शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना यू-ट्यूब बघणे ‘अलाउड’ नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 09:33 IST

...त्यामुळेच गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियानं १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन केला!

सोशल मीडियाशिवाय आज आपलं पान हलत नाही. अनेकजण तर तासनतास सोशल मीडियावर असतात. संपर्कासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे अतिशय सोपं, स्वस्त आणि सशक्त माध्यम असलं तरी त्याचे दुष्परिणामही आता झपाट्यानं समोर येत आहेत. विशेषत: मुलांच्या हातातून मोबाइल कसा काढावा आणि स्क्रीनची त्यांना लागलेली सवय कशी सोडवावी या चिंतेनं जगभरातील पालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियानं १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन केला. त्यासाठी त्यांनी संसदेत तसं बिलच पास केलं आणि थेट कायदाच करून टाकला. त्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक, एक्स.. असे अनेक प्लॅटफॉर्म मुलांसाठी बंद झाले. ऑस्ट्रेलियाच्या अनेक पालकांनी यावर सुटकेचा नि:श्वास सोडला. 

त्यावेळी यू-ट्यूबला यातून सूट देण्यात आली होती, पण यू-ट्यूबचाही अनेक मुलं उपयोगाऐवजी दुरुपयोगच करीत असल्याचं लक्षात आल्यामुळे ऑस्ट्रेलियानं आता लहान मुलांच्या दृष्टीनं यू-ट्यूबवरही हातोडा उगारला आहे. याचंही पालकांनी प्रचंड स्वागत केलं आहे. कारण मुलांच्या हातातून मोबाइल काढून घेणं हा पर्याय जगभरातल्या पालकांना शक्य झालेला नाही. आता कायद्यानंच त्यावर दंडक घातला गेल्यानं आणि मुलांचा स्क्रीन वापर मर्यादित करण्यात आल्यानं त्याचा उपयोग होईल असा अनेकांचा होरा आहे. सोळा वर्षांच्या आतील मुलांसाठी सोशल मीडिया आणि यू-ट्यूब बॅन करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश आहे. 

यू-ट्यूब अकाउंट उघडण्यासाठी मुलांवर आता अनेक निर्बंध आणण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे त्यासाठीच्या अनेक पळवाटाही आता ऑस्ट्रेलियन सरकारनं बंद करून टाकल्या आहेत. यू-ट्यूबवर मुलांना अकाऊंट उघडायचं असेल तर आधी पालकांची परवानगी घ्या किंवा जी अकाऊंट्स आधीच सुरू आहेत, त्यांना सूट द्या.. असला कुठला प्रकारच त्यांनी ठेवलेला नाही. मुलांना यू-ट्यूब प्लॅटफॉर्मवर अकाऊंट उघडता येऊ नये यांची सर्वस्वी जबाबदारी यू-ट्यूबची असेल. यासाठी सुमारे एक वर्षाचा अवधी सरकारनं यू-ट्यूब चॅनलला दिला आहे. यू-ट्यूबनं या कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यांना पाच कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा (सुमारे २८३ कोटी रुपये) दंड होऊ शकतो! 

अर्थातच यू-ट्यूब चॅनलचे प्रवर्तक यावर प्रचंड नाराज झाले असून, त्यांनी म्हटलं आहे, मुळात यू-ट्यूब हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाही. यू-ट्यूब हे एक व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे सोशल मीडियाचे नियम आम्हाला लागू केले जाऊ शकत नाहीत. यू-ट्यूब म्हणजे हाय क्वॉलिटी व्हिडीओ  कंटेंटचं एक कलेक्शन आहे, जे टीव्हीवरदेखील पाहता येऊ शकतं. यावर काय पावलं उचलायची यासंदर्भात आम्ही विचार करू, सरकारशीही बोलू आणि गरज पडली तर न्यायालयातही जाऊ..यासंदर्भात ऑस्ट्रेलियाच्या दूरसंचारमंत्री अनिका वेल्स यांचं म्हणणं आहे, या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, की दहापैकी चार मुलांनी आम्हाला सांगितलं आहे की, त्यांचं सर्वाधिक नुकसान यू-ट्यूबमुळे झालं आहे. मुलांच्या भल्याची आणि भविष्याची ही लढाई आहे. यू-ट्यूबच्या कायदेशीर कारवाईच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही!..  

टॅग्स :YouTubeयु ट्यूबAustraliaआॅस्ट्रेलियाStudentविद्यार्थी