शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

सायबर हल्ले बदलतील पारंपरिक युद्धाचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 4:21 AM

युद्ध म्हटले की शत्रूशी प्रत्यक्ष दोन हात करणारे भूदल-नौदल-हवाई दल यांमधील वीर जवान आणि त्यांना आदेश देणारी लष्करी कार्यालये उर्फ ‘हायकमांड’ अशी दोनच टोके सर्वसामान्य व्यक्तींच्या डोळ्यासमोर तरळतात.

- डॉ. दीपक शिकारपूरयुद्ध म्हटले की शत्रूशी प्रत्यक्ष दोन हात करणारे भूदल-नौदल-हवाई दल यांमधील वीर जवान आणि त्यांना आदेश देणारी लष्करी कार्यालये उर्फ ‘हायकमांड’ अशी दोनच टोके सर्वसामान्य व्यक्तींच्या डोळ्यासमोर तरळतात. हे स्वरूप आता वेगाने बदलत आहे. सर्व गोष्टी स्मार्ट व हायटेक होत आहेत. सायबर तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे तसेच युद्धही. संगणक आणि स्मार्टफोनचा वापर सर्वसामान्य नागरिकही मुबलक प्रमाणात करू लागण्याच्या दिवसांत अतिरेकी आणि नक्षलवादी त्यापासून दूर राहतील, अशी अपेक्षाच करणे चुकीचे आहे.विविध समूहांदरम्यान संवाद साधणे, समन्वय राखणे, हाती असलेल्या सामग्रीचा आढावा घेणे, आपल्या हेतूंचा प्रचार करणे (त्याचबरोबर विरुद्ध पक्षाची मते खोडून काढणे), गुप्त माहिती मिळवणे, दडवणे, पसरवणे यांबरोबरच चक्क नोकरभरतीसाठीही नेट आणि तत्सम सुविधांचा वापर जगभरातील अतिरेकी संघटना करीत आहेत. सोशल नेटवर्क्सप्रमाणेच यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करण्याची पद्धतही त्यांच्यात वेगाने रुजते आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अतिरेकी संघटना आणि टोळ्यांना संगणकीय प्रणालींचा चांगलाच फायदा होतो. वेळ वाचतो, मनुष्यबळ वाचते, एखादी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताना उद्भवणारे संभाव्य धोके टळतात. सध्या अस्तित्वात असलेली ई-मेल खाती, वेबसाइट्स, ब्लॉग्ज यांचाही वापर ते खुबीने करून घेतात. लोकप्रिय साइट्सवरील जाहिरातींमधूनदेखील हे हुशार लोक चक्क गुप्त माहितीची देवाणघेवाण करीत असतात.अशा उद्योगांसाठी गुप्तपणे आर्थिक साहाय्य देऊ करणाऱ्या अनेक व्यक्ती व संस्था अस्तित्वात आहेत. त्यामुळे आयटीमध्ये मिळणाºया वेतनाइतके किंबहुना बरेचदा त्यापेक्षा अधिक वेतन वा सवलती देऊन अतिरेकी संघटना सॉफ्टवेअर आणि प्रोग्रॅमिंग तज्ज्ञांची फौजच आपल्या पदरी बाळगून असतात. हॅकिंगची अशी कामे करणाºया काही तरुणांना तर आपण नक्की कोणासाठी काय स्वरूपाचे काम करीत आहोत आणि त्याचे परिणाम जगावर कशाप्रकारे होऊ शकतात याची कल्पनाही नसते. अशा परिस्थितीत, हल्ला यशस्वी होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेणे आणि प्रयत्न हे काम सर्वसामान्य नागरिकांपासून सरकारपर्यंत प्रत्येक जण करू शकतो.या धोरणाचे दोन ठळक भाग पडतात. पहिला म्हणजे संगणकीय आणि माहिती तंत्रज्ञानासंबंधीच्या यंत्रणा आणि प्रणाली सुरक्षित बनवणे, अनधिकृत प्रवेश झालाच तर तो प्राथमिक पातळीवर असतानाच त्याचा मागोवा ठेवता येईल अशी व्यवस्था करणे, प्रणालीतील माहिती आणि इतर बाबींचा शक्य तितका बॅकअप घेऊन म्हणजे त्याची इलेक्ट्रॉनिक प्रत करून तो वेगळे संकेतन आणि ओळख पडताळणी असलेल्या दुसºया सिस्टीमवर ठेवणे. यासाठी शास्त्रज्ञ आणि संबंधित विषयांच्या तज्ज्ञांना अधिक संशोधनासाठी प्रोत्साहित करणे तसेच संशोधन आणि विकासासाठी (रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) भक्कम निधी मिळवून देणे आवश्यक आहे. हे संशोधन म्हणजे भावी सायबर सुरक्षिततेसाठी केलेली गुंतवणूक मानली जावी. हेरगिरीचे आणि युद्धाचे पारंपरिक स्वरूप झपाट्याने बदलले आहे हे खरे. विविध देश कोल्ड वॉरकडून कोड वॉरकडे जात असताना प्रत्यक्ष आघाडीवर, बंदुका-विमाने-रणगाडे इ. वापरून लढल्या जाणाºया चकमकींचे प्रमाण कमी होईल, तेवढेच राहील की सायबर युद्ध - संशयाच्या धुक्याआडून अधिकच वाढेल?( संगणक साक्षरता प्रसारक)

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम