शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या ‘पिकॅक्स माउंटन’नं ट्रम्पला फोडला घाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 10:30 IST

... हे ठिकाण उद्ध्वस्त करण्यासाठी जमिनीवरून सैन्य पाठवावं लागू शकतं. हा अभेद्य किल्ला केवळ अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरलेला नाही, तर इराणसाठी तो टर्निंग पॉइंटही ठरला आहे. 

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धाला जवळपास तीन आठवडे उलटून गेले असले तरी हे युद्ध अजून थांबायचं नाव नाही. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांना ठार मारल्यानंतरही इराणनं माघार घेतलेली नाही, उलट, अधिकच जोरानं प्रतिहल्ले सुरू केल्याचं दिसतं आहे. काही दिवसांतच आम्ही इराणला शरणागती घेण्यास भाग पाडू आणि हे युद्ध लगेच संपेल, अशा वल्गना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्या असल्या तरी उलट आता या युद्धानं विक्राळ रूप धारण केलं आहे.

पण इराणबाबत इस्रायल आणि अमेरिकेचा अंदाज इतका का चुकला? कशाच्या भरवशावर इराण अजूनही इतक्या खमकेपणानं या दोन्ही बलाढ्य आणि इतरही आखाती देशांशी लढत आहे? - त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इराणकडे असलेली अण्वस्त्र क्षमता आणि त्यांच्याकडे असलेला ९०० पाउंड युरेनियमचा साठा! हा साठा एकदाचा ‘संपवला’ की इराणची युद्धक्षमता संपेल, तो शरणागती पत्करेल आणि युद्धही संपेल.. युरेनियमचा हा साठा आम्ही लवकरच नष्ट करू असं ट्रम्प यांचं म्हणणं होतं; पण हा साठा सहजासहजी अमेरिका-इस्रायलच्या हाती लागणार नाही, याची तजवीज इराणनं आधीच करून ठेवली आहे. त्याच बळावर इराण अजूनही लढत आहे, अमेरिका-इस्रायलला विजय मिळालेला नाही आणि इराणनं त्यांच्या नाकीनव आणले आहेत! 

आपला युरेनियमचा साठा नष्ट करण्यासाठी अमेरिका जंग जंग पछाडेल, हे इराणला आधीच ठाऊक असल्यानं त्यांनी आपला हा साठा ‘पिकॅक्स माउंटन’मध्ये दडवून ठेवला आहे. जमिनीच्या तो खूप खाली आहे आणि हा भाग जवळपास अभेद्य बंकर मानला जातो. पिकॅक्स माउंटन ही इराणमध्ये असलेली अतिशय गुप्त आणि खोल भूमिगत अणुसुविधा आहे, जी नतान्झ अणुकेंद्राजवळ झाग्रोस पर्वतरांगेत बनवली गेली आहे. 

या ठिकाणाला ‘कुह-ए कोलांग गाझ ला’ असंही म्हटलं जातं. या साठ्याचं संरक्षण करण्यासाठी आजही तिथे मोठ्या प्रमाणावर बंकर्स, बोगदे खोदणं आणि बांधकाम सुरू आहे. अधिक संशोधनासाठी वैज्ञानिकही इथे चोवीस तास तैनात आहेत. याच ठिकाणी इराणनं युरेनियमचा साठा दडवून ठेवला असून, तिथे सेंट्रिफ्यूज निर्मिती होत असल्याचा अमेरिकेला संशय आहे. या पर्वतरांगांची आणि त्यातील बंकर्सची रचनाही इतकी गुंतागुंतीची, खोल आहे की ‘बंकर बस्टर बॉम्ब’ही इथे प्रभावी ठरणार नाहीत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे ठिकाण उद्ध्वस्त करण्यासाठी जमिनीवरून सैन्य पाठवावं लागू शकतं. हा अभेद्य किल्ला केवळ अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरलेला नाही, तर इराणसाठी तो टर्निंग पॉइंटही ठरला आहे. 

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनंही गेल्यावर्षी मान्य केलं होतं की, ६० टक्के शुद्धतेचं ४०९ किलोग्रॅम (सुमारे ९०२ पाउंड) युरेनियम शोधण्यात अडचण आली आहे आणि हे युरेनियम इराणकडे आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, एवढ्या युरेनियमपासून अत्यंत शक्तिशाली असे ११ अणुबॉम्ब सहज तयार होऊ शकतात! जून २०२५मध्ये अमेरिकन-इस्रायली हल्ल्यांनंतर हे ठिकाण इराणसाठी महत्त्वाचं अणुकार्य केंद्र म्हणून समोर आलं आहे. कारण जुन्या अणुठिकाणांच्या तुलनेत हे खूपच सुरक्षित आणि खोल आहे. ‘पिकॅक्स माउंटन बंकर’ पर्वताखाली ३३० फुटांपेक्षा जास्त खोल असल्यानं पारंपरिक शस्त्रांनी ते नष्ट करणं अशक्य आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's 'Pickaxe Mountain' Sweats Trump: Uranium Stockpile Hides Deep

Web Summary : Iran's nuclear program, hidden in the 'Pickaxe Mountain' bunker, thwarts US-Israeli efforts. The deep, fortified facility protects a large uranium stockpile, enabling Iran to continue its resistance and posing a significant challenge to its adversaries.
टॅग्स :IranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पWarयुद्ध