शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

प्रेम खरं तर खुर्चीवरच असतं..!

By अतुल कुलकर्णी | Updated: April 11, 2018 04:00 IST

कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे...’ ही कविता लिहिली, ती त्यांच्या काळातली. आज काळ बदलला. त्यामुळे त्यांची क्षमा मागून त्यांची आजच्या काळातली कविता...

कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे...’ ही कविता लिहिली, ती त्यांच्या काळातली. आज काळ बदलला. त्यामुळे त्यांची क्षमा मागून त्यांची आजच्या काळातली कविता...प्रेम खरं तर खुर्चीवरच असतं आणिखुर्ची म्हणजेच आमचं पहिलं प्रेम असतं!तुमच्या आमच्या खुर्चीत फार अंतर असतं !!आमच्या पक्षात कावळा, साप, मुंगूस,कुत्रा असं काहीही म्हणत प्रेम करता येतं;कितीही चुकलो आम्ही, तरीहीखुर्चीवरच प्रेम करता येतं...!पाच वर्षं सरली की अंगात घुमू लागतात,जागेपणी पुन्हा एकदा खुर्चीचे झोपाळे;मनामध्ये झुलू लगतात !आठवतं ना? तुमची पाच जेव्हा सरली होती, खुर्ची तुमची कशी घामाने भरली होती !जाती पातीच्या लाटांवर बेभान होऊननाचला होतात तुम्ही,खुर्ची तुमची बुडता बुडतावाचला होतात तुम्ही!बुडली होती खुर्ची तुमची,अजून तुम्हाला वळत नाही,खुर्चीच्या स्वप्नावाचून दिवस तुमचासरता सरत नाही...!तुम्हालाही ते कळलं होतं,मलासुद्धा कळलं होतं !कारणप्रेम खरं तर खुर्चीवरच असतंखुर्ची म्हणजेच आमचं पहिलं प्रेम असतं..!तुमच्या आमच्या खुर्चीत फार अंतर असतं !आम्ही खुर्चीसाठी भांडत नाहीअसं म्हणणारी माणसं झूट असतात,खुर्चीसाठीच झुरणारी माणसंचखरी सच्ची असतात...असाच एक जण मला म्हणाला,आम्ही कधी खुर्चीसाठी काम केलं नाही,पाच वेळा निवडून आलो तरीखुर्चीवर प्रेमबिम केलं नाही !आमचं काही नडलं का?खुर्चीशिवाय अडलं का?तो खरं तर खोटं बोलत होता...खुर्चीसाठीच तो आतून तळमळत होता...तेव्हा मी लगेच त्याला म्हटलं,प्रेम खरं तर खुर्चीवरच असतं आणिखुर्ची म्हणजेच आमचं पहिलं प्रेम असतं...!तुमच्या आमच्या खुर्चीत फार अंतर असतं !खुर्चीसाठी गाजराचं थाटावं लागतं दुकानअच्छे दिन आणि जुमल्यांचंखोटं खोटं बांधावं लागत मकान...भर दुपारी उन्हात कधीखुर्चीसाठी फिरावं लागतं...मनात आमच्या खुर्ची नाहीअसंच सतत सांगावं लागतं...खुर्चीसाठी कधी कधी रुसणं असतं,खुर्चीशिवाय जगणं सगळं व्यर्थ असतं...खुर्ची आहे तर आम्ही असतो,खुर्ची नसेल आम्ही कुठेच नसतो...जनतेसाठी लढतोय आम्ही,असं सांगावं लागतं... पण,प्रेम खरं तर खुर्चीवरच असतंखुर्ची म्हणजेच आमचं पहिलं प्रेम असतं..!तुमच्या आमच्या खुर्चीत फार अंतर असतं !