शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
NASA : नासाचा मोठा निर्णय!इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
4
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
5
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
6
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
7
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
8
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
9
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
10
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
11
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
12
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
13
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
14
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
15
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
16
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
17
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
18
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
19
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
20
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."

आजचा अग्रलेख: ‘प्रहार’ की ‘हार’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 06:13 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितरक्षणाकरिता ५९ वर्षांपूर्वी स्थापन केलेली शिवसेना साठीत प्रवेश करताना इतकी जराजर्जर झालेली असेल ...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितरक्षणाकरिता ५९ वर्षांपूर्वी स्थापन केलेली शिवसेना साठीत प्रवेश करताना इतकी जराजर्जर झालेली असेल व तिला तिच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागेल, असे बाळासाहेबांना स्वप्नातही वाटले नसेल. बाळासाहेब हे धर्म, कर्मकांड वगैरे न मानणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव. बाळासाहेबांनी राजकारणात  वेळोवेळी ज्या भूमिका घेतल्या त्या त्यांच्यावर निष्ठा असलेल्या शिवसैनिकांनी स्वीकारल्या. 

शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेत भाजपचे प्रमोद महाजन व अन्य नेत्यांना भविष्यातील उत्कर्षाची शिडी दिसली. भाजपने शिवसेनेसोबत युती केली. ठाकरे यांचे बुक्के व कधीकधी लाथा सुद्धा हसत सहन केल्या. नरेंद्र मोदी यांचा उदय झाल्यावर आणि बाळासाहेब निवर्तल्यावर मात्र परिस्थिती बदलली. भाजप मोठा भाऊ झाला आणि शिवसेनेकडे धाकलेपण आले. हे धाकलेपण स्वीकारायला उद्धव ठाकरे तयार झाले नाहीत. अडवाणी-महाजन यांनी मातोश्रीवर जाऊन जसे हात जोडले तसे ते आता उद्धव-आदित्य यांनी दिल्लीला जाऊन जोडावे ही भाजपची अपेक्षा होती. मात्र ‘झुकेगा नही’ हा बाणा उद्धव यांनी ठेवला.

गुरुवारच्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणातही आपण भाजपवर ‘प्रहार’ करण्यास सिद्ध आहोत याच पवित्र्यात ते होते व त्यामुळे त्यांनी भाजप व त्यांच्या मित्रांना ‘कम ऑन किल मी’ असे आव्हान दिले. मात्र ‘मला संपवायला येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या’ अशी डायलॉगबाजीही त्यांनी केली. उद्धव हे बाळासाहेब यांचे पुत्र व त्यांनी त्यांच्या हयातीत निश्चित केलेले वारस. मात्र बाळासाहेबांची शिवसेना निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे या शिवसैनिकाकडे सोपवली. छगन भुजबळ, नारायण राणे या ठाकरे यांच्या सहकाऱ्यांनाही जे जमले नाही ते शिंदे यांनी करून दाखवले.  त्यामुळेच ते मुख्यमंत्री बनले. शिंदे यांनीही वर्धापन दिनाचा जंगी कार्यक्रम केला.

शिंदेसेना आता महायुतीच्या सत्तेत ‘लहान भाऊ’ असली, तरी तिचाही सुप्त संघर्ष भाजपच्या नेत्यांसोबत सुरू आहे. मात्र शिंदे यांच्या भाषणात त्यांनी लक्ष्य केले ते उद्धव यांनाच. काट्याने काटा काढण्याचा भाजपचा डाव यशस्वी झाला, हे खरे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव यांची बहुमताची सत्ता आली नाही तर भाजप वाट्टेल ते करून आपल्या मनमर्जीची सत्ता बसवेल. अशा परिस्थितीत शिंदेसेना किंवा मनसेलाही महापौरपदाची लॉटरी लागू शकते. मात्र ठाकरेंचा काटा काढल्यावर मग  शिंदेसेना, मनसे यांची उपयुक्तता भाजपकरता हळूहळू लोप पावायला लागेल. भाजपचा हा खेळ उद्धव, राज व शिंदे यांच्या लक्षात आला आहे. 

मात्र राजकीय सारीपटावरील सोंगट्या भाजप आपल्या इच्छेनुसार हलवू शकतो, ही सध्याची स्थिती आहे. येथेच उद्धव यांच्या भाषणातील मनसेसोबत युती करण्याचा मुद्दा चर्चेत येतो. ‘महाराष्ट्राच्या मनात आहे ते करायला तयार आहे’, असे जाहीर करून उद्धव यांनी मनसेसोबत महापालिका निवडणुकीत युतीचे संकेत दिले. मात्र २०१४ व २०१७ च्या निवडणुकीत युतीचे गाजर दाखवून उद्धव यांनी ऐनवेळी दगा दिल्याने मनसे नेत्यांच्या मनात शंका आहे. युतीकरिता झुलवत ठेवून ऐनवेळी दगा द्यायचा व मनसेला बदनाम करायचे, असा उद्धव यांचा कावा तर नाही ना? - अशी शंका मनसे घेत आहे. उद्धव-राज यांची युती ही यावेळी उद्धव यांची अधिक गरज आहे. त्यामुळे मुंबईतील दादर, माहीम, परळ, वरळी वगैरे मराठी लोकवस्तीमधील १०० ते १२५ जागांपैकी जास्तीत जास्त जागा मिळवण्याकरिता मनसे यावेळी आग्रही भूमिका घेऊ शकते. तशी भूमिका मनसे घेईल असे मानले जात आहे. याचा अर्थ उद्धव यांना आपल्या ताटातला वाटा काढून भावाला द्यायचा आहे. याला उद्धव तयार होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुजराती व हिंदी भाषिकबहुल मतदारसंघात स्वत: लढून भाजप मराठी मतदारांचा वरचष्मा असलेले प्रभाग मनसेला हसत देऊ शकते. याचा अर्थ, उद्धव यांना भाजपला शह द्यायचा असेल तर राज यांच्याशी तडजोड करावीच लागेल. 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे