शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

मुल्ला-लष्करातील साटेलोटे हे पाकिस्तानचे खरे दुखणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:20 IST

Pakistan: पाकिस्तानच्या निम्म्या आयुष्यात मुल्ला आणि लष्करानेच तिथले सरकार चालविले आहे. उरलेल्या काळात राजकीय पक्षांनी राज्य केले, हेच सत्य होय!

- वप्पला बालचंद्रन(मंत्रिमंडळ सचिवालयाचे निवृत्त विशेष सचिव) 

मुल्ला मंडळींबरोबर पाकिस्तानी सैन्याचे साटेलोटे जनरल झिया-उल-हक लष्करप्रमुख झाले होते तेव्हापासूनचे, म्हणजे १९७६ पासूनचे असल्याचा सर्वसाधारण समज आहे; परंतु तो बरोबर नाही. त्याची प्रक्रिया खूप आधी सुरू झालेली होती. पाकिस्तानमधील ‘फ्रायडे टाइम्स’ने ९  नोव्हेंबर २०२१ रोजी असे म्हटले आहे की, १९४७ साली भारतातील काश्मीरशी संघर्ष उद्भवला, तेव्हापासून सशस्त्र बंडखोर पुरविण्याचे काम राजकीय पक्ष करत आले आहेत.

काश्मीर संस्थान भारतात विलीन करून घेण्यासाठी महाराजा हरिसिंग यांची संमती मिळविणाऱ्या व्ही. पी. मेनन यांनी १९५६ साली लिहिलेल्या ‘द स्टोरी ऑफ इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स’ या पुस्तकात याला दुजोरा देणारा उल्लेख आहे.

सीमेवरील वन्य जमातीचे सुमारे ५ हजार सशस्त्र बंडखोर दोन-तीनशे लॉऱ्यांमध्ये भरून २२ ऑक्टोबर १९४७ रोजी चाल करून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यात आफ्रिडी, वझीर, मेहसूद आणि स्वाथीज् अशा जमातींच्या टोळ्या होत्या.

१९९३ ते ९६ या काळात बेनझीर सरकारमध्ये जनरल नसीर उल्ला बाबर हे गृहमंत्री होते. अफगाण तालिबानची निर्मिती त्यांनीच केली. २००७ साली एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते, ‘पाकिस्तानच्या निम्म्या आयुष्यात मुल्ला आणि सैन्याच्या आघाडीनेच तिथले सरकार चालविले आहे. उरलेल्या काळात राजकीय पक्षांनी राज्य केले.’

१९७१ च्या पराभवानंतर झुल्फिकार अली भुत्तो यांना मुल्ला आणि लष्करातील साटेलोटे तोडता आले असते; परंतु त्यांनी राजकीय लाभासाठी धर्माचा उलट जास्त वापर केला. १९७४ मध्ये त्यांनी दुसरी जागतिक इस्लामिक शिखर बैठक लाहोरमध्ये भरवली. त्याचवर्षी त्यांनी मध्ये अहमदियाना अल्पसंख्याकांचा दर्जा दिला. ते मुस्लीम राहिले नाहीत. रविवारऐवजी शुक्रवार हा त्यांनी सुट्टीचा दिवस जाहीर केला.

‘द मिराज ऑफ पॉवर इन्क्वायरी इन टू भुत्तो इयर्स, १९७१-१९७७’ या पुस्तकात झुल्फिकार अली भुत्तो यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय मुबशीर हुसेन म्हणतात, ‘सरकारी माध्यमातील सरंजामदार आणि त्यांच्या नोकरचाकरांनी मुल्लांमध्ये आणखी मुल्लापण भरले.’

भुत्तोंशी जवळीक असलेले खालीद हुसैन म्हणतात, ‘भुत्तोंनी पाकिस्तानी लष्कर आणि त्याच्या नीतिधैर्याची पुनर्बांधणी केली. १९७१च्या नामुष्की झालेल्या युद्धानंतर ती आवश्यक होती. परंतु त्यांनी एक चूक केली. लष्कराची ताकद त्यांनी स्वतःला बळकट करण्यासाठी वापरली. लष्करावर विसंबून राहण्याची त्यांना काहीच गरज नव्हती. उलट त्यांनी नागरी व्यवहारापासून लष्कर दूर ठेवायला हवे होते; परंतु तसे घडले नाही.’

अफगाण युद्धासाठी मूलतत्त्ववादी इस्लामी शक्ती एकत्र केल्याचा आरोप झियांवर होतो; परंतु ही चूक कितीतरी आधी १९७३  साली भुत्तोंनी केली होती. कारण अगदी वेगळे होते. मोहम्मद दाऊद खान यांनी अफगाणिस्तानमध्ये बंड करून चुलत भाऊ किंग मोहम्मद जहीर शाह यांची राजवट उलथून टाकली, तेव्हा हे घडले. ब्रिगेडियर नसीरुल्ला बाबर त्यावेळी सीमावर्ती स्काउटचे प्रमुख होते. 

दाऊदला विरोध करण्यासाठी गुलबुद्दीन हिकमत्यार यांच्यासारख्या मूलतत्त्ववाद्यांना भरती करून घ्यायला भुत्तो यांनीच बाबर यांना सांगितले. आयएसआयच्या माध्यमातून वेगवेगळ्या मूलतत्त्ववाद्यांना भरती करून घेण्याचा प्रघात पडला आणि नंतर तेच पाकिस्तानचे धोरण झाले. याच नसरुल्ला बाबर यांनी बेनझीर यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. तालिबान्यांना मदत पोहोचविण्यासाठी १९९४ साली त्यांनी अफगाण सेल तयार केला. क्वेट्टा ते मध्य आशिया असा जाणारा महत्त्वाचा हमरस्ता युद्धखोरांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अफगाणांची ताकद वापरण्याची कल्पना बेनझीर यांची होती. अर्थातच, अमेरिकेचे व्यापारी हितसंबंध त्यामागे होते.

मुल्ला आणि लष्कर यांचे साटेलोटे पाकिस्तानमध्ये खोलवर मुरलेले आहे. त्या देशाच्या परदेशी मालकांचे तुष्टीकरण करण्यासाठी अत्यंत हुशारीने त्यात विविधरंगी बदल होत असतात आणि त्यावरच तो देश जगत आलेला आहे.    (लेखातील मते व्यक्तिगत.)

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर