शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

कबड्डी का कोमेजली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 06:58 IST

आशियाई स्पर्धा म्हटले की पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत भारतीय कबड्डी संघ सुवर्णपदक जिंकणार, हे समीकरण आतापर्यंत ठरलेले होते. मात्र, यंदा दोन तर सोडा, एकही सुवर्ण भारताला जिंकता आले नाही.

- विजय बाविस्कर

पानं का नासली? घोडा का अडला? भाकरी का करपली? या प्रश्नांप्रमाणेच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी का कोमेजली, या प्रश्नाचेही उत्तर एकच आहे... न फिरविल्याने! आशियाई स्पर्धा म्हटले की पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत भारतीय कबड्डी संघ सुवर्णपदक जिंकणार, हे समीकरण आतापर्यंत ठरलेले होते. मात्र, यंदा दोन तर सोडा, एकही सुवर्ण भारताला जिंकता आले नाही. महिलांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले तर पुरुष संघाची धाव कांस्यपदकापर्यंत मर्यादित राहिली.

अलीकडील काही वर्षांत प्रो-कबड्डी लीगमुळे या खेळात अनेक अर्थाने क्रांती घडून आली. या लीगमुळे कबड्डी या अस्सल मातीतील खेळाला पुन्हा लोकाश्रय मिळाला... खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळाले... इराण, इराक, जपान, कोरिया, पाकिस्तान हे संघही बलवान म्हणून पुढे येऊ लागले. मात्र, आजवर एखादा अपवाद वगळता कबड्डीतील आपल्या वर्चस्वाला धक्का बसला नव्हता. आशियाई स्पर्धा, विश्वचषक (?) म्हटले की आपणच विजेते असणार, हे तमाम भारतीयांनी गृहित धरले होते. मात्र, यंदाच्या आशियाई स्पर्धेत इराणच्या पुरुष तसेच महिला खेळाडूंनी भारताचे विमान जमिनीवर आणले. पण हे का झालं? आपले दोन्ही संघ चारीमुंड्या चीत झाले. संघनिवडीची प्रक्रिया, हे या पराभवामागील महत्त्वाचे कारण आहे. यासंदर्भातील एक उदाहरण अतिशय बोलके आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये आपल्याच महाराष्ट्रात ही घटना घडली होती. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड झालेल्या एका गुणवान महिला खेळाडूला अन्याय्य पद्धतीने वगळण्यात आले. सराव शिबिर सुरू असताना तिच्या गर्भाशयात गाठ असून, कबड्डी खेळण्यास अक्षम असल्याचा साक्षात्कार कुठल्याही वैद्यकीय चाचण्या न घेता कबड्डीतील अधिकाऱ्यांना झाला होता. एवढ्या मोठ्या राज्याचा विचार करता क्रीडा क्षेत्रातील ही घटना तशी किरकोळ असली तरी, कबड्डीतील अधिकाºयांच्या या लज्जास्पद कृत्यामुळे पुरोगामी म्हणून टेंभा मिरविणाºया महाराष्ट्राची मान खाली गेली.

आशियाडसाठी संघ निवडताना काय प्रक्रिया राबविली गेली, याबाबत पारदर्शकता नव्हती. कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवडताना राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी ध्यानात घेतली जाते. मात्र, आशियाडसाठी निवडलेल्या भारतीय कबड्डी संघाबाबत असे काही जाणवले नाही. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी निवड चाचणी झाल्याचेही ऐकीवात नाही. प्रो-कबड्डी लीगमधील स्टार खेळाडूंना थेट संघात स्थान दिले. हे म्हणजे, रणजी स्पर्धा व इतर देशांतर्गत स्पर्धांमधील कामगिरी ध्यानात न घेता केवळ आयपीएलमध्ये चमकणाऱ्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघात स्थान दिल्यासारखे झाले. भारतीय कबड्डी महासंघात अनागोंदी माजली आहे. आशियाई स्पर्धा तोंडावर असतानाच दिल्ली उच्च न्यायालयाने संघनिवडीवरून त्यांना चपराक लगावली, हे गरजेचेच झाले. याकडे गंभीरपणे लक्ष देऊन वेळीच उपाययोजना केली नाही तर भारतीय कबड्डीची अवस्था हॉकीप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही.कबड्डीच्या प्रसाराचा विचार करता इतर देशांच्या कामगिरीकडे सकारात्मकपणे पाहता येईलही. पण हे होत असतानाच या खेळाचा जन्मदाता अशा पद्धतीने पराभूत होणे खचितच भूषणावह नाही.

टॅग्स :Kabaddiकबड्डीAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा