शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

क्रिया-प्रतिक्रियांचा जीवघेणा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:09 IST

देशभरात अस्वस्थता आणि संघर्षाचे वातावरण आहे. एकीकडे सनदशीर मार्गाने आंदोलने सुरु असताना दुसरीकडे हिंसक घटना घडत आहेत. समाजमाध्यमांद्वारे एकमेकांवर दोषारोप करुन हिंसेला जबाबदार धरले जात आहे. हिंसेला विशिष्ट समूह जबाबदार असल्याच्या प्रक्षोभक चित्रफिती प्रसारीत करुन आगीत तेल ओतले जात आहे. सरकार आणि पोलीस दलाकडे बोट दाखविले जात आहे. पोलीस आणि गुप्तचर विभागाच्या कर्मचाºयांना जिवानीशी मारले जात आहे.  सामान्य माणसाचा हकनाक बळी जात आहे. काय चालले आहे, हे देशातील सर्वसामान्यांच्या आकलनापलिकडे गेले आहे. 

ठळक मुद्देएडिटर्स व्ह्यूहिंसक घटनांनी देश हादरलाजळगावसारख्या शहरातही पोहलचे लोण

मिलिंद कुलकर्णी 

देशभरात अस्वस्थता आणि संघर्षाचे वातावरण आहे. एकीकडे सनदशीर मार्गाने आंदोलने सुरु असताना दुसरीकडे हिंसक घटना घडत आहेत. समाजमाध्यमांद्वारे एकमेकांवर दोषारोप करुन हिंसेला जबाबदार धरले जात आहे. हिंसेला विशिष्ट समूह जबाबदार असल्याच्या प्रक्षोभक चित्रफिती प्रसारीत करुन आगीत तेल ओतले जात आहे. सरकार आणि पोलीस दलाकडे बोट दाखविले जात आहे. पोलीस आणि गुप्तचर विभागाच्या कर्मचाºयांना जिवानीशी मारले जात आहे.  सामान्य माणसाचा हकनाक बळी जात आहे. काय चालले आहे, हे देशातील सर्वसामान्यांच्या आकलनापलिकडे गेले आहे. कोण खरे, कोण खोटे? कुुणाची बाजू योग्य? हे समजायला मार्ग नाही, कारण सगळेच राज्य घटनेचा आधार घेत आहे, आम्हीच कायद्याचे पालन करीत आहोत, मुलभूत अधिकाराचे हनन होत असल्याचा दावा करीत त्याविरोधात आंदोलने, न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे सुरु आहे. देशातील दिल्लीसारखी शहरे कोण पेटवत, भडकावत आहे, हे समोर येत नाही. दोन्ही गट एकमेकांकडे बोट दाखवत आहे. समर्थनार्थ चित्रफिती, संदेश प्रसारीत होत आहेत. प्रशासनाची कुचंबणा होत आहे. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी हिंसेचे शिकार ठरत असतानाही त्यांना कायदा व सुव्यवस्था राखणे, शांतता प्रस्थापित करण्यावर अधिक भर दिला जात आहे. दोन्ही बाजूने प्रत्येक घटनेचे भांडवल केले जात आहे. वस्तुुस्थितीचे आकलन न करता केवळ आपल्या सोयीची तेवढी माहिती प्रसारीत कशी होईल, त्यावर केवळ चर्चा कशी केंद्रित होईल, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. दु:खदायक, वेदनादायक प्रकार म्हणजे, यात संवैधानिक पदावरील व्यक्तींना वादात ओढले जात आहे. एकीकडे राज्य घटनेविषयी आदर व्यक्त करीत असताना त्या घटनेनुसार संवैधानिक पदावरील व्यक्तींविषयी जाहीर चर्चा करणे, त्यांच्याविषयी मतप्रदर्शन करणे हेच मुळी चुकीचे आहे. पण झाले असे आहे की, या मंडळींचा आपणच बरोबर असल्याचा अट्टाहास असतो. मध्यममार्गी कोणी नसावे, असाच एकंदर नूर सध्या आहे. डावे आणि उजवे या दोन्हीपेक्षा मध्यममार्गी, समन्वयवादी विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि बहुसंख्य समाज याच विचाराचा आहे. असे नसते तर आगडोंब देशभर पसरला असता, हे लक्षात घ्यायला हवे. संवैधानिक पदांसोबतच महापुरुषांना अकारण वेठीला धरले जात आहे. इतिहासापासून प्रेरणा मिळते. महापुरुषदेखील माणसेच होती. त्यांच्याकडून उदात्त कार्य जसे घडले तसे काही चुकादेखील घडलेल्या असू शकतात. भूतकाळ आणि वर्तमानकाळात मोठा फरक आहे, तो लक्षात घेऊन आपण पुढे जायला हवे. आम्ही इतिहासाचे ओझे घेऊन वर्तमानकाळात जगणार असू तर एकविसाव्या शतकातील, माहिती व तंत्रज्ञान युगातील मोकळा विचार आणि हवा कशी मिळणार? महापुरुषांचे चारित्र्यहनन करण्यापर्यंत मजल जाते, हे अतीशय वाईट आहे. केवळ महानगरांपर्यंत हे सीमित राहिलेले नाही, तर हे लोण जळगावसारख्या शहरांपर्यंत पोहोचले आहे. मध्यंतरी एका संघटनेचा कार्यक्रम सामाजिक सभागृहात झाला. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाºयांसाठी विशिष्ट टोपी परिधान करणे सक्तीचे होते. ती टोपी नसेल तर तुम्हाला व्याख्यानाला बसता येणार नाही? काय चालले आहे, कोणत्या युगात आपण आहोत? कबीर, तुकोबा, गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांची परंपरा लाभलेल्या या देशात  हा संकुचितपणा कसा आला? प्रबोधनाचा वारसा आम्ही कसा विसरत चाललो आहोत, हे अस्वस्थ करणारे प्रश्न आहेत. क्रियेची प्रतिक्रियादेखील धक्कादायक असते. धर्मस्थळावर जाहीर सभा घेण्यात आली. धर्म धोक्यात आहे, माणुसकी धोक्यात आहे, माणूस धोक्यात आहे, अशी भाषणे करण्याचे ते ठिकाण आहे काय? देवाचे नामस्मरण करण्याच्या जागी असे प्रकार होणे हे सांस्कृतिक, धार्मिक महाराष्टÑाच्यादृष्टीने चुकीचे आहे. कोणत्याही एका धर्माचे लांगुलचालन जसे चुकीचे आहे, त्याचप्रमाणे केवळ विशिष्ट धर्माचेच हे राष्टÑ असेल असे म्हणणे देखील चुकीचे आणि राज्य घटनेच्या विरोधात आहे. या सगळ्या कोलाहलातून सामान्य माणसाचा रोजी रोटीचा संघर्ष काही संपणारा नाही. दंगली, मोर्चे, आंदोलने यातून त्याच्या रोजीरोटीवर गदा येत आहे. अमूक लोकांकडून खरेदी करु नका, असे संदेश त्यात भर घालत आहे, विचारी आणि विवेकी लोकांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. कोणत्याही विचाराची मंडळी असो परंतु जहाल मंडळी घातकच असते, हे लक्षात घ्यायला हवे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव