शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

होऊन जाऊ दे आज...दे धक्का!

By सचिन जवळकोटे | Published: October 24, 2019 7:03 AM

लगाव बत्ती

- सचिन जवळकोटे

आजचा दिवस कैक प्रस्थापितांच्या मानसिकतेला धक्का देणारा. जनतेला परस्पर गृहीत धरून वाट्टेल तसं राजकारण खेळणा-यांच्या खुर्चीला सुरुंग लावणारा. आता हे वाचताना तुमच्या डोळ्यांसमोर पंढरपूर आलं की बार्शी... त्याच्याशी आम्हा पामराला काही देणं-घेणं नाही. बारा वाजेपर्यंतचा निकालच सांगेल की कुणाचे वाजले बारा... कुणाची साजरी होणार दिवाळी ? लगाव बत्ती...

निमगाव पाहतंय 'एकवर एक फ्री' ची स्वप्नं !

 सलग पाचवेळा निवडून येणाºया बबनदादांना यंदा एका नवख्या उमेदवारासमोर घाम फोडून प्रचार करावा लागला. त्यांच्या कैक कारखान्यांचा धूर लोकांपर्यंत विकासाचा सुगंध पोहोचविण्यात कमी पडला की चिन्ह बदलल्याशिवाय लढण्यात अर्थ नाही, ही विचित्र मानसिकता ठरली वरचढ हे त्यांच्या कार्यकर्त्यांनाच ठावूक. ज्यांच्या घरी पूर्वी साधी सायकलही नव्हती, तिथं दारी बुलेट अन् कार आली; हे ह्यदादांह्णच्या आजपर्यंतच्या कामाचं यश. मात्र ही बुलेट चालविणारी पुढची पिढी शिक्षणासाठी अन् नोकरीसाठी घरदार सोडून दुस-या शहरात गेली, ही गावोगावची खंतही ठरली दादांसाठी घातक. अशात एक अकलूजकर अन् दोन पंढरपूरकर यांची साथ संजूबाबाला मिळाली असली तरी दादांचा माढा किती ताकदीनं निमगावकरांच्याच पाठीशी उभा राहिला, यावर उद्या शिंदेंच्या गढीतल्या गुलालाचं भवितव्य ठरेल. कदाचित ह्यसंजयमामांह्णचं भाग्य यंदातरी (!) खुललं तर एकवर एक फ्री आमदारकीचं गिफ्ट दादा घराण्याची दिवाळी दिलखुलासपणे साजरी करेल.

मंगळवेढा करणार पंतांचं समाधान माढ्यासारखी एकावर एक फ्री स्कीम पंढरपुरातही मिळणार का? याकडे पंतांचा वाडा लक्ष ठेवून बसलाय. जेव्हा सिनिअर पंतांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा ह्यनीट चालता येणं यावर भारतनानांनी विखारी टीका केली. मात्र निवडणुकीत जो निवडून येऊ शकतो, तोच राजकारणात कायमस्वरुपी चालू शकतो,  हे साधं गणित ह्यनानांह्णच्या लक्षात आलं नसावं ? जसा-जसा प्रचार शिगेला पोहोचला, तसं खर्डीकर पंतांचं पारडं जड झालेलं. अशात प्रशांत-उमेश मालकांनी कधी नव्हे तो हात सैल सोडलेला. हे कमी पडलं की काय म्हणून आवताडेंचे बळवंतही प्रत्येकाचं समाधान करू लागलेले. यातूनच पंढरपूरच्या डबल मंगळवेढ्याचा रेट फुटलेला.

 बोटाला शाई लावण्याच्या दिवशी तर पंढरीतील कैक वस्त्यांमध्ये याच ह्यमंगळवेढाह्णकरांनी गंमत करून ठेवली. प्रत्येक गल्लीत केवळ चार घरांचं ह्यसमाधानह्ण करून पुढच्या सा-यांना मुद्दाम प्रतीक्षेत ठेवलं. ही सारी मंडळी ह्यनानांह्णच्या हक्काची; मात्र वाट पाहण्याच्या नादात कुणीच संध्याकाळपर्यंत बाहेर पडलं नाही. ह्यगनिमी कावाह्ण यशस्वी झाला. तिकडं मंगळवेढ्यात ह्यआवताडेंह्णवर भरभरून प्रेम व्यक्त केलं गेलं. इकडं ह्यपंढरीह्णत मात्र नानांचा एकगठ्ठा एरिया ह्यबिनशाईचं बोटह्ण बघत उपाशीपोटी झोपी गेला.

 मात्र असं असलं तरीही ह्यभीमाह्णकाठच्या गावागावात ह्यभारतनानांह्णची जुनी पुण्याई कामाला आली. आजपावेतो ह्यवाळूह्णवर केलेले उपकार मंगुड्याच्या एका ठेकेदारानं फेडले. दहा-बारा खोकी एका रात्रीत फुटली गेली. अशातच ह्यएम्ह्ण फॅक्टरही ग्रामीण भागात जोरात चालला. यामुळं ह्यनानांची हॅट्िट्रकह्ण होण्याची स्वप्नं पुन्हा एकदा बघितली गेली; मात्र ह्यदामाजीपंतांह्णच्या नगरीत ह्यलक्ष्मीह्णचं भरपूर ह्यसमाधानह्ण झालं तर मात्र ह्यपंढरी पंतांह्णच्या वाड्यावर दिवाळी साजरी झालीच समजा. आलं का लक्षात... लगाव बत्ती!

आमचं ठरलंय...कॅबिनेट फिक्सच!

माळशिरस तालुक्यात निकाल काय लागणार, हे इवलंसं पोरही सांगू शकेल. विषय फक्त लिडचा. लोकसभेप्रमाणे एक लाखाचा मिळणं अशक्य; कारण यंदा समोरचा उमेदवार स्थानिकच. त्यात गेल्यावेळी विखुरलेले सारे ह्यदादा विरोधकह्ण यंदा ह्यबारामतीकरांह्णच्या छत्रछायेखाली एकत्र आले.मात्र ह्यकमळाची उमेदवारीह्ण थेट ह्यवर्षाह्ण बंगल्यावरून पाठविली गेल्यानं अख्खं ह्यदादा घराणंह्ण ह्यभावी कॅबिनेटह्ण पदाला जागलं. मात्र इथं ह्यगुर्जरह्ण उभारले असते तर चांगलीच ह्यचांदीह्ण झाली असती, ही चुटपूट मनाला लागून राहिलीच रावऽऽ.

...अन् बापूंची दाढी खुदकन् हसली !

 सांगोल्यात गेल्या दोन दिवसांपासून ह्यशहाजीबापूंह्णना झोप आली नसावी. भलेही त्यांचे कार्यकर्ते बोटं मोडून-मोडून कितीचा लिड मिळणार, हे सांगत असले तरीही वर्षानुवर्षे अपयश सहन करणाºया ह्यबापूंह्णना यश समोर दिसत असतानाही उगाचंच भीती वाटत असावी. यंदा सांगोल्याच्या मैदानात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. ह्यबापूंह्णच्या भाषणात ह्यम्हाताराऽऽह्ण हा शब्द आला की जोरदार टाळ्या पडायच्या. तरुणांच्या शिट्ट्या वाजायच्या. खरंतर आजपावेतो कट्टर विरोधकही कधी ह्यगणपतआबांह्णबद्दल साधा ब्र शब्द कधी बोलत नव्हते की ऐकून घेत नव्हते; मात्र आयुष्यभर पुरोगामी लोकशाहीच्या बाता मारणा-या मंडळींनीच ह्यघराणेशाहीह्णचा आसरा घेतलेला लोकांना बिलकूल पटलं नाही, हेच गावोगावी दिसून आलं. खरंतर ह्यआबांचे नातूह्ण हे डॉक्टर. त्यांनी लोकांना औषधं द्यावी. पाणी देण्याच्या भानगडीत (म्हणजे वर्षानुवर्षे नुसता शब्दच होऽऽ) पडू नये, असंही तरुणाईला वाटलं; मात्र ह्यराजश्रीताईह्ण किती मतं घेतात यावरही बरीच गणितं अवलंबून.

जीभ घसरली होती; पण...

 ह्यहातह्ण किंवा ह्यघड्याळह्ण सोडून ह्यभगवा झेंडाह्ण खांद्यावर घेणाºया कैक नेत्यांना यंदा वाटलं की आपण यंदा निवडून आलोच. यातलेच एक म्हणजे बार्शीचे ह्यदिलीपरावह्ण. आपल्या नेहमीच्या मतांमध्ये ह्यबाणाह्णच्या मतांची बेरीज केली तर गेल्या वेळेपेक्षा जास्त लिडनं येऊ, असा त्यांचा होरा. अशात ह्यराजाभाऊंह्णची पकड कार्यकर्त्यांवर असली तरी जीभेवर कमीच. याचाच फायदा मोर्चा-बिर्चा काढल्यानंतर मिळेल, असं ह्ययोगेशभाऊंह्णना वाटलेलं. तरुणाई आपल्यासोबतच राहील, हेही ह्यआर्यनह्णनं ठरविलेलं.

 मात्र वैरागचा ह्यभूमकर पॅटर्नह्ण त्यांची सारी समीकरणं बिघडवून गेला, हे मतदानादिवशी स्पष्टपणे जाणवलं. अशात इथंही ह्यएमह्ण फॅक्टर ग्रामीण भागात जोरात चालला. दरवेळी शेवटच्या टप्प्यात कमी पडणा-या ह्यराजाभाऊंह्णनीही यंदा हात ढिला करायला मागं-पुढं पाहिलं नाही. त्यामुळं बार्शीत चमत्कार घडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालीय.

मनोहारी आशावाद...धाडसी आनंद

ह्यशहर उत्तरह्णमध्ये ह्यहातह्णवाल्यांकडं एकही सक्षम उमेदवार नव्हता हे मान्य. ह्यविश्वनाथअण्णाह्ण किंवा ह्यप्रकाशअण्णांह्णसारखे कागदी बोलघेवडे वाघ आता प्रत्यक्षात मैदानावर चालत नाहीत, हेही पटलेलं. मात्र इथली जागा ह्यघड्याळह्णवाल्यांनी स्वत:हून का मागून घेतली, याचे उत्तर काही आजपावेतो कुणालाच न सापडलेलं. तशात पुन्हा नेहमी ह्यसपाटूनह्ण पडणा-यांचाच विचार का गेला, हेही गूढ न उकललं गेलेलं...खरंतर निराळेवस्तीच्या ह्यमनोहरपंतांह्णना अलीकडंच्या काळात पराभव नवीन नाही; परंतु म्हणून त्यांनी स्वत:हून हसत-हसत सुळावर चढावं, हेही अनेकांना न पटलेलं.मात्र ह्यनशिबात भाग्यह्ण घेऊन आलेल्या विजूमालकांना यंदा पंतांपेक्षाही जास्त त्रासदायक ठरले चंदनशिवे. त्यांची पहिली निवडणूक असूनही त्यांनी ज्या पद्धतीनं लढा दिला तो ग्रेटच. मात्र समोर महाकाय हत्ती दिसत असूनही त्याला टक्कर द्यायला निघालेल्या या दोन्ही उमेदवारांच्या धाडसाला सलाम. त्यांच्या आशावादाला सॅल्यूट...कारण ह्यखुर्चीचं अमरत्वह्ण कुणीही घेऊन आलेलं नाही. परिवर्तन हा निसर्गाचा नियम. एक ना एक दिवस या मंडळींचाही येईलच. तोपर्यंत लगाव बत्ती...

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकVotingमतदानPoliticsराजकारणpandharpur-acपंढरपूर