शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तर लगेच हात पिस्तुलावर ठेवायचा!

By अतुल कुलकर्णी | Updated: November 29, 2017 00:17 IST

नमस्कार. काल आपण बिबट्याला मारायला स्वत: मैदानात उतरलात आणि आमची कॉलर एकदम टाईट झाली भाऊ. मंत्री असावा तर असा... एका चॅनलने जेम्सबॉन्डचे म्यूझिक लावून आपण कसे चालत गेलात, कशी पोज घेतली हे दाखवलं.

प्रिय गिरीशभाऊ महाजन,नमस्कार. काल आपण बिबट्याला मारायला स्वत: मैदानात उतरलात आणि आमची कॉलर एकदम टाईट झाली भाऊ. मंत्री असावा तर असा... एका चॅनलने जेम्सबॉन्डचे म्यूझिक लावून आपण कसे चालत गेलात, कशी पोज घेतली हे दाखवलं. आपल्याला एकदम भारी वाटलं बघा भाऊ. बिबट्या पण पळून गेला ना भाऊ आपला जोष पाहून. ते पाहून मला एक आयडिया सुचलीय... आपण आपल्या आॅफिसात खोटं खोटं पिस्तूल टेबलावर ठेवत जा. पिस्तूल पाहून बिबट्या जर शेपूट घालून पळून जात असेल तर अधिकाºयांची काय अवस्था होईल विचार करा भाऊ... पटापट कामं करतील ना सगळे. मी तर कालपासून विचार करून राहिलो भाऊ... राज्यात सिंचन क्षमता वाढत कशी नाही, असं तुम्ही नुस्ते पिस्तुलावर हात ठेवून विचारा आणि बघा, कशी सिंचन क्षमता वाढते ते... जलसिंचन प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता जर का अधिकाºयांनी अडवून ठेवल्या की लगेच आपण आपला हात पिस्तुलावर ठेवायचा... प्रकल्प पूर्ण झाल्यावर बिल मिळालंच पाहिजे असा आपला नियम. पण अधिकारी तो पाळत नाहीत. तेव्हा मंत्री कार्यालयातून खासगी सचिवांचा फोन आल्याशिवाय जर का परस्पर बिल काढलं की लगेच आपण आपला हात पिस्तुलावर ठेवायचा... कोणत्या प्रकल्पाला किती निधी द्यायचा, कोणता प्रकल्प आधी घ्यायचा, कोणता नंतर घ्यायचा या सगळ्या गोष्टी कितीही मोठा अधिकारी असला तरी (अगदी राज्याचे वित्त विभागाचे सचिव असले तरी) त्यांनी आधी आपल्या खासगी सचिवाशी चर्चा करायची... ती नाही केली की लगेच आपण आपला हात पिस्तुलावर ठेवायचा...अधिकाºयांच्या बदल्या पूर्णपणे आपल्या अधिकारातला विषय. त्यात जर का कोणी हस्तक्षेप केला किंवा आपण सांगितलेल्या बदलीला कोणी विरोध केला की लगेच आपण आपला हात पिस्तुलावर ठेवायचा...आपण एवढे आरोग्य शिबिरं भरवतो, हजारो रुग्णांना दिलासा देण्याचे काम करतो. मुंबईहून एवढे डॉक्टर्स नेतो. ग्रामीण भागात चांगले उपचार मिळावेत म्हणून आपण चांगल्या डॉक्टर्सचा आग्रह धरतो, कधी ते येतात, कधी येत नाहीत. यापुढे कोणी येत नाही म्हणालं की लगेच आपण आपला हात पिस्तुलावर ठेवायचा... भाऊ मला तर फार भारी वाटू लागलंय. एकदा करुनच बघा... बाकी भेटल्यावर बोलू.(atul.kulkarni@lokmat.com) 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपा