शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कोप झाला; शेतकरीच धान्य खरेदीसाठी बाजारात गेला !

By गजानन दिवाण | Updated: December 26, 2018 13:29 IST

मराठवाड्यात सर्वच ठिकाणी हे चित्र पहायला मिळत आहे. असे धान्य विकत घेऊन पुढचे अख्खे वर्ष शेतकरी कसा जगणार, हाच मोठा चिंतेचा विषय आहे.

- गजानन दिवाण

धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यालाच बाजारात जाऊन धान्य विकत घेण्याची वेळ आली असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव कुठले ? ४६ वर्षांपूर्वी म्हणजे १९७२ सालच्या दुष्काळातही असेच घडले होते. यंदाची स्थिती त्यापेक्षाही भयंकर आहे. त्यावेळी शेतकऱ्यांना फक्त धान्य विकत घ्यावे लागले होते. यावेळी शेतकऱ्यांना धान्य विकत घ्यावे लागणार आहेच. जनावरांसाठीचा चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठीही पैसे मोजावे लागणार आहेत. निसर्गाचा कसला हा कोप म्हणायचा ?

मराठवाड्यातील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केली. त्यांनी शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविलेल्या अहवालात ८,५३३ पैकी ७,२८१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी, तर १,२५२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यांतील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी, तर हिंगोली जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे. परभणी जिल्ह्यातील ७७२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी व उर्वरित ७७ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे. नांदेड जिल्ह्यातील १ हजार ९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी व उर्वरित ४६८ गावांची जास्त आहे.  दुष्काळामुळे मराठवाड्यातील सुमारे ४८ लाख  हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. विभागातील ७ हजार २८१ गावे कमी पावसामुळे प्रभावित झालेली आहेत. विभागातील ४२१ मंडळांपैकी ३१३ मंडळात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. 

त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांच्या घरात खायला ना ज्वारी राहिली ना गहू. वर्षभराचा साठा ठेऊन उरलेले धान्य पैशांच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीच विकून टाकले.  त्यामुळे आता घरात काहीच शिल्लक राहिले नाही. परिणामी धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनाच धान्य विकत घ्यावे लागत आहे. औरंगाबादेतील जाधववाडी बाजारात गेल्या आठवड्यात आबासाहेब घडामोडे हा शेतकरी ५ गोणी तूर घेऊन आला होता. ४५०० ते ४९०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान तूर विक्री झाली. या पैशांतून त्याने २ क्विंटल गहू खरेदी केला. झाल्टा येथील हरिभाऊ शिंदे यांनीही १२ गोणी तूर विक्रीला आणली होती. ती विकून त्यांनी गहू खरेदी केला. मराठवाड्यात सर्वच ठिकाणी हे चित्र पहायला मिळत आहे. असे धान्य विकत घेऊन पुढचे अख्खे वर्ष शेतकरी कसा जगणार, हाच मोठा चिंतेचा विषय आहे. 

दुष्काळाचे एवढे मोठे भूत शेतकऱ्यांच्या डोक्यावर असताना सरकार घोषणा करण्यातच धन्यता मानत आहे. तुरीला हमीभाव पाच हजार ६०० असला तरी बाजारात शेतकऱ्यांना साडे चार हजार रुपयांचाच भाव मिळत आहे. म्हणजे आधी तर पिकत नाही आणि जे काही पिकले त्याला भावही मिळत नाही. यापूर्वीच्या सर्व दुष्काळांमध्ये त्या त्या सरकारने सर्व पक्षांना सोबत घेऊन उपाययोजना केल्या. आता तसे घडत नाही. या दुष्काळाबद्दल कुणाला फारसे गांभीर्यच राहिले नाही. सरकार पातळीवर निर्णय होत नाहीत आणि झाले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही.  

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर होऊन आता दोन महिन्यांचा काळ उलटला. केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक येऊनही तीन आठवडे उलटली. बळीराजा अजुनही मदतीच्या प्रतीक्षेतच आहे.  खरीप नाही आणि रबीही नाही. घरात धान्य नाही. जनावरांना चारा नाही आणि पाणीही नाही. बँका कर्ज देत नाहीत. सावकार दारात उभा करीत नाही. अशा स्थितीत हे अख्खे वर्ष या शेतकऱ्याने जगायचे कसे यावर कोणीच बोलताना दिसत नाही. या दुष्काळचक्रातून त्याची सुटका कोणते सरकार करेल? काँग्रेस सरकारचा मोठा कालखंड या बळीराजाने अनुभवला. मोदी सरकारचे अच्छे दिनही त्याने अुनभवले. आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर?

डिसेंबरमध्येच ७०५ टँकरमराठवाड्यातील दुष्काळ गंभीर वळणावर पोहोचू लागला आहे. डिसेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट सध्या विभागासमोर आहे. १६ लाख २२ हजार २७६ नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. ७०५ टँकर पाच जिल्ह्यांत सध्या सुरू असून, भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

शेतकरी नवरा नको म्हटले तर चुकले कुठे ?उपवर लेक असेल तर शेतकरी असलेले वडील शहरातले नोकरदार स्थळ पाहतात.  या शेतकऱ्याच्याच शेती करणाऱ्या मुलाला मात्र कोणीही मुलगी देत नाही. मग लग्न जमेपर्यंत नोकरी द्या अशी विनवणी शेतकरी बाबा आणि त्याचे शेतकरी मूल करताना दिसतात. तरीही मुलगी मिळत नाही. कारण प्रत्येक मुलीला शेतकरी नवरा नकोच आहे... काही महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आणि संगमनेर तालुक्यातील ४५ गावांत हेरंब कुलकर्णी आणि विठ्ठल शेवाळे यांनी अभ्यास केल्यानंतर समोर आलेले हे वास्तव.  या मुली चुकत आहेत असे तरी कसे म्हणायचे? 

धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यालाच धान्य विकत घ्यावे लागत असेल तर कुठल्या भरवशावर तिने शेतकरी नवऱ्यासोबत संसार थाटायचा? गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर शेतकऱ्यांना दुष्काळाने गाठले नाही, असे एकही वर्ष गेले नाही. कधी हा दुष्काळ कोरडा असतो तर कधी ओला. यातूनही निसर्गाची कृपा झालीच तर सरकारच्या अवकृपेतून भाव पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी दुष्काळ हा कायम ठरलेला असतो. 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेती