शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

नागपूरला दृष्ट का लागली? धर्म आणि जातींचे राजकारण करू पाहणाऱ्या मंडळींनी 'हा' धोका वेळीच ओळखलेला बरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 08:34 IST

आता या हिंसाचारावरून राजकीय दंगल पेटली आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ते आधीही सुरू होते आणि पुढेही राहतील. कारण, लोकांच्या जगण्यामरण्याच्या प्रश्नांवरील अपयश लपविण्यासाठी सत्ताधारी व विरोधकही अशा भावनिक, धार्मिक मुद्द्यांचा आधार घेऊन आपापली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतातच. 

चकचकीत सिमेंटचे रस्ते, हिरव्यागार वृक्षराजीतून वाट काढत डाैलात धावणारी मेट्रो हे नवे आकर्षण बनलेल्या सुंदर नागपूर शहरावर सोमवारी रात्री धार्मिक हिंसाचाराचा डाग पडला. मोगल बादशहा औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभर सुरू असलेल्या वादात स्थानिक आंदोलनानंतर सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या आणि शेकडोंच्या जमावाने जाळपोळ, तोडफोड केली. पोलिसांना लक्ष्य बनविले गेले. चार उपायुक्तांसह पस्तीसच्या आसपास कर्मचारी जखमी झाले. जमाव इतका हिंसक होता की पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीचा घाव पडला. लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या वापरून जमाव नियंत्रित करावा लागला. आता या हिंसाचारावरून राजकीय दंगल पेटली आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ते आधीही सुरू होते आणि पुढेही राहतील. कारण, लोकांच्या जगण्यामरण्याच्या प्रश्नांवरील अपयश लपविण्यासाठी सत्ताधारी व विरोधकही अशा भावनिक, धार्मिक मुद्द्यांचा आधार घेऊन आपापली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतातच. 

खरेतर असे एकमेकांवर आरोप करण्याऐवजी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने पोलिस जखमी होण्याइतके काय चुकले याचा शोध घ्यायला हवा. त्याचप्रमाणे अशी घटना यापुढे घडू नये यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत. कारण, महाराष्ट्राच्या उपराजधानीचा मान असलेल्या नागपूर शहराला असा धार्मिक दंगलींचा ना इतिहास आहे ना वारसा. बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर संपूर्ण देश हिंसाचारात होरपळत असतानाही नागपूर तुलनेने शांत होते. गेल्या शंभर वर्षांत १९२७ किंवा १९६७ असे एक-दोन अपवाद वगळता या शहरात असे कधी दंगेधोपे झाले नाहीत. त्याचे कारण या शहराची धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक बहुविविधता. नागपूरचे भाैगोलिक स्थान, नागपूरकर भोसल्यांचा अवध, बंगालपर्यंतचा राज्यविस्तार आणि नंतर ब्रिटिशांची कामठीच्या लष्करी छावणीवर मदार आदी कारणांनी या शहरात देशाच्या मल्याळम, तमिळ, ओडिया, बंगाली, उत्तर भारतीय असे सगळेच समाजघटक पिढ्यान् पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. त्या साैहार्दाचे प्रतिबिंब इथल्या आगळ्यावेगळ्या सण-उत्सवात, प्रथा-परंपरांमध्ये उमटलेले दिसते. हे शहर बाबा ताजुद्दीन यांच्या नावाने ओळखले जाते. बहुतांश हिंदू भक्त हे त्या श्रद्धेचे खास वैशिष्ट्य आहे. 

लगतच्या वर्धा-सेवाग्राम किंवा पवनारच्या रूपाने या भागाला महात्मा गांधींच्या अहिंसेचे अधिष्ठान आहे. इथल्या उत्सवांना इतिहासाचे कोंदण आहे. पोळ्याच्या निमित्ताने निघणारी मारबत मिरवणूक हे त्याचे सुंदर उदाहरण. हे शहर वैचारिक विविधताही जपते. यंदा शताब्दी साजरी करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही जन्मभूमी आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या ऐतिहासिक घटनेमुळे ही दीक्षाभूमी. नागपूरकरांनी या वरवर स्पर्धक वाटणाऱ्या आस्था इतक्या श्रद्धेने जपल्या की कालांतराने त्या एकमेकींना पूरकही ठरल्या आणि त्यातून भारतीय विविधतेचे एक मूर्तिमंत उदाहरणही देशासमोर, जगासमोर ठेवले गेले. नागपूरची माणसे मोकळीढाकळी आहेत. नागपुरी किंवा वैदर्भीय पाहुणचार हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. जे पोटात तेच ओठात अशा मोकळ्या व तितक्याच भिडस्त स्वभावाचे हे शहर आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये नागपूरने कात टाकली आहे. आता हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर बनले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या वेगाचे धुरीण आहेत. पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. मेट्रोचे जाळे विस्तारते आहे. उड्डाणपुलांचा नक्षीदार गोफ नागपूरच्या अंगाखांद्यावर खेळतो आहे. इथल्या विमानतळाला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होत आहे. हा विकासाचा प्रवाह अवतीभोवतीच्या जिल्ह्यांकडूनही गतिमान होत आहे. नेमक्या याच टप्प्यावर धार्मिक हिंसाचार व्हावा, शांततेला नख लागावे हे काही चांगले चिन्ह नाही. नागपूरच्या चाैफेर विकासाला अशी हिंसेची दृष्ट लागायला नको. कारण, अशा घटनांचे परिणाम दूरगामी असतात. शांतता, कायदा-सुव्यवस्था ही कोणत्याही शहराच्या, प्रदेशाच्या आर्थिक-सामाजिक विकासाची, गुंतवणूक व रोजगार निर्मितीची, विकासाची महत्त्वाची गरज असते. अशावेळी हे असे वळण नागपूरला किंवा विदर्भाला, मध्य भारताला कदापि परवडणारे नाही. धर्म व जातींचे राजकारण करू पाहणाऱ्या मंडळींनी हा धोका वेळीच ओळखलेला बरा.

टॅग्स :nagpurनागपूरPoliticsराजकारणPoliceपोलिस