शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

‘दर्डाजी के उपर बात छोड दो, तो सब ठीक होगा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 14:56 IST

दर्डाजी दिल्लीत येत, तेव्हा वेळात वेळ काढून इंदिराजी त्यांना आवर्जून  भेटत असत. त्या मला म्हणाल्या, ‘दर्डाजी के उपर बात छोड दो, तो सब ठीक होगा’- त्यावेळचे काँग्रेसचे सरचिटणीस बॅ. ए. आर. अंतुले यांनी दर्डाजींना फोन केला. निवडणुकीचा फॉर्म भरायला तीन दिवस होते.

गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते -वाहरलाल दर्डा यांचे नाव मी ऐकून होतो, प्रत्यक्ष भेट झालेली नव्हती. पण, जेव्हा इंदिराजी म्हणाल्या, ‘तुला महाराष्ट्रातून लोकसभा लढायची आहे आणि त्यासाठी वाशिम लोकसभा मतदारसंघ ठरवला आहे.’ - त्या निवडणुकीसंदर्भात पहिल्यांदा दर्डाजींशी संबंध आला. माझ्याकरिता सुचवलेल्या वाशिम मतदारसंघाचे पूर्वीचे खासदार स्वर्गीय वसंतराव नाईक होते. त्यांच्या दु:खद मृत्यूनंतर ती जागा खाली झाली होती. इंदिराजींनी अंतुलेंना सांगितले, ‘दर्डाजी को फोन करो और उनको बताओ, वाशिम के लिये गुलाम नबी को भेज रही हूं। उनकी पुरी मदत कीजिए।’ दर्डाजींवर इंदिराजींचा संपूर्ण विश्वास होता. दर्डाजी दिल्लीत येत, तेव्हा वेळात वेळ काढून इंदिराजी त्यांना आवर्जून  भेटत असत. त्या मला म्हणाल्या, ‘दर्डाजी के उपर बात छोड दो, तो सब ठीक होगा’- त्यावेळचे काँग्रेसचे सरचिटणीस बॅ. ए. आर. अंतुले यांनी दर्डाजींना फोन केला. निवडणुकीचा फॉर्म भरायला तीन दिवस होते. ताबडतोब मी नागपूरमार्गे यवतमाळला गेलो. अगदी तरुण होतो. दर्डाजींशी भेट झाली आणि माझी चिंताच मिटली. दर्डाजींनी मला खूप मोठा आधार दिला. पहिल्याच भेटीत मला म्हणाले, ‘कसली चिंता करू नका! काश्मीरहून तुम्ही इथे लढायला आलात, पुढचे मी पाहतो! ’ - त्यानंतर निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली. त्यादरम्यान दर्डा परिवारासोबतचा माझा संबंध अधिक दृढ झाला. दर्डाजींच्या पत्नी वीणाताई... उनके बारे मे क्या बोलू? जेव्हा-जेव्हा मी यवतमाळला गेलो, तेव्हा-तेव्हा त्यांनी न जेवता मला कधीही जाऊ दिलं नाही. अवघ्या दर्डा कुटुंबाने मला खूप प्रेम दिलं. जवाहलालजी, विजयबाबू, राजेंद्रबाबू या सर्वांनी मला फार जीव लावला. ‘लोकमत’चं जे साम्राज्य आज उभं राहिलं आहे, त्यामागे बाबूजींची दूरदृष्टी आहे. कोणतंही काम इमानदारीत करायचं, हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. ते सेक्युलर होते. त्यांचा पूर्ण परिवार सेक्युलर आहे. त्यांच्या घरात दुसऱ्या-तिसऱ्या पिढीतसुद्धा हिंदू-मुस्लीम किंवा जात-पात असा कसलाही भेद नाही, याचा मला फार अभिमान वाटतो. इंदिराजी आणि बाबूजींची राजकीय गाठ पक्की झाली, याचं कारण दोघांमध्ये ‘सेक्युलरिझम’ हा समान धागा होता. बाबूजींच्या मृत्यूनंतरही बाबूजींच्या परिवाराशी माझे संबंध तेवढेच घट्ट राहिले. 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाcongressकाँग्रेस