शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची विमान ‘सेवा’ हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:54 IST

​​​​​​​महाराष्ट्राने हवाई वाहतुकीविषयी फारशा गांभीर्याने यापूर्वी विचारच केला नाही, त्यामुळे विमानतळ असूनही वाहतूक नाही. हवाई‘सेवा’ हवेतच लटकली आहे.

- वसंत भोसलेमहाराष्ट्राने हवाई वाहतुकीविषयी फारशा गांभीर्याने यापूर्वी विचारच केला नाही, त्यामुळे विमानतळ असूनही वाहतूक नाही. हवाई‘सेवा’ हवेतच लटकली आहे. महाराष्ट्रात लहान-मोठी अठ्ठावीस विमानतळे आहेत. त्यापैकी सहा विमानतळांवर उड्डाणाची दिवस-रात्र सोय आहे. तीनच विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय वाहतूक होते. या सहा विमानतळांशिवाय चार नियोजित विमानतळे आहेत. त्यामध्ये नवी मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, आदींचा समावेश आहे. या सर्व विमानतळांवरून हवाई वाहतूक होण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. परिणामी सुमारे दोन डझन विमानतळांच्या धावपट्ट्या केवळ ऊन-पाऊस खात पडून आहेत. शेकडो एकर जमीन त्यासाठी वापरली आहे. शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, दोन-चार जिल्हे वगळता तब्बल तीस जिल्ह्यांसाठी जवळपास सोयीची हवाई सेवा उपलब्ध नाही.कोल्हापूर, नाशिक आणि जळगाव विमानतळांवरून हवाई वाहतूक सुरू करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू करण्यात येणार होती. त्यातील नाशिक आणि जळगावची सेवा सुरू झाली आहे. मात्र कोल्हापुरची विमानसेवा अद्याप हवेतच आहे. कोल्हापुरची सेवा सुरू करण्यासाठी डिसेंबरअखेरची मुदत होती. पहिल्या दिवसाच्या विमान प्रवासासाठी दोनशेहून अधिक प्रवाशांनी नोंदणीसाठी चौकशीही केली होती. कोल्हापूरच्या सेवेसाठी आठवड्यातील केवळ तीनच दिवस (मंगळवार, बुधवार आणि रविवार) परवानगी देणार असे सांगितले होते. विमान कंपनीने ही परवानगी सहा दिवसांची असावी, अशी मागणी केली आहे. दुपारी दीड वाजता मुंबईतून विमानाचे उड्डाण करून अडीच वाजता कोल्हापुरात पोहोचणार आणि कोल्हापूरहून परत साडेचार वाजता मुंबईत पोहोचणार आहे. ही वेळ गैरसोयीची आहे. मुंबईहून विमानाने कोल्हापूरला दुपारी येऊन काही उपयोग नाही. सकाळचा वेळ वाया जातो. शिवाय कामे करून तातडीने मुंबईला परतता येत नाही. हीच स्थिती कोल्हापूरहून मुंबईला जाणाºया प्रवाशांची असणार आहे. तातडीने जाऊन कामे करून परत जाता येत नसेल तर हवाई मार्गाचा वापर कोण करेल ?महाराष्ट्राची मुळात एक अडचणच आहे. मुंबईशी संपूर्ण राज्यातील प्रमुख शहरे हवाई मार्गाने जोडण्यासाठी मुंबईचे विमानतळ हेच महाराष्ट्राचे राहिलेले नाही. येथे सुमारे ९०० विमानांची ये-जा आहे. त्यामुळे हा विमानतळ प्रचंड व्यस्त असतो. दहा-वीस प्रवाशांच्या जिल्ह्यातून येणाºया विमानाला जागा किंवा वेळ देताच येत नाही. या विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नव्या मुंबईचा विमानतळ तातडीने उभा करावा लागेल. जेणेकरून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक तिकडे वर्ग करता येईल आणि मुंबईच्या विमानतळाला श्वास घेण्यास अवधी मिळेल. त्या वेळेत कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, जळगाव, नांदेड, शिर्डी, आदी प्रमुख विमानतळांवरून होणाºया विमानांच्या वाहतुकीसाठी योग्य वेळ देता येईल. शिवाय पुण्यासाठीसुद्धा पुरंदर येथील नियोजित विमानतळ तातडीने पूर्ण होण्याची गरज आहे. पुण्यासाठी विमानतळ कोठे उभा करायचा याची चर्चाच दहा वर्षे चालू होती. चाकण की तळेगाव की पुरंदर यात वेळ गेला. आता पुरंदरची जागा निश्चित झाली आहे. प्रत्यक्ष काम केव्हा सुरुवात होणार माहीत नाही. विमान कंपनीच्या मागणीमुळे कोल्हापुरची विमान सेवा हवेतच लटकली आहे.