शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या केसाला धक्का लावाल, तर सत्ता गमावाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2022 12:59 IST

गेल्या वर्षात इराणमधल्या मुली-बायकांच्या केसात स्वातंत्र्याचे वारे शिरले आणि तो अख्खा देश पेटून उठला.. या लढ्यात पुरुषही उतरले हे फार महत्त्वाचे!

-संजय आवटे, संपादक, लोकमत, पुणे

तर गोष्ट अशी सुरू होते. दोन देवदूत धरतीवर येतात आणि येताक्षणी पृथ्वीच्या प्रेमात पडतात. देवांचे जग हादरते. त्यांच्या स्वर्गापेक्षा काहीतरी सुंदर आहे, या कल्पनेने त्यांचा थरकाप उडतो. पृथ्वीवर असे काय आहे, असा प्रश्न देवांना पडतो. मग त्यांना समजते, पृथ्वीवर 'प्रेम' आहे. आणि, देव असण्यापेक्षा माणूस होणे अधिक सुंदर आहे.!

'सेल्फी विथ डेमोक्रॅसी' या चित्रपटातला हा प्रसंग. मैत्रिणींसोबत होमा हा सिनेमा पाहात होती. असे चित्रपट पाहणे हे इराणच्या कायद्याच्या विरोधात होते. पण, चोरून तिने हा चित्रपट मिळवला आणि पाहिलाही. स्वर्गापेक्षा पृथ्वी अधिक रम्य आहे, हे खरेच. पण, ज्या देशात माणसाला साधे आपल्या मनाप्रमाणे कपडे घालता येत नाहीत, त्या देशाचे काय करायचे, असा प्रश्न तिला पडला. तिची अम्मी म्हणाली, "मला तर हिजाब आवडतो. तुला अडचण काय आहे?" होमा म्हणाली, "तुला हिजाब आवडतो, तर कोणी तो काढून टाक, असे म्हणू नये. पण मला आवडत नाही. तर तो घालण्याची सक्तीही करू नये.” पण, तिचे हे उत्तर हवेतच उरले.

तिच्याच वयाची महसा अमिनी ड्रेस कोडला विरोध केल्यानं आणि केस कापल्यानं पोलिसांनी तिला अटक केली. इराणमध्ये तेवढ्याचसाठी खास पोलिस आहेत. 'गश्त-ए-इर्शाद म्हणजे 'मोरल पोलिस' ही कोवळी पोर पोलिसांच्या मारहाणीत आजारी पडली आणि अखेर अल्लाघरी गेली. अवघा देश त्यामुळे पेटून उठला.

'सेल्फी विथ डेमोक्रॅसी' पुन्हा पुन्हा पाहून घराबाहेर पडणारी होमा एकटी नव्हती. अनेक मुली महिला बाहेर पडल्या. घुसमटून मरण्यापेक्षा रस्त्यावर हुतात्मा होऊ, म्हणत हिजाब भिरकावून देऊ लागल्या. केस कापू लागल्या. सरकारने त्यांना अटक केली. अनेक जणी जिवाला मुकल्या. पण, स्वस्थ बसल्या नाहीत.

इराणमधील आंदोलनाचे एक वेगळेपण हे की, कलावंत, लेखक, पत्रकार, खेळाडू तिथे बोलतात. त्या बोलण्याची किंमत चुकवतात. 'द सेल्समन' या ऑस्करविजेत्या चित्रपटातील अभिनेत्रीला, तराने अलीदोस्तीला गजाआड टाकले गेले. इराणचा प्रख्यात फूटबॉलपटू अली दाई याचा पासपोर्ट जप्त झाला. का? सरकारविरोधी आंदोलनांना पाठिंबा दिला म्हणून!

इराणमध्ये सर्वसामान्य माणसाचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न गेली चार दशके सुरू आहे. अयातुल्ला खोमेनीने १९७९ मध्ये शरिया कायद्याच्या नावाखाली इराणवर कब्जा केला आणि त्यानंतर बायका बुरख्यात बंद झाल्या. या धर्मांध कायद्यांना जो कोणी विरोध करेल, त्याला थेट फासावर लटकवले जाऊ लागले. फासावर गेलेले पुरुष काही कमी नाहीत. पण, एवढे होऊनही इराण सतत बोलत राहिला. या बोलणाऱ्यांमध्ये आघाडीवर होत्या महिला. शिरीन एबादीसारखी वकील झुंजत राहिली. तिला देशाबाहेर हाकलले गेले. पण, ती आपला लढा लढत राहिली. शिरीनला नोबेल पुरस्कार मिळाला.

इराणमध्येच जन्मलेली आणि आता अमेरिकेत आश्रय घेणारी पत्रकार मसीह अलीनिजाद अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या तिच्या आत्मचरित्राचे नावच आहे. 'द विंड इन माय हेअर माय फाइट फॉर फ्रीडम इन मॉडर्न इराण, केसांमधले हे वादळ आणखी वाढत चालले आहे. हिजाबविरोधी चळवळीचे वार्तांकन करणारी पत्रकार निलोफर सध्या अटकेत आहे. तिनेच महसाची बातमी जगासमोर आणली. पत्रकारांच्या या अँगलचे मोठे भय असते व्यवस्थेला, निलोफरच्या अटकेने वातावरण आणखी तापले. कमाल तर तेव्हा झाली, जेव्हा फूटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत इराणच्या संघाने राष्ट्रगीत म्हणायला नकार दिला! अवघा देश पेटला. कधीही माफी न मागणारा हुकूमशहा अखेर नरमला. लढाई संपलेली नाही. पण, सरत्या वर्षाच्या गर्भात उद्याचा उषःकाल मात्र दिसला. देशातील नैतिक पोलिस बरखास्त करण्याचा निर्णय इराण सरकारला जाहीर करावा लागला. तेव्हा होमा कदाचित एवढेच म्हणाली असेल जो आज साहिबे मसनद है कल नहीं होंगे, किरायेदार है, जाती मकान थोड़ी है।

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Iranइराण