शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

प्रॅक्टिस तलावात, पोहायचं समुद्रात? पालिकांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती म्हणजे, 'त्यांच्या' नशिबी पुन्हा सतरंजी उचलणेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 11:58 IST

पालिकांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती आली, म्हणजे लहान कार्यकर्त्यांची नगरसेवक बनण्याची संधी गेली. त्यांच्या नशिबी पुन्हा सतरंजी उचलणेच!

यदु जोशी -

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात असलेली आणि त्यावेळी भाजपचा मोठा फायदा करून देणारी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत महापालिका, नगरपालिका निवडणुकांत आणण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामागे काय लॉजिक असावं, याची चर्चा सुरू झाली आहे. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्या आल्या आधीची बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून एक नगरसेवक-एक प्रभाग करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर जवळपास २२ महिने महाविकास आघाडीतील नगरसेवक पदासाठीच्या इच्छुकांनी एकल प्रभाग (वॉर्ड) हे लक्ष्य समोर ठेवून बांधणी केली. महापालिकेत १५ हजार  मतदारांमध्ये  इच्छुकांनी संपर्क वाढवला, मोर्चेबांधणी केली आणि आता एकदम बहुसदस्यीय पद्धत त्यांच्या गळ्यात टाकत ४०-४५ हजार लोकांची मतं घेण्याचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. पोहण्याची प्रॅक्टिस करायची तलावात आणि पोहायला लावायचं समुद्रात, असा हा प्रकार आहे. आपल्याच सरकारचा आधीचा निर्णय बदलण्यासाठी महाविकास आघाडीतील कोणता पक्ष सर्वाधिक आग्रही होता?  ‘एक सदस्य-एक प्रभाग असेच सूत्र कायम ठेवायला हवं होतं’, असं तिन्ही पक्षांचे नेते खासगीत सांगत आहेत. कारण, प्रभाग पद्धतीचा फायदा भाजपला होतो हे यापूर्वी एकदा नाही दोनवेळा सिद्ध झालेलं आहे. शहरी भागामध्ये भाजपचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय, बहुतेक महापालिकांमध्ये आज भाजपची सत्ता आहे. नगरपालिकांमध्येही त्यांना  मोठं यश मिळालं होतं. या दोन्ही ठिकाणी भाजपचे नगरसेवक हे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत प्रस्थापित झालेले आहेत. एक नगरसेवक-एक प्रभाग पद्धतीच राहणार असं समजून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे कार्यकर्ते मेहनत घेत होते. ते मोहल्ल्यातल्या ग्राऊंडवर खेळत होते, आता त्यांना एकदम वानखेडे स्टेडियमवर बॅटिंग करायला लावाल तर कसं होईल? -  बरं तयारीसाठी वेळदेखील कमी उरलाय.मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला, त्याचा महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले तरच फायदा होईल. वेगवेगळे लढले तर ॲडव्हान्टेज भाजप असेल. आम्ही स्वबळावरच लढणार, अशी घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादीनं आधीच केलेली आहे. एकवेळ शिवसेना-राष्ट्रवादी सोबत जातील, पण काँग्रेस जाईल का? एक महत्त्वाचा फॅक्टर विसरला गेला तो असा की, बऱ्याच लहान-मोठ्या शहरांमध्ये महाविकास आघाडीतील तीन पक्षांत एकल प्रभागापुरते प्रभावी असलेले अनेक कार्यकर्ते आहेत, पण बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत त्यांचा टिकाव लागत नाही.नागपूरचंच उदाहरण घ्या, तिथे राष्ट्रवादी अन् शिवसेनेचं कालच्या निर्णयानं नुकसान झालं. बहुसदस्यीय प्रभाग करताना दोन फायदे प्रामुख्यानं सत्ताधाऱ्यांनी समोर ठेवले असतील. एक म्हणजे बंडखोरीची लागण कमी होते. दुसरं म्हणजे आरक्षणाचा फटका बसलेल्या प्रभावी उमेदवाराला त्याच प्रभागातील अन्य जागेवर उमेदवारी देता येते. मात्र, हा फायदा केवळ सत्ताधारी पक्षांनाच नाही तर भाजपलादेखील आहे. बहुसदस्यीय प्रभाग ही केडरच्या भरवशावर लढवली जाणारी निवडणूक आहे. त्यामुळे आम्हालाच फायदा होईल, असं भाजपचे नेते सांगत आहेत. कालच्या निर्णयाचा सर्वात जास्त आनंद भाजपला झाला आहे. भाजपबाबत असलेल्या अँटिइन्कम्बन्सीचा फायदा महाविकास आघाडीला घ्यावा लागेल.महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा एक प्रभाग करताना महिला आरक्षणाचं वाटप कसं करणार? चार सदस्यांच्या प्रभागात दोन पुरुष, दोन महिला नगरसेवक असायच्या. आता काही प्रभागांमध्ये दोन महिला, एक पुरुष तर काही प्रभागांमध्ये एक पुरुष, दोन महिला असं विषम प्रमाण राहील. गावगुंड कमी निवडून येतात, हा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा फायदा आहे, तो नक्कीच होईल. अल्पसंख्याकांच्या वस्त्या बहुसंख्याकांच्या वस्त्यांना जोडून प्रभाग तयार होतो, त्यात अल्पसंख्याकांची जिंकण्याची संधी जाते. यावेळीही तसंच होईल.राष्ट्रवादी सुखी, काँग्रेस दु:खी -राष्ट्रवादीच्या मतदारसंघांमध्ये निधी मिळतो, आमच्यावर कायम अन्याय होतो, असं काँग्रेसच्या आमदारांचं म्हणणं आहे. आपल्या पक्षाच्या मंत्र्यांकडे ते तक्रारीचा पाढा वाचत असतात. मंत्री स्वत:पुरते सुखी असल्यानं फारशी दखल घेत नसावेत. निधीबाबत राष्ट्रवादी प्रथम, शिवसेना द्वितीय अन् काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर अशीच परिस्थिती असल्याचं काँग्रेसचे दोन आमदार परवा एका मंत्र्यांच्या दालनाबाहेर सांगत होते. काँग्रेसच्या आमदारांमध्ये खदखद आहे. राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी आपली कोंडी करीत असल्याचं शिवसेनेचे आमदारही खासगीत सांगतात. परवाचा अनंत गीतेंचा त्रागा तोच होता. भाजपसोबत चला असा एक दबाव शिवसेनेच्या खासदार, आमदारांकडून असल्यानं तर मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत गुगली टाकली नाही ना, अशीही चर्चा आहे.जाता जाता :शिवसेनेच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढायचे, पण टोकाची कारवाई करायची नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर थेट कारवाई करायची आणि आता काँग्रेसच्या नेत्यांचेही मनीट्रेल बाहेर काढायचे, अशी रणनीती दिसते. गुरुवारी विविध ठिकाणी पडलेले आयकर छापे काँग्रेस नेत्यांच्या गळ्याशी येऊ शकतात. 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस