शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

CoronaVirus: कोरोना विजयानंतर बरेच काही बदलून जाईल!

By विजय दर्डा | Published: April 20, 2020 5:35 AM

कडक सुरक्षेनंतर आता आरोग्य व स्वच्छता प्राधान्य असेल

- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूहकाळाच्या ओघात सर्व काही बदलून जाते, असा फार जुना समज आहे; पण इतिहास असे सांगतो की, काही घटना जग बदलून टाकतात किंवा जगाला नाईलाजाने बदलावे लागते. अशा घटना मानवनिर्मित असोत वा नैसर्गिक, पण वास्तव असे आहे की, अशा घटनांनंतर जीवनातील अग्रक्रम व गरजाही बदलून जातात. त्यातून काही नव्या गोष्टींचा उदय होतो. सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटानंतरही असेच बरेच काही बदलून जाणार आहे. अमेरिकेतील ९/११ व मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर जसे बरेच काही बदलले तसेच काहीसे आताही होणार आहे.

दि. ११ सप्टेंबर २००१ पूर्वी जगातील कोणत्याही विमानतळावर आजच्याइतकी कडक सुरक्षा व्यवस्था नसायची. सुरक्षा तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रे वापरली जात नव्हती की, तपासणीसाठी लांब रांगही नसायची; पण ९/११च्या दहशतवादी हल्ल्याने अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगातच नागरी विमान वाहतुकीचे चित्र बदलूून गेले. तो हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने सर्वप्रथम त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यावर लक्ष केंद्रित केले व नंतर हे काम कायमस्वरूपी दक्षतेने व्हावे यासाठी ‘ट्रान्स्पोर्टेशन सिक्युरिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ हा स्वतंत्र विभागच सुरू केला. सुरक्षित प्रवासासाठी अधिक कडक नियम तयार केले गेले. जगातील इतर देशांनीही नंतर त्याचे अनुकरण केले. अमेरिकेखेरीज इस्रायल, रशिया, फ्रान्स व चीन या देशांनी याबाबतीत खूप प्रगती केली आहे. आता तर विमानतळांवरील सुरक्षा तपासणी थक्क व्हावे इतकी कसून करणारी यंत्रे आहेत. तुमच्या बॅगेत ठेवलेल्या पेनमध्ये शाईऐवजी अन्य काही भरलेले असेल, तर अशी बॅग ही यंत्रे क्षणार्धात ओळखून बाजूला काढतात. अनेक विमाने हवेत उडत असताना आकाशातून वीज पडली तरी ती निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली करण्यात आली आहेत. काही विमाने तर क्षेपणास्त्राचा हल्लाही परतवू शकतील एवढी अत्याधुनिक आहेत.९/११चा आणखी एक असा परिणाम झाला की, मोठमोठ्या कंपन्यांनीही कडक सुरक्षेचे जेवढे काही उपाय योजणे शक्य होते ते २४ तासांत लागू केले. त्यानंतर तर अमेरिकेचा ‘सिक्युरिटी’ हा एक स्वतंत्र उद्योग बनला व तो खूप फोफावला. अजूनही त्या उद्योगाची सद्दी सुरूच आहे. २०१५ ते २०१९ या काळात ‘सिक्युरिटी उद्योगा’चा विकासदर अडीच टक्क्यांहून जास्त राहिला आहे.
आता जरा भारताविषयी बोलू. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी महाभयंकर दहशतवादी हल्ला झाला आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा चोख बंदोबस्त करणे, हे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे, याची आपल्याला सर्वप्रथम जाणीव झाली. आपल्या गुप्तचर यंत्रणा अत्यंत सक्षम असायला हव्यात. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत कडक नजर ठेवण्याची व्यवस्था हवी, हेही प्रकर्षाने जाणवले. त्यानंतर भारतात अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी ‘क्लोज्ड सर्किट कॅमेरे’ बसविण्याचे काम वेगाने केले गेले. दूरवरूनही अत्यंत सुस्पष्ट चित्रे टिपणारे (हाय रेझोल्युशन कॅमेरे) व अन्य अनेक प्रकारची अत्याधुनिक सुरक्षा साधने बनविणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात उतरल्या. आज हा उद्योग मोठ्या तेजीत सुरू आहे. त्यांचा वार्षिक विकासदर २० ते २५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. दरमहा २० लाख सिक्युरिटी कॅमेऱ्यांची विक्री होत असते. गेल्या तीन वर्षांत भारतातील सुरक्षा व निगराणी साधनांच्या विक्रीची वार्षिक उलाढाल ८ हजार २०० कोटींवरून ११ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यावर्षी ही उलाढाल २० हजार कोटी रुपये होण्याची अपेक्षा आहे; परंतु सुरक्षेच्या बाबतीत सर्वोत्तम कामगिरी चीनची आहे. तेथे प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी कानाकोपऱ्यात कॅमेरे लावलेले आहेत. ‘फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजी’ने चीन प्रत्येक नागरिकाच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवू शकतो.
सांगायचे तात्पर्य असे की, आताही कोरोनानंतर अशाच प्रकारे आपले आयुष्य बरंच बदलून जाईल. आपली आताची स्थिती पाहता भारतात तर बरेच बदल घडू शकतात. कोरोनावर विजय मिळविल्यानंतर ‘हेल्थ अ‍ॅण्ड हायजिन’ हे आपले सर्वोच्च प्राधान्य असेल. व्यक्तिगत आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता याला आपण कित्येक वर्षे महत्व दिले नाही, हे खरंच दुर्दैव आहे. सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सन २०१८ मध्ये भारतात एकूण ‘जीडीपी’च्या फक्त १.२८ टक्के खर्च सार्वजनिक आरोग्यावर केला गेला. त्याआधी ही रक्कम जेमतेम एक टक्का असायची. अमेरिकेसारख्या विकसित देशातही सार्वजनिक आरोग्यावरील खर्चाचे प्रमाण आजही ‘जीडीपी’च्या ४.६ टक्के एवढेच आहे. अमेरिकेची ‘जीडीपी’ आपल्या तुलनेत कितीतरी पटींनी जास्त आहे.कोरोनामुळे आरोग्याच्या बाबतीत जे भीतीचे वातावरण तयार झाले आहे, ते पाहता नजीकच्या भविष्यात भारतात आरोग्यसेवा चांगल्या प्रतीच्या व सामान्यांना परवडणाºया होतील, अशी आशा करूया. अशी अपेक्षा करूया, सरकारी रुग्णालयांची अवस्था सुधारेल व अतिदक्षता कक्षात जशी स्वच्छता असते, तशीच संपूर्ण रुग्णालयात पाहायला मिळेल. सार्वजनिक स्वच्छेतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकारांनी आधीपासून लढा उभारला आहे. आता बदललेल्या परिस्थितीत सामान्य माणूस या स्वच्छतेच्या मोहिमेत सक्रियतेने सहभागी होईल व व्यक्तिगत तसेच सार्वजनिक स्वच्छतेविषयी जागृती नक्कीच वाढेल. नागरिकांची घरे व कामाची ठिकाणे आरोग्यसंपन्न कशी ठेवावीत, कोणती काळजी घ्यावी व काय करायचे टाळावे, यासंबंधीची मार्गदर्शिकाही सरकारकडून काढली जाऊ शकेल. ‘हेल्थ अ‍ॅण्ड हायजिन’ हा एक मोठा उद्योग उदयास येईल. साबण, सॅनिटायझर, मास्क व काही औषधांच्या मागणीत खूप मोठी वाढ होईल.
कोरोना कालखंडानंतर आणखीही काही बदल होतील. किचन व कॅटरिंगचे स्वरूप बदलेल. हायजिनवर सर्वांत जास्त लक्ष दिले जाईल. लोक योग व व्यायामाकडे वळतील. शिक्षण संस्थांमध्येही बदल होतील. देशात ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर अंगीकार केला जाईल. विमान प्रवासाची पद्धतही बदलेल. मास्कचा वापर सार्वत्रिक व सार्वकालिक होईल. कदाचित काही गोष्टी आपल्या आयुष्यातून कायमच्या हद्दपारही होतील. अगदीच घनिष्ट नाते असल्याशिवाय आपण सहजपणे कोणाचीही गळाभेट घेणार नाही. शेकहँडच्याऐवजी प्रणाम व नमस्ते ही स्वागताची नवी रीत बनेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या