शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
3
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
4
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
5
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
6
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
7
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
8
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
9
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
10
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
11
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
12
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
13
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
14
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
15
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
16
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
17
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
18
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
19
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
20
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
Daily Top 2Weekly Top 5

जंगली अस्वलांशी लढतेय जपानी आर्मी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:16 IST

Japan News: जपानमधील जंगलांमधून आता जंगली अस्वलं मोठ्या प्रमाणावर मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. माणसांवर त्यांचे सातत्यानं हल्ले सुरू आहेत. या जंगली अस्वलांशी लढण्यासाठी जपानला थेट आपली आर्मीच आता रस्त्यावर आणावी लागली आहे.

जपानला अलीकडच्या काळात नवनवीन आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे. सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे तर त्यांना कायमच जागरूक आणि जागृत राहावं लागत आहे. देशातील वाढती वृद्धांची संख्या, तरुणाईचा लग्नाला आणि मुलं जन्माला घालण्यास नकार... हे प्रश्न तर त्यांच्या पाचवीलाच पूजलेले आहेत. आता देशांतर्गत नव्या प्रश्नानं त्यांना घेरलं आहे आणि त्यासाठी त्यांना चक्क त्यांची आर्मीच रस्त्यावर उतरवावी लागली आहे.

काय आहे हा प्रश्न आणि तो इतका गंभीर का झालाय?जपानमधील जंगलांमधून आता जंगली अस्वलं मोठ्या प्रमाणावर मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. माणसांवर त्यांचे सातत्यानं हल्ले सुरू आहेत. या जंगली अस्वलांशी लढण्यासाठी जपानला थेट आपली आर्मीच आता रस्त्यावर आणावी लागलीआहे. जपानचे सैनिक या अस्वलांशी आता 'युद्ध' करताहेत ! या अस्वलांना पकडण्यासाठी आणि ते शक्य झालं नाही तर त्यांना मारण्यासाठी ठिकठिकाणी आर्मी तैनात करण्यात आली आहे.गेल्या सात महिन्यांत अस्वलांनी मानवी वस्त्यांवर शंभरपेक्षा जास्त हल्ले केले आहेत. त्यात आत्तापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. रात्री-बेरात्री केव्हाही घरात, मानवी वस्त्यांमध्ये येऊन या अस्वलांनी हल्ले करणं सुरू केल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यासाठी पोलिस, सेल्फ डिफेन्स फोर्सेसच्या तुकड्या, आर्मी.. असे सारेच सज्ज झाले असून, त्यांनी रस्त्यांवर गस्त घालायला सुरुवात केली आहे. सुरक्षेचा प्राथमिक उपाय म्हणून नागरिकांनी घरात घंट्या ठेवण्याचं आवाहन सरकारनं नागरिकांना केलं आहे. अस्वलं दिसली की, नागरिकांनी घंटी वाजवावी. त्यामुळे कदाचित ही अस्वलं लांब जातील आणि या घंटीच्या आवाजानं पोलिस, आर्मीची मदतही नागरिकांना मिळू शकेल, हा यामागचा हेतू, वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, येथील डोंगराळ भागांमध्ये अस्वलांचा उद्रेक झपाट्यानं वाढतो आहे. सर्वाधिक हल्ले अकिता प्रांत आणि शेजारच्या इवाते शहरात झाले आहेत. मृत्युमुखी पावलेल्या आणि जखमी होणाऱ्या लोकांची संख्याही तिथेच जास्त आहे. नागरी वस्तीत जंगली अस्वलं दिसण्याच्या प्रकारात जवळपास दहापटीनं वाढ झाली आहे. केवळ अकिता प्रांतात आतापर्यंत सुमारे दहा हजार अस्वलं नागरी वस्तीत दिसली आहेत आणि त्यांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडलं आहे.

अगोदर स्थानिक पातळीवरील कर्मचारी, पोलिसांच्या मदतीनं अस्वलांचा उपद्रव थांबवण्याचा प्रयत्न केला गेला, पण स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं प्रांताच्या गव्हर्नरनं शेवटी सैन्याची मदत मागितली. अस्वलांना ठार मारण्याचं काम प्रशिक्षित शिकाऱ्यांकडे सोपवलं गेलं आहे. अलीकडच्या काही महिन्यांपासून जपानमध्ये अस्वलांची दहशत वाढली आहे. त्यांचे हल्ले सुपर मार्केट आणि शाळांपर्यंत पोहोचले आहेत.

अस्वलांच्या भीतीनं अनेक शाळा तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. अस्वलांच्या भीतीमुळे लोकांनी बाहेर जाणं थांबवलं आहे. अनेक कार्यक्रम पुढे ढकलले गेले आहेत. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सैन्य काजुनो, ओडेट आणि किताअकिता शहरांमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी तैनात असणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Japanese Army battles wild bears amid rising attacks, fatalities.

Web Summary : Japan deploys its army to combat aggressive bears invading human settlements, causing numerous attacks and fatalities. Over a hundred attacks in seven months resulted in twelve deaths. Schools are closed, and residents are urged to carry bells for safety as army patrols increase.
टॅग्स :Japanजपान