राजकीय आव्हानेच अधिक

By Admin | Updated: October 31, 2014 00:15 IST2014-10-31T00:15:19+5:302014-10-31T00:15:19+5:30

आपल्या सरकारसमोरची विकासाची आव्हाने देवेंद्र फडणवीस यांना चांगली ठाऊक आहेत. 1999 पासून ते विधानसभेचे सभासद राहिले आहेत

More about political challenges | राजकीय आव्हानेच अधिक

राजकीय आव्हानेच अधिक

आपल्या सरकारसमोरची विकासाची आव्हाने देवेंद्र फडणवीस यांना चांगली ठाऊक आहेत. 1999 पासून ते विधानसभेचे सभासद राहिले आहेत आणि उत्कृष्ट संसदपटूचा सन्मानही त्यांच्या वाटय़ाला आला आहे. विदर्भासारख्या ‘उपेक्षित’ क्षेत्रचे प्रतिनिधित्व आणि मुंबईतील दीर्घकालीन वास्तव्य यामुळे या राज्यातील प्रादेशिक व स्थानिक प्रश्नांची माहितीही त्यांना आहे. अनेक चळवळीत व आंदोलनात भाग घेतल्याने समाजाच्या भावभावनांचीही त्यांना चांगली ओळख आहे. विकास ही न थांबणारी व कधी न संपणारी प्रक्रिया आहे. आजच्या मागण्या पूर्ण झाल्या, की उद्याच्या मागण्यांनी पुढे येणो, हाच त्या प्रक्रियेचा क्रम आहे. त्यामुळे सरकारचे नेतृत्व करणा:याला कधी उसंत मिळत नाही. फडणवीस हे तशा तयारीनिशीच या राज्याची सूत्रे हाती घेतील, याविषयी कोणी शंका बाळगण्याचे कारण नाही. त्यांच्या पुढची तातडीची आव्हाने मात्र राजकीय आहेत आणि ती त्यांना ताबडतोब हाताळावी लागणार आहेत. मनसे हा पक्ष या निवडणुकीत संपला असला, तरी राज ठाकरे या नावाचा निखारा लखलखीत आहे व आपल्यावरची राख तो कधीही दूर करू शकणारा आहे. त्याच्या पक्षाला मते कमी मिळाली असली, तरी त्यांचे आकर्षण कायम आहे आणि मोदींशी त्याचे संबंध सलोख्याचे आहेत. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष त्यांच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा देत असला, तरी राजकारणात बिनशर्त असे काहीच नसते हे फडणवीसांना आता चांगले कळते. राष्ट्रवादीने तिकिटे न देता आपली जी माणसे भाजपात घुसवून त्या पक्षाच्या तिकिटावर विधानसभेत निवडून आणली त्यांच्या ‘ट्रोजन हॉर्स’ स्वरूपाबाबतही फडणवीसांना सावध राहावे लागणार आहे. मेटेंसारख्या माणसाच्या पवारांवरील दशकांच्या निष्ठा एका रात्रीतून वा निवडणुकीतून बदलत नाहीत. त्यांच्यासारखी अनेक माणसे आता राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपात आली आहेत. काँग्रेस पक्षाच्या अनेक पुढा:यांनीही त्यांची पोरे अशीच ऐनवेळी भाजपात घुसवून विधानसभेर्पयत पोहोचवली आहेत. ज्यांच्या जन्मनिष्ठा एवढय़ा पातळ असतात ते नव्या पक्षनिष्ठा व नेतृत्वनिष्ठा यांच्याशी जुळून राहतील याविषयीचा भरवसा बाळगणो धोक्याचे आहे. शिवाय, दुखावलेली शिवसेना आहे. एखाद्या मांजराने उंदराला खेळवावे तसा भाजपाने त्या पक्षाचा खेळ सध्या चालविला आहे. त्यात त्याची दमछाक दयनीय म्हणावी एवढी झाली आहे. द्याल ते घेतो आणि आश्रयाला येतो, असे मनात म्हणत आणि वर ‘तर विरोधात बसू’ अशी बतावणी करीत सेनेचे पुढारी दिवसेंदिवस आपला धीर घालवत असलेले दिसत आहेत. ‘तो आमचा मित्रपक्ष आहे’ असे भाजपाच्या पुढा:यांनी नुसतेच म्हणायचे; पण सेनेशी प्रत्यक्ष बोलणो मात्र टाळायचे यातली जीवघेणी गंमत सध्या राज्य अनुभवत आहे. यात अखेर शिवसेना दाती तृण धरून शरण येणार हे उघड आहे. मात्र, तोवरचा राजकीय डाव रंगविणो हा फडणवीसांच्याही क्रीडापटुत्वाची परीक्षा घेणारा प्रकार आहे. मात्र, फडणवीसांना जाचणारे सर्वात मोठे त्रंगडे नागपुरात आहे आणि ते त्यांच्या पक्षातील आहे. त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसत असतानाही नितीन गडकरी यांनी पक्षाच्या 42 आमदारांना आपल्या वाडय़ावर जमवून ऐनवेळी केलेले शक्तिप्रदर्शन व त्या प्रदर्शनाच्या म्होरक्यांनी ‘गडकरीच मुख्यमंत्री हवेत’ अशी केलेली मागणी बरेच काही व विपरीत काही सांगणारी आहे. मुख्य म्हणजे विदर्भातील हे सारे आमदार फडणवीसांसोबत नाहीत, हे त्यातून गडकरींनी राज्याला दाखवून दिले आहे. ही माणसे स्वयंस्फूर्तीने गडकरींच्या वाडय़ावर आली होती, असे म्हणणो हा भाबडेपणा आहे. गडकरींच्या मनातल्या महत्त्वाकांक्षा त्यातून उघड झाल्या आणि ते दिल्लीत स्वस्थ बसणार नाहीत हेही स्पष्ट झाले. विधानसभेतील पक्षनेतेपदावर फडणवीसांची निवड होत असताना, दिल्लीत एक बैठक बोलवून दिल्लीत राहण्याचे गडकरी यांचे नाटकही बरेच बोलके आहे. त्यांना सांभाळायला संघ आहे. मात्र, त्यांना शमवायला देवेंद्र फडणवीसांनाही त्यांचे कौशल्य बरेच वापरावे लागणार आहे. गडकरी यांनी ऐनवेळी हात दाखवून केलेले हे अवलक्षण आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांचे राजकीय मुरब्बीपण त्यामुळे न ओळखल्यागत होणार आहे. तात्पर्य, राज ठाक:यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव ठाक:यांची शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेली त्यांची माणसे आणि प्रत्यक्ष आपल्या भाजपातील नागपूरस्थित दावेदार यांची राजकीय आव्हाने मोठी आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना ती प्रथम हाताळावी लागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या बळावर व संघाच्या भागवतांच्या मदतीने ते ती चांगली हाताळतील अशी आशा आपण करू या. विकासाची आव्हाने तुलनेने अधिक ओळखीचीच आहेत. 

 

Web Title: More about political challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.