शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

संचारबंदीतील शिदोरी, महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिसंयमाचा पंधरवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 06:26 IST

Maharashtra Lockdown : गेल्या वर्षभरात लॉकडाऊन हा शब्द बदनाम झाला असल्याने तो न वापरता फौजदारी दंडसंहितेतील १४४व्या कलमाचा आधार घेऊन १ मे, महाराष्ट्र दिनाच्या सकाळपर्यंत संचारबंदी नावाने ही घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

गेला आठवडाभर सरकारी बैठकांमध्ये घुटमळणारी कोरोना विषाणू प्रतिबंधक टाळेबंदी महाराष्ट्रात बुधवारी रात्रीपासून नाव बदलून लागू झाली आहे. गेल्या वर्षभरात लॉकडाऊन हा शब्द बदनाम झाला असल्याने तो न वापरता फौजदारी दंडसंहितेतील १४४व्या कलमाचा आधार घेऊन १ मे, महाराष्ट्र दिनाच्या सकाळपर्यंत संचारबंदी नावाने ही घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. सोबतच या टाळेबंदीमुळे रोजीरोटीची चिंता लागलेल्या गरीब वर्गाला उद्देशून, रोजी थांबली तरी रोटी थांबणार नाही, असा कृतिशील दिलासा दिला. समाजातील अशा बहुतेक सगळ्या गरीब घटकांना मदतीचे एक साधारणपणे साडेपाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्याशिवाय, जिल्हास्तरावर कोविड संक्रमण रोखण्यासाठी तेहतीसशे कोटींचा आपत्कालीन निधी उपलब्ध असल्याचे सांगितले. मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी ज्या आपुलकीने व विस्ताराने या मदतीचे तपशील जाहीर केले, ते पाहता गेल्यावर्षी अचानक लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांचे जसे हाल झाले, तसे यावेळी होणार नाहीत, अशी आशा करता येईल. अन्नसुरक्षा योजनेचा आधार घेऊन अंत्योदय योजना, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना एक महिना प्रतिमाणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत मिळेल.

बीपीएल व अंत्योदयमधील पिवळे तसेच प्राधान्य गटातील केशरी रेशन कार्डधारकांची महाराष्ट्रातील संख्या दीड कोटींच्या घरात आहे. त्यांचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी या लाभार्थींचा आकडा सात कोटी सांगितला आहे. याशिवाय बांधकाम कामगार, नोंदणीकृत फेरीवाले, परवानाधारक रिक्षाचालक, घरेलू कामगार, खावटी कर्जासाठी पात्र असणारी आदिवासी कुटुंबे तसेच निराधार लोक, विधवा, दिव्यांग अशा अत्यंत दुबळ्या समाजघटकांचा विचार सरकारने केला आहे. केवळ पंधरा दिवसांची संचारबंदी लागू करतानाही उचललेले ठाकरे सरकारचे हे पाऊल स्वागतार्ह आहेच, शिवाय गेला आठवडाभर मंत्रालयात कोणत्या मुद्द्यावर विचारमंथन चालू होते, याची कल्पनाही देणारे आहे. यातून एखादा घटक राहिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, तसे असेल तर त्यावर गहजब करण्याची गरज नाही.

सरकार दुरुस्तीही करू शकेल. ही वेळ राजकारणाची व टीकाटिप्पणीची अजिबात नाही. त्याऐवजी सगळ्यांनी एकत्र येऊन संकटाचा सामना करणे हीच खरी गरज आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर आपला देश व संपूर्ण जग कोरोना विषाणू संक्रमणाच्या भयावह स्वरूपात मानवजातीवरील एका अतिभयंकर संकटाचा सामना गेल्या सव्वा वर्षापासून करीत आहे. हे संकट इतके अक्राळविक्राळ आहे की सामान्य स्थितीमध्ये उपयुक्त वाटणाऱ्या, ठरणाऱ्या आरोग्यविषयक सर्व सार्वजनिक सोयीसुविधा अपुऱ्या पडत आहेत. हा फक्त आरोग्याचा प्रश्न राहिलेला नाही. लहान असो की मोठा, गरीब असो की अमीर, प्रत्येकाच्याच उपजीविकेचे मार्ग संकटात आहे.

अर्थकारणाचा गाडा रुळावरून घसरला आहे. उद्योग-व्यवसायाला जबर फटका बसला आहे. मधल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला जात असतानाच संक्रमणाची ही दुसरी लाट आली. ती पहिलीपेक्षा दाहक व घातक आहे. विषाणू सतत त्याचे रूप बदलतो आहे. बाधितांमधील लक्षणे दर आठ-दहा दिवसाला बदलत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशावेळी माणसांचे जीव वाचविण्यासाठी कुणीतरी वाईटपणा घेऊन पाऊले उचलण्याची गरज होती. भाजीपाला व इतर शेतमालाचा बाजार, दूध, औषधे आदींसह जीवनावश्यक वस्तूंचा व्यवहार, अत्यावश्यक सेवा यांसोबतच सार्वजनिक वाहतूक, लोकल रेल्वे बंद न ठेवता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारने टीकेची पर्वा न करता ती उचलली आहेत. सोबतच रोगाने जाणारे जीव वाचविताना उपासमारीने ते जाऊ नयेत, यासाठी तजवीज केली आहे.

सरकारच्या या प्रयत्नांना साथ देण्याची जबाबदारी आता जनतेवर आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी हा अतिसंयमाचा पंधरवडा आहे. हा संयम अगदीच अशक्य होईपर्यंत घरी थांबण्याचा आहे. घराबाहेर पडायची वेळ आलीच तर पुरेसे शारीरिक अंतर राखणे, चेहऱ्यावर सतत मास्क वापरणे आणि कोणत्याही व्यक्ती, वस्तूच्या संपर्कात आल्यास हात सॅनिटाइझ करण्याच्या शिस्तीचे हे दिवस आहेत. केंद्र व राज्य सरकार काय करतेय, काय करीत नाही, सत्ताधारी कसे वागताहेत, विरोधक काय टीका करताहेत, अधिकारी-कर्मचारी व एकूणच सरकारी यंत्रणा किती कार्यक्षम आहे, वगैरे सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करून केवळ स्वत:ची, कुटुंबीयांची, आप्तमित्रांची काळजी करण्याचे हे पंधरा दिवस आहेत. संयम व शिस्तीने हे दोन आठवडे काढले तरच विषाणू संक्रमणाची साखळी तोडणे शक्य होईल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस