शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

वैश्विक मूल्यांची मांडणी करणारा महाकवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 00:26 IST

अलौकिक प्रतिभावंत कविकुलगुरू कालिदासाचे स्मरण आजही आषाढाच्या पहिल्या दिवशी शब्दोत्सवातून साजरे होते.

- विजय बाविस्करआषाढातील पहिल्या दिवशी सर्जनशील निसर्गाने आसमंतात नवनिर्मितीची प्रक्रिया आरंभ केलेली असते. पावसाचे जे नवचैतन्य निसर्गात अवतरते, त्यातून कालिदासाच्या ‘आषाढस्य प्रथमे दिवसे’ या ओळी ओठांवर रेंगाळू लागतात. या ओळींच्या रूपाने कालिदासाच्या स्मृती तनामनात ताज्या होत राहतात.कालिदासाच्या साहित्यात निसर्गाला विशिष्ट स्थान आहे. त्याचे ऋतुसंहार काव्य म्हणजे तर निसर्गाचा जीवनपटच आहे. ‘मेघदूता’तील यक्षाची विरहभावना आकाशाच्या निळाईवर रंगरेषेसारखी उजळते, तर त्याच्या पत्नीच्या विरहमूर्तीला निसर्गछटांची सोनेरी किनार लाभते. ‘कुमारसंभव’ आणि ‘रघुवंश’मध्ये निसर्गातील चित्रणाबरोबर वसंतवैभवाचा उत्सवही ओसंडला आहे.संस्कृत साहित्यात ‘कालिदास’ हा भारतीय संस्कृतीचा प्रातिनिधिक कवी मानला जातो. महाकवी, भावकवी व नाटककार या तिन्ही भूमिकांमधून तो समर्थपणे उभा राहतो. निसर्गात ॠतुचक्राचे माणसाच्या दैनंदिन जीवनावर आणि मनावरही पडसाद उमटतात. निसर्गाच्या ॠतूंप्रमाणेच माणसाचे मनही रंग बदलत असते. हे जाणणारा निसर्गसौंदर्याला, मानवी भावभावनेला व जगण्याच्या वास्तवाला शब्दसौंदर्याने फुलवणारा हा ‘महाकवी’ वैश्विक मूल्यांची मांडणी आपल्या रचनांमधून करतो. संस्कृत वाङ्मयाच्या या थोर नाटककारास जयदेव कवीने ‘कविकुलगुरू’ अशी पदवी दिली. बाण कवीने त्याच्या काव्याचे वर्णन ‘मधुररसाने थबथबलेली मंजिरीच’ असे केले आहे.इतिहास, पुराणे, अद्वैतवेदान्त, ज्योतिषशास्त्र, वैद्यक, गणित, व्याकरण, अर्थशास्त्र, संगीत, चित्रकला आदी शास्त्रे व कलांचा अभ्यासक असा कालिदास ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकातला राजा विक्रमादित्य याच्या पदरी असलेल्या नवरत्नांपैकी एक. याचे वास्तव्य मध्य प्रदेशात; परंतु बंगाल, ओडिशा, काश्मीर अशा प्रदेशांतही त्याने वास्तव्य केले. त्याच्या काव्यात या सर्व ठिकाणच्या निसर्गसौंदर्याचे अप्रतिम वर्णन चपखलपणे आढळते. हिमालयावरील त्याचे विशेष प्रेम ‘मेघदूत’ या काव्यात प्रकटले आहेच. विद्येबाबत व गुरूंबद्दल त्याला नितांत आदर होता. शृंगारात त्याची वृत्ती अधिक रमत असे. ही वस्तुस्थिती असली तरी तो स्वैराचारी नव्हता. विनोदी, विनयसंपन्न, निरलस आणि वत्सल अशी त्याची प्रतिमा होती. ‘शाकुंतल’ या नाटकात कालिदासाच्या सर्वस्पर्शी प्रतिभेची साक्ष आढळते. प्रसिद्ध जर्मन कवी गटे याने, ‘स्वर्ग व पृथ्वी यांचे मधुर मिलन जर कुठे पाहायचे असेल, तर मी कालिदासाच्या ‘शाकुंतल’कडे निर्देश करीन,’ असे गौरवोद्गार काढले आहेत. कोणतीही गोष्ट त्याग व तपस्या यांच्या आधारावरच दिव्य बनते, असे त्याचे ठाम मत होते. त्यामुळेच अद्वितीय श्रेष्ठत्व असलेल्या या कविकुलगुरूचे स्मरण आजही आषाढाच्या पहिल्या दिवशी शब्दोत्सवातून साजरे होते. 

टॅग्स :newsबातम्याcultureसांस्कृतिक