शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

विरोधी ऐक्याची दिशा भरकटलेलीच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 04:25 IST

राष्ट्रीय पातळीवर विरोधकांचे ऐक्य हे एक रहस्यमय गूढकथा बनले आहे. हे ऐक्य आहेही आणि नाहीसुद्धा.

- पवन के. वर्माराष्ट्रीय पातळीवर विरोधकांचे ऐक्य हे एक रहस्यमय गूढकथा बनले आहे. हे ऐक्य आहेही आणि नाहीसुद्धा. पण विरोधी ऐक्याचा हवाला जी माणसे देतात, त्यांच्याकडून या ऐक्याच्या बतावणीला फारसे महत्त्व दिले जात नाही. ते सगळे भाजपचा जोरदार विरोध करीत असतात, पण ऐक्याच्या बाबतीत मात्र ते सारेच विस्कळीत असलेले दिसतात. महत्त्वाच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यातून ही गोष्ट स्पष्ट दिसून येते.बसपाच्या नेत्या मायावती म्हणतात की, आमचा पक्ष काँग्रेससोबत कधीही ऐक्य करणार नाही. लोकांचा विश्वासघात करण्यात काँग्रेस पक्ष हा नंबर एकवर असतो, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केले आहे. प. बंगालमध्ये काँग्रेस पक्ष तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर आगपाखड करीत असतो आणि ममता बॅनर्जीदेखील काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्टांवर टीका करीत असतात. दिल्लीच्या लोकसभेच्या जागांसाठी समझोता करण्यासाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्ष यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच हे पक्ष एकमेकांवर शरसंधान करण्याची एकही संधी सोडताना दिसत नव्हते!

त्यामुळे महागठबंधनचे चित्र निर्माण करण्यात या पक्षातील विभाजनवादी प्रवृत्ती असफल ठरत असल्याचे चित्र राजकीय निरीक्षकांना पाहायला मिळते. त्यामागील कोडे काही त्यांना उलगडत नाही. अनेक प्रसंगी सगळ्या विरोधकांनी ऐक्याचे नाटक केलेले आहे. एका व्यासपीठावर उभे राहून हातात हात घेऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याचा संकल्प केला आहे. पण व्यासपीठावरून खाली उतरल्यावर त्यांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे विरोधकांना राजकीय स्किझोफ्रेनिया या मानसिक रोगाने पछाडले की काय असे वाटू लागले आहे!विरोधकांना असे वाटत असावे की राष्ट्रीय पातळीवर ऐक्याचा आभास निर्माण केल्यावर स्थानिक पातळीवर एकमेकांच्या जीवावर उठण्यात काहीही गैर नाही! परस्परातील हा विरोध हे पक्ष राष्ट्रीय पातळीवर एकत्र येतात तेव्हा गळून पडेल असे त्यांना वाटते. पण हा दृष्टिकोन बाळगणे हेच चुकीचे आहे. कारण राजकीय पक्षात कार्यकर्ते असतात. हे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर जसे वागतात ते राष्ट्रीय पातळीवर सहजासहजी पुसले जात नाही. स्थानिक पातळीवरील वैरभाव सहजासहजी दूर होत नसतो. स्थानिक पातळीवरील वैरभावाचा संबंध राष्ट्रीय स्तरावर शिल्लक उरत नसतो, असे म्हणणे हे भ्रामक आशावाद बाळगण्यासारखे आहे! खºया ऐक्यासाठी केलेले प्रयत्न शक्यतेत उतरले असते जर काँग्रेसने उत्तर प्रदेशात सपा आणि बसपासोबत युती केली असती! त्या स्थितीत काँग्रेस आणि माकपने तृणमूल काँग्रेसला विरोध करण्याचा विचारही केला नसता आणि दिल्लीत आप आणि काँग्रेस हे निवडणुकीसाठी एकत्र आले असते! पण प्रत्यक्षात यापैकी काहीच घडले नाही!!
राजकीय मंचावर काँग्रेसतर्फे पुनरागमन करण्याचा प्रयत्न होत आहे असे मला वाटू लागले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर ऐक्य करण्याची गरज त्या पक्षाला वाटत नाही. एक राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष या नात्याने काँग्रेसला आपल्या तळागाळातील कार्यकर्त्यांबाबत असलेल्या बांधिलकीकडे बघावेच लागेल किंवा पूर्वी ज्या क्षेत्रात काँग्रेस पक्ष प्रभावी होता तेथे पुनरागमन करण्याचा विचार त्या पक्षाला सोडून द्यावा लागेल. पण त्याचा अंतिम परिणाम असा होण्याची शक्यता आहे की तो पक्ष निवडणुकीत सपा बसपाच्या संयुक्त मतसंख्येला ग्रहण लावेल आणि भाजपचा आघात सहन करण्यासाठी तृणमूल काँग्रेसलाही कमकुवत करून टाकेल! ओरिसातही तो पक्ष बीजू जनता दलाला मिळणारी मते खाऊन भाजपला बळ देईल!
सामान्य मतदाराला काय वाटते याचाही विचार करायला हवा. विरोधकांमध्ये जी एकमेकांवर कुरघोडी करण्याची लढाई सुरू आहे ती पाहून त्यांनी भाजपला बळ देऊन त्याच्या नेत्याचे हात बळकट करण्याचे ठरविले तर त्यांना दोष कसा देता येईल? लोकसभेसाठी मतदान करताना केंद्रात कशा तºहेचे सरकार असावे याचा विचार मतदारांकडून केला जाऊ शकतो.विरोधकांच्या ऐक्याचा विचार आता करणे योग्य होणार नाही. कारण बरेच पाणी यमुनेतून वाहून गेले आहे. त्यामुळे अशा ऐक्याचा प्रयत्न आता यशस्वी होण्याची शक्यता नाही. अशा ऐक्याचा प्रयत्न सुरुवातीलाच व्हायला हवा होता. स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाने काही तरी गमावण्याची तयारी ठेवायला हवी होती. भाजपला कसेही करून सत्तेपासून दूर ठेवायचे असा प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवा होता. अशा ऐक्यासाठी महत्त्वाच्या राज्यांमध्ये व्यावहारिक तडजोडी करून विरोधकांचे ऐक्य मजबूत करण्याचा जर प्रयत्न झाला असता तर वेगळेच चित्र पाहायला मिळाले असते.आज मात्र विखुरलेले विरोधी पक्ष निवडणुकीच्या निकालानंतर एकमेकांवर केलेली चिखलफेक विसरून परस्परांवर स्तुतिसुमनांची उधळण करतील आणि गोंधळाचे रूपांतर ऐक्यात होईल, अशा चमत्काराची अपेक्षा करीत आहेत. दुर्दैवाने राजकारणाचे वास्तव हे नेहमी सुखान्त शेवटाकडे नेणाºया परीकथेसारखे नसते हे त्यांनी समजून घ्यायला हवे!(लेखक राजकीय विश्लेषक आहेत.)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेसBJPभाजपा