शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

दृष्टिकोन - चित्रपटांमागील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे नवे निकष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 06:03 IST

हॉलीवुडच्या बहुचर्चित अव्हेंजर्स, अवतार, आयर्न मेन २, मेट्रिक्ससारखे उच्चतम स्पेशल इफेक्ट आपल्याला

दीपक शिकारपूर

प्रभासचा साहो हा बिगबजेट चित्रपट सध्या बहुचर्चित आहे. बाहुबलीनंतर सर्वच प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. या चित्रपटासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर केलेला खर्च कोट्यवधीच्या घरात आहे. एकाच वेळी हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये याचे चित्रीकरण केले गेले आहे. एकेकाळी ‘चित्रपट कला की शास्त्र’ या विषयावरवर वादविवाद होत असत. जास्त कला व थोडेफार तंत्र हे विसाव्या शतकापर्यंतचे चित्र होते. २0१९ नंतर हे गृहीतक पूर्णपणे बदलणार आहे असे दिसते.

हॉलीवुडच्या बहुचर्चित अव्हेंजर्स, अवतार, आयर्न मेन २, मेट्रिक्ससारखे उच्चतम स्पेशल इफेक्ट आपल्याला भारतीय चित्रपटांत पाहायला मिळतील. चित्रपटासाठी अ‍ॅक्शन दिग्दर्शित करणाऱ्या ‘ट्रान्सफॉर्मर्स’ या हॉलिवूड चित्रपटाच्या तंत्रज्ञांना खास पाचारण केले गेले. चांगली कथा, सकस कलाकार हे चित्रपट यशस्वी करण्यासाठी नक्कीच अत्यावश्यक आहेत. पण ते विश्वासार्ह पद्धतीने सादर केले पाहिजे आणि ते विश्वासार्ह बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शक्तिशाली आणि चांगल्या प्रतीचे व्हिज्युअल इफेक्ट्स. चलतचित्रपटात काही तंत्र चमत्कार निर्माण करून जे नाही ते दाखवणे याला स्पेशल इफेक्ट म्हणून संबोधले जाते. शूटिंग करताना (विशेषत: हाणामारी) अनेक यांत्रिकी तंत्रज्ञान वापरून वातावरण निर्मिती (पाऊस, धुके, बर्फ, ऊन), इमारती जमीनदोस्त होणे, वाहने नष्ट अथवा वेडीवाकडी होणे, त्याचबरोबर अभिनेत्याचे बाह्य स्वरूप बदलणे अशा अनेक बाबींचा समावेश होतो.

कॉम्प्युटर जनरेटेड इमेज हे तंत्रज्ञान सर्रास अनेक ठिकाणी वापरले जाते. एकूण निर्माण होणाऱ्या ७0 टक्के सिनेमात या ना त्या मार्गांनी तंत्रज्ञान हे जरूर वापरले जाते. आभासी प्रतिमा हुबेहूब दाखवायचे काम त्यामुळे सहज शक्य होते. संगणकावर एखादे नवीन पात्र निर्माण करून ते कार्टूनसारखे दाखवणे हा त्यातील पहिला टप्पा. त्यानंतर हाडामासाचे पात्र व आभासी पात्र एकत्र करायचा टप्पा पार केला गेला. काही वेळा हाडामाणसाच्या पात्राचे काही अवयव संगणकीय केले गेले. साहोसाठी हॉलीवूडच्या अ‍ॅक्शन कोरियोग्राफर केनी बेट्सची १२0 हून अधिक लोकांची अ‍ॅक्शन टीमसह ८0 सदस्यीय कॅमेरा टीम शूटसाठी योजना आखण्यासाठी आणि तयारीसाठी एकत्र काम केले. अतिवेगवान पाठलागाच्या शूटिंगचे कंपन टाळण्यासाठी कॅमेरे खास डिझाइन केलेले आहेत. मोटर सायकलच्या वेगानेच कॅमेरेही एका इव्हो या विशिष्ट वाहनात बसवले होते. आठ मिनिटांच्या पाठलाग व हाणामारीचे ७0 कोटींचे बजेट हा एक उच्चांकच म्हणावा लागेल. त्याचबरोबर एका आभासी शहराची निर्मिती हे अजून एक वैशिष्ट्य. बॅटमॅनमध्ये जसे गोथॅम हे काल्पनिक शहर वसवले तसेच शहर अबू धाबीच्या पाशर््वभूमीवर निर्माण केले गेले आहे. व्हिज्युअल इफेक्ट आर्टिस्ट आणि डिजिटल कंपोझटिरसह ३00 कलाकारांची टीम यासाठी अथक परिश्रम घेत होती. आवर्त-संचित इमारती आणि निओ-फ्यूचरिस्ट आर्किटेक्चरल स्ट्रक्चर्स यासाठी खास निर्मिली गेली.एवढा मोठा खटाटोप करून निर्माण केलेल्या साहोला खरे किती यश व मानसन्मान मिळतील हे काळच ठरवेल. पण काही नाही तरी उच्च तंत्रज्ञान वापराबाबत नवीन निकष निर्माण करायचे महतकार्य भारतीय सिनेमाच्या इतिहासात त्यांनी नक्की केले आहे. 

(लेखक संगणक साक्षरता प्रसारक आहेत ) 

टॅग्स :bollywoodबॉलिवूडcinemaसिनेमाdigitalडिजिटल