शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

जगाला वेड लावणारे (पडद्यावरचे) महात्मा गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 10:39 IST

Mahatma Gandhi : चित्रपट न आवडणाऱ्या एका माणसावर सिनेमा इंडस्ट्रीने इतके प्रेम केले, की जगातील सर्वाधिक चित्रीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये गांधींचे नाव घेतले जाते.

- प्रकाश मगदूम  (सनदी अधिकारी, चित्रपट अभ्यासक)जगातील सर्वाधिक फोटो ज्यांचे घेतले गेले आहेत आणि सर्वांत जास्त चित्रीकरण ज्यांच्यावर झाले आहे, अशा व्यक्तींमध्ये मोहनदास करमचंद गांधी यांचे नाव घेतले जाते. गांधींचा जन्म होऊन १५०हून जास्त वर्षे झाली आहेत आणि त्यांच्या मृत्यूला सोमवारी ७५ वर्षे झाली. तरीसुद्धा हलत्या बोलत्या चित्रांचे जे सिनेमा नावाचे माध्यम आहे त्यामध्ये या माणसाविषयीचे कुतूहल काही कमी होत नाही. यातला विरोधाभास असा की, गांधींना सिनेमा आवडत नव्हता. केवळ वेळ वाया घालवण्याची ही गोष्ट असून, त्यापासून काहीही फायदा होत नाही, उलट नुकसानच होते, असे त्यांचे मत होते आणि त्यावर ते शेवटपर्यंत ठाम राहिले.  

गांधींचे जीवन हे अनेक चमत्कारी गोष्टींनी भरलेले आहे आणि त्यातील नाट्याकडे अनेकानेक चित्रपट दिग्दर्शकांचे लक्ष आकृष्ट झाले. मध्यमवर्गीय घरात जन्मलेला एक लाजरा - बुजरा युवक इंग्लंडमध्ये शिक्षण घेतो, आफ्रिकेत जाऊन स्वबांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी यशस्वी प्रयत्न करतो आणि भारतात परत येऊन बलाढ्य अशा ब्रिटिश साम्राज्याविरूध्द स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करतो, तेही अहिंसात्मक पद्धतीचा अवलंब करून! या सर्व गोष्टी चित्रपट उद्योगासाठी कथानक म्हणून पूरक होत्या. अशा प्रकारे त्यांची मूल्ये आणि तत्वे यावर विविध भाषांमध्ये आणि वेगवेगळया कालावधीमध्ये चित्रपट बनले. त्यांच्या जीवनाचा सर्वांगीण आढावा घेणारे चरित्रपट बनले. गांधीजी जिवंत असते, तर सध्याच्या प्रश्नावर त्यांची काय भूमिका असती, असा कल्पनाविलास करूनसुद्धा कलाकृती बनवल्या गेल्या.या सर्व विषयांपैकी गांधींची हत्या हा विषय चित्रपट उद्योगाला कायमच खुणावत आला आहे. एका अहिंसेच्या पुजाऱ्याला निःशस्त्र अवस्थेत वयाच्या ७८व्या वर्षी गोळ्या घालून ठार केले जाते आणि सर्व जगाला मोठा धक्का बसतो. मानवतेला काळिमा फासणारी ही कृती ज्या पद्धतीने घडली, ज्या काळात घडली, त्या पार्श्वभूमीचा  विचार करता चित्रपट उद्योगाला त्यामध्ये नाट्य जाणवले. त्यामागे विचारधारेचा संघर्ष जाणवला. 

गांधींच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये पुन्हा एकदा या विषयाकडे लक्ष वेधले गेले आणि At Five Past Five हा चित्रपट निर्माण झाला. सुरुवातीचे काही क्षण पडद्यावर अंधारच दिसतो. थोर संगीतकार वसंत देसाई यांनी पार्श्वसंगीत दिलेले गांधींच्या आवडत्या वैष्णव जन तो... या अभंगाचे सूर फक्त ऐकायला येतात. मग भिंतीवरचे घड्याळ दुपारचे ३:३० ही वेळ दाखवते. अतिशय तणावाखाली असणारा एक तरुण हातात पिस्तूल खेळवताना दिसतो. खून करण्याचा पक्का इरादा असणाऱ्या मारेकऱ्यासाठीसुद्धा प्रत्यक्ष गुन्हा करण्यापूर्वीचे काही क्षण चलबिचल करणारे असतात. त्यानंतर एक मोठा आवाज ऐकायला येतो, ‘सर्वांसमोर तुला मारले जाईल !’ - प्रत्यक्ष नावाने उल्लेख केला नसला तरी हे स्पष्ट केले जाते, की मरणाऱ्या व्यक्तिचा जन्म पोरबंदरमध्ये झाला आहे.

ललित सहगल यांनी लिहिलेल्या ‘हत्या एक आकार की’ या हिंदी नाटकावर आधारित हा चित्रपट कुमार वासुदेव यांनी दिग्दर्शित केला होता. फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी असलेल्या वासुदेव यांनी नंतर ‘हमलोग’ या दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शन केले होते. 

कथानक असे आहे की, हत्येच्या कटात सहभागी असलेले चार साथीदार एकत्र जमले आहेत आणि त्यावेळी एक जण अचानक माघार घेतो. त्याच्या मते त्यांचा विरोध विचारसरणीला आहे, व्यक्तिला नाही. त्यामुळे ही हत्या अनावश्यक आणि चुकीचे कृत्य आहे. आपली विवेकबुद्धी जागृत असलेल्या या माणसामुळे बाकीचे साथीदार चिंतेत पडतात. मग असे ठरते, की एक आभासी कोर्ट बोलावून त्यासमोर निवाडा करायचा. बाकीच्या पात्रांपैकी एक जण वकील, एक जण न्यायाधीश आणि तिसरा इतिहासाचे प्रतिनिधित्व करतो, अशा प्रकारे कोर्टाचे कामकाज सुरू होते. आरोपी म्हणून विवेकबुद्धी जागृत असलेल्या या माणसाला पिंजऱ्यात उभे केले जाते आणि आरोपांचे उत्तर देण्याची जबाबदारीही त्याच्यावर टाकली जाते. आरोप म्हणून विचारले जाणारे प्रश्न म्हणजे गांधींवर घेतले जाणारे ठरावीक आक्षेप असतात.

मुस्लिमांचे लांगूलचालन, नेताजी बोससारख्यांचे खच्चीकरण, भगतसिंग इत्यादी क्रांतिकारकांचा बचाव न करणे... या प्रत्येक आरोपांचे खंडन मुद्देसूद पुराव्यासकट आणि तेही गांधींचे शब्द आणि लेखन यांचा वापर करून केले जाते. या कोर्टामध्ये सर्वसामान्य जनतासुद्धा हजर असते आणि गांधींच्या प्रत्येक उत्तराला टाळ्या वाजवून पाठिंबा देते. त्यामुळे हे गुन्हेगार आणखीन बावचळतात. पण, शेवटी हा सर्व साळसूदपणे केलेला बनाव असतो. आरोपीला दोषी ठरवायचेच असते आणि न्यायाधीश शेवटी तसे फर्मावतो. १९६९ मध्ये झालेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गांधी पुरस्काराने वासुदेव यांना सन्मानित करण्यात आले.

हा चित्रपट इंग्रजी भाषेत बनवला होता. त्यामुळे जास्त प्रेक्षकांपुढे तो पोहोचू शकला नाही. दुसरी बाब म्हणजे, चित्रपट एक तासाचा होता. त्यामुळे नेहमीच्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबरोबर दाखवला जाणे अवघड बनले. त्यासाठी वेगळा वेळ राखून ठेवणे हे व्यावसायिक गणितात बसले नाही. म्हणून केवळ आमंत्रितांसाठी असे काही शो झाले. त्याव्यतिरिक्त हा चित्रपट कोणालाही पाहायला मिळाला नाही. चित्रपट न आवडणाऱ्या एका माणसावर सिनेमा इंडस्ट्रीने इतके प्रेम केले की, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जगातील सर्वाधिक चित्रीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये गांधींचे नाव घेतले जाते. अजूनही या जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाविषयी कुतूहल जागृतच आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर, त्यांच्या मूल्यांवर आधारित चित्रपट बनत राहतील..(प्रकाश मगदूम यांच्या The Mahatma on Celluloid : A Cinematic Biography या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकानिमित्त...)(लेखातील मते वैयक्तिक आहेत.)

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत