शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

जि. प. शाळा बंद करण्याचा घाट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 08:34 IST

ज्या शाळेत शिक्षक नसतील त्या शाळेत पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी कशाला पाठवतील?

शैक्षणिक वर्ष २०२४-२५च्या बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळांच्या संचमान्यता चुकल्या आहेत. काही शाळांना मुख्याध्यापक पद राहिले नाही. बहुतांश शाळांची शिक्षकांची पदे कमी केली आहेत. विशेष बाब म्हणजे सहावी ते आठवी या वर्गांना अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांची पदे फार कमी करण्यात आली आहेत. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे नववी व दहावी वर्गांना शिकवणाऱ्या माध्यमिक शिक्षकांची पदे शून्य केली आहेत. त्यामुळे बरेच शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश निघत आहेत. जर असे झाले तर शिक्षणक्षेत्राचे वाटोळे होणार आहे. कारण अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्यानंतर बहुतांश शाळांमध्ये शिकवायला शिक्षक राहणार नाहीत. ज्या शाळांच्या संचमान्यता पूर्णपणे चुकल्या आहेत त्या शाळेत फक्त विद्यार्थी असतील, शिक्षक असणार नाहीत.  ज्या शाळेत शिक्षक नसतील त्या शाळेत पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी कशाला पाठवतील? भविष्याची चिंता लक्षात घेऊन पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमधून काढतील. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा आपोआप बंद पडतील. शासनाला नेमके हेच पाहिजे आहे. लवकरात लवकर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायच्या आणि खासगी कंपन्यांना शिक्षणाची मक्तेदारी सोपवून शासन शिक्षण प्रक्रियेतून अंग काढून घ्यायचे. त्यामुळे गोरगरिबांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाची सोय राहणार नाही. यासाठी शिक्षक आंदोलन करत आहेत. पालकांनीही हा धोका वेळीच लक्षात घेतला पाहिजे.- बबन दामोदर गुळवे, उमरगा कोर्ट, ता. अहमदपूर, जि. लातूर 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSchoolशाळा