्वी दारूबंदीच्या अंमलबजावणीची चतु:सूत्री अनुभवायला मिळाली. दारूबंदीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी किंवा दारूबंदीची वाटचाल दारूमुक्तीकडे नेण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती बिहारमध्ये दिसून आली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारचा दारूबंदी हा ‘प्रायोरिटी’ मुद्दा आहे.बिहारपूर्वी अनेक राज्यांनी दारूबंदीचा निर्णय घेऊन नंतर माघार घेतली. गया जिल्ह्यातील जदयुच्याच महिला आमदार मनोरमादेवी हिच्या घरी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पाच-दहा दारूच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी तिचे घर सील केले. पक्षाने मनोरमादेवीला निलंबित केले. आज ती बिहारच्या जेलमध्ये आहे. प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचे याहून कोणते मोठे उदाहरण असू शकते?दारूबंदीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राजकीय इच्छाशक्तीसोबतच ती अमलात आणणारी प्रशासकीय यंत्रणाही तेवढीच गतिशील आणि सक्रिय असायला पाहिजे, सरकारचा निर्णय हा प्रत्येकाच्या कार्याचा भाग बनला पाहिजे. ही व्यवस्था बिहारमध्ये दिसून आली. दारूबंदीच्या तीन महिने आधीपासून बिहारची प्रशासकीय यंत्रणा दारूबंदीच्या कार्यात सक्रिय झाली. त्यासाठी दीड कोटी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडून ‘दारू पिणार नाही’ असे शपथपत्र लिहून ते शिक्षकांकडे दिले. बिहारमध्ये सर्व शासकीय कर्मचाºयांनी दारूबंदीची शपथ घेतली. बिहार राज्याचे मुख्य सचिव यांनी शपथ न घेणाºया अधिकाºयांचे मार्च महिन्याचे वेतन थांबविले. त्यामुळे दारूबंदी हा सरकारचा प्राधान्याचा विषय दिसून आला आणि प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली.विषारी दारूने कोणी दगावले तर तेथील जिल्हाधिकाºयांसह संबंधितांवर कारवाई केली जाईल हे ठरल्याने अनेक जिल्हाधिकाºयांनी दारूच्या आहारी गेलेल्यांचा सर्व्हे केला. त्यांचे समुपदेशन केले. प्रत्येक जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्रे उभी केली. मद्यपींसाठी १0८ क्रमांकाची रूग्णवाहिनी सुरू केली आहे. एक आणखी महत्त्वाची प्रशासकीय यंत्रणा दारूबंदीच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. निवृत्त पोलीस महानिरीक्षक यांच्या देखरेखीखाली पाटणा येथे नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. त्यातून राज्यातील दारूबंदीच्या कार्यात महिलांना मदत केली जाते. त्यासाठी बिहार सरकारने टोल फ्री नंबर सुरू केला आहे. असाच टोल फ्री नंबर जिल्हास्तरावरही आहे.दारूबंदीची मागणी विशेषत: महिलांकडून होते, सरकारने दारूबंदीचा निर्णय घेतल्यानंतर ती दारूबंदी हे केवळ सरकारचे काम समजले जाते. महाराष्ट्रात दारूबंदीचे आंदोलन ज्या ज्या वेळी होते, त्या वेळी सरकारकडून हे नेहमी सांगण्यात येते की दारूबंदी चांगली आहे, पण त्याची अंमलबजावणी शक्य नाही. मात्र बिहार दारूबंदीची चतु:सूत्री लक्षात घेतली, तर दारूबंदीची अंमलबजावणी ही पूर्णत: शक्य आहे आणि ते एक विकासाचे मॉडेल ठरू शकते.

टॅग्स :liquor banदारूबंदीMaharashtraमहाराष्ट्र