शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Lok Sabha Election Result 2024 : मतदारांचा कौल काय असणार? उत्कंठा... आणि उमेद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 07:36 IST

Lok Sabha Election Result 2024 : भारतीय मतदार आज बहुसंख्येने साक्षर आहेत, पण ताे बहुसंख्येने निरक्षर हाेता, तेव्हाही सद्सद्‌विवेकबुद्धीला स्मरूनच याेग्य सरकार निवडत आला आहे.

जगातील सर्वाधिक लाेकसहभाग असलेल्या भारतीय लाेकशाही शासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू लाेकसभा आहे. लाेकसभेच्या स्थापनेसाठी दर पाच वर्षांनी निवडणुका हाेतात. आज अठराव्या लाेकसभागृहाच्या प्रतिनिधींची निवड जाहीर करणारी मतमाेजणी संपूर्ण देशभर हाेत आहे. बलाढ्य, अवाढव्य आणि रंजक असणारी सार्वत्रिक निवडणूक हाेऊन लाेकप्रतिनिधींचे सभागृह निर्माण हाेईल. मतदारांचा कौल काय असेल, याची प्रचंड उत्कंठा भारतीय मतदारांबराेबर साऱ्या विश्वाला लागून राहिली आहे. भारतीय मतदार आज बहुसंख्येने साक्षर आहेत, पण ताे बहुसंख्येने निरक्षर हाेता, तेव्हाही सद्सद्‌विवेकबुद्धीला स्मरूनच याेग्य सरकार निवडत आला आहे.

आजवर सतरा सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या, ही अठरावी! या सतरा निवडणुकांत मतदारांनी दहावेळा एका पक्षाला बहुमत दिले. काॅंग्रेसने सातवेळा, भाजपने दाेनदा आणि जनता पक्षाने आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर एकदा बहुमत मिळविले हाेते. अन्य सात सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काेणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्या परिस्थितीत काॅंग्रेस पक्षाने तीनवेळा इतर राजकीय पक्षांशी आघाडी करून सरकार स्थापन केले आणि पाच वर्षांचा कार्यकाळदेखील पूर्ण केला. भाजपने दाेनवेळा आघाडी सरकार स्थापन केले. जनता दलाने दाेनवेळा आघाडी सरकार स्थापन केले, मात्र ही आघाडी टिकली नाही आणि मुदतपूर्व निवडणुका घेण्याची वेळ आली.

आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसेतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन लाेकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी  सर्वाेदयी नेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली ‘संपूर्ण क्रांती’चा नारा दिला हाेता. २९६ जागा जिंकत १९७७ मध्ये प्रथमच सत्तांतर झाले. बहुमताने सत्तेवर येऊनही पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करण्यात जनता पक्षाचे सरकार अपयशी ठरले. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका घ्याव्या लागल्या आणि भारतीय मतदारांनी केवळ तीन वर्षांत काॅंग्रेसला प्रचंड बहुमताने सत्ता बहाल केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीने काॅंग्रेसला घसघशीत ४१४ जागा दिल्या. हा अपवाद वगळता आजवर एकाही निवडणुकीत एकाही पक्षाला आणि नेत्याला ‘चारशे पार’ जागा मिळालेल्या नाहीत.  

भारतीय समाजाचा विकास, आर्थिक परिवर्तन, नवे तंत्रज्ञान, शहरीकरण आदीने समाजाचे मतविभाजन अधिक हाेत आले. स्वातंत्र्याेत्तर काळात शेतकरी, शेतमजूर किंवा कामगार केंद्रीत बहुमत हाेते. आर्थिक उदारीकरणानंतर हा केंद्रबिंदू शहरी तथा मध्यमवर्गीय समाजाकडे वळू लागला. जात-धर्माचाही आधार घेतला जाऊ लागला. त्यामुळे विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात भारतीय लाेकशाहीचे स्थित्यंतर वेगाने हाेत राहिले. या दशकात चारवेळा (१९९१, १९९६, १९९८ आणि १९९९) सार्वत्रिक निवडणुका घ्यावा लागल्या. एकाही निवडणुकीत काेणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. याचदरम्यान भाजपने हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा राजकीय पटलावर केंद्रस्थानी आणला. वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्यात आली. दंगली उसळल्या. बाॅम्बस्फाेटाच्या मालिका झाल्या.  

भारतीय लाेकशाहीला जबर धक्के बसत हाेते, मात्र डाॅ. मनमाेहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या प्रत्येकी दहा वर्षांच्या कालखंडाने भारताला राजकीय स्थैर्य दिले. काॅंग्रेसच्या नेतृत्वाखालील डाॅ. मनमाेहन सिंग यांच्या आघाडी सरकारने उत्तम कामगिरी केली. २०१४ मध्ये नरेंद्र माेदी यांच्या रूपाने भारतीय मतदारांना नवा पर्याय दिसला. भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. २०१९ मध्ये पुन्हा बहुमत मिळाले. आता ‘चारसाे पार’चा नारा माेदी यांनी दिला आहे. त्यास भारतीय मतदारांनी कसा प्रतिसाद दिला आहे, मोदी हॅट्‌ट्रिक करणार का? - हे आज सायंकाळपर्यंत स्पष्ट हाेईल. अठराव्या लाेकसभेसाठी भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लाेकशाही आघाडी आणि काॅंग्रेसची इंडिया आघाडी प्रामुख्याने लढत आहे, असे वाटत असले तरी या दाेन्ही आघाड्यांवर वार करण्याची क्षमता असलेले तिसरे घटक पक्ष आहेत. त्यात तृणमूल काॅंग्रेस, बिजू जनता दल, वायएसआर काॅंग्रेस, अण्णाद्रमुक, डावे पक्ष आदींचा समावेश हाेताे.

भाजप सर्वाधिक ४४१ जागा, तर घटक पक्ष ९९ जागा लढत आहेत. काॅंग्रेस २८५ जागा लढवित असून, घटक पक्षांना तब्बल १८१ जागा साेडल्या आहेत. काॅंग्रेसची आघाडी नसलेल्या राज्यांत काॅंग्रेस पक्ष ४३ जागा स्वतंत्रपणे लढवित आहे. अनेक पक्ष, असंख्य उमेदवार आणि ९६ काेटी ८८ लाख २१ हजार ९२६ मतदारांची ही निवडणूक म्हणजे एक लाेकसहभागाचा उत्कृष्ट नमुना आहे. सुमारे ४५ दिवस चाललेल्या प्रक्रियेत सर्वच राजकीय पक्षांनी हिरिरीने आपली भूमिका मांडली. मतदार राजा त्यातून काेण निवडताे, हे आज सायंकाळपर्यंत कळेल!

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४