शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 06:27 IST

दुबार मतदार दिसला की त्याला बडवा, असा ‘आदेश’ ठाकरे बंधूंनी दिला आहे. पण काँग्रेसला तो कितपत रुचेल हा प्रश्नच आहे.

महा-मनसे, असे नवीन समीकरण शनिवारच्या मुंबईतील ‘सत्याचा मोर्चा’मध्ये बघायला मिळाले. महाविकास आघाडी अधिक राज ठाकरे यांचे शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महा-मनसे असे समीकरण कायम राहण्याची शक्यता कमी असली, तरी सहभागी झालेल्या प्रत्येकच पक्षाला या मोर्चाने ताकद दिली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘अशीच एकजूट ठेवा’, हा जो सल्ला त्यांच्या भाषणात दिला त्याचा सन्मान करत सगळे निवडणुकीतही एकत्र राहतील, याची खात्री आज कोणीही देऊ शकत नाही. २०१९ मध्ये टोकाचे वैचारिक मतभेद असलेल्या पक्षांना एकत्र आणले होते आणि उद्धव ठाकरेंचे सरकार स्थापन झाले. आता तोच धागा पुढे नेत राज ठाकरेंनाही सहभागी करून घेतले, तर त्याचा फायदा विरोधकांना होईल.

भाजप-महायुतीच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटून लढतील न लढतील; परवाच्या मोर्चाने विरोधकांमध्ये जान आणण्याचे काम निश्चितच केले आहे. काँग्रेस या मोर्चात सहभागी होणार की नाही, याविषयी माध्यमांतून अनिश्चितता व्यक्त केली जात होती, पण बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे मोठे नेते आले. बिहार निवडणुकीची किनार असल्याने राज यांच्याबरोबर दिसू नये म्हणून आणि ‘एकला चलो रे’च्या मार्गावर प्रदेश काँग्रेसला नेण्याची इच्छा असल्याने हर्षवर्धन सपकाळ सहभागी झाले नसावेत, पण त्यामुळे विरोधकांची एकजूट रोखली गेली नाही. शरद पवार आणि काँग्रेस या दोघांचा मोर्चात सहभाग असला, तरी वरचष्मा ठाकरे बंधूंचाच होता. मुळात शिवसेनेचे राजकारण हे आक्रमक वा हिंसक प्रतिक्रियेचे राहिले आहे आणि काही वर्षांपासून दुरावलेले राज ठाकरे आता उद्धव यांच्यासोबत आल्याने खळ्ळखट्ट्याकच्या दिशेने ते पुन्हा एकदा जाताना दिसत आहेत. मतचोरी आणि दुबार मतदार दिसला की, त्याला बडवा, असा ‘आदेश’ ठाकरे बंधूंनी मोर्चात दिला आहे. काँग्रेसला तो कितपत रुचेल हा प्रश्नच आहे.

अशा हिंसक प्रतिक्रियेचे राजकारण काँग्रेस कधीही करत नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी मंचावरून बडवातुडवाची भाषा केली, तेव्हा थोरातांना कसनुसे झाले असेल. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि तेव्हाच्या एकत्रित राष्ट्रवादीसोबत गेले, तेव्हा तिघांमध्ये लिखित असा कोणताही किमान समान कार्यक्रम नव्हता. मात्र, स्वत:ला कुठे मुरड घालायची याचे भान  उद्धव ठाकरे यांनी ठेवले आणि काँग्रेस-शरद पवारांच्या धर्मनिरपेक्ष राजकारणाला छेद जाईल,  त्यातून अंतर्गत मोठे मतभेद निर्माण होऊन महाविकास आघाडी फुटेल, अशी कोणतीही भूमिका त्यांनी घेतली नाही. मात्र, राज ठाकरे यांना भविष्यात सोबत घेतले, तर ते अशी समंजस भूमिका घेतीलच याची खात्री नसल्याने त्यांना महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाचीही तयारी दिसत नाही.

राज यांचे लहरी राजकारण काँग्रेसच्या पचनी पडणार नाही. मात्र, कालच्या मोर्चाला मिळालेला मोठा प्रतिसाद लक्षात घेता भाजपविरोधात सगळ्यांनीच एकत्र यायला हवे, अशी लोकेच्छाही दिसून आली. या लोकेच्छेचा सन्मान झाला अन् सगळे एकत्र राहिले, तर मुंबईसह राज्यात वेगळे चित्र दिसू शकेल. मतदार याद्यांमधील घोळाविरुद्ध विरोधक एकवटले आहेत, पण याबाबत त्यांच्या भूमिकांमध्ये मात्र विसंगती दिसते. ‘मतदानाला आलेला कोणी मतचोर वा दुबार मतदार दिसला, तर त्याला बडवा’ असे ठाकरे बंधू म्हणतात, तेव्हा निवडणुका होणार याला त्यांचा विरोध नसल्याचे त्यातून ध्वनीत होते. त्याचवेळी वर्षभर निवडणुका नाही झाल्या, तर काय फरक पडतो, असेही राज ठाकरे म्हणतात. मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका होताच कामा नयेत, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. सदोष मतदार याद्यांवरून न्यायालयात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणतात. हे सगळे बघता कालच्या मोर्चाने विरोधकांची एकजूट दाखविली असली, तरी त्यातील भाषणे बघता भूमिकेबाबत एकवाक्यतेचा अभाव दिसतो. एकजूट दाखवतानाच भूमिकेची एकवाक्यताही विरोधक दाखवू शकले, तर त्यांना अधिक बळकटी मिळू शकेल. दुसरीकडे राज्य निवडणूक आयोग चार-पाच दिवसांत नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या तयारीत आहे. अशावेळी महा-मनसे नेमकी काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maha-MNS Joins MVA in 'Truth' March: A Powerful Display

Web Summary : The 'Truth' march showcased a united opposition, Maha-MNS, against BJP. While future alliances are uncertain, the march boosted each party's strength. Despite differing views on election approaches, the united front signals potential shifts in state politics as local elections loom.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस