शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

निसर्गरम्य राजभवनातल्या वादळाचा अन्वयार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 11:56 PM

नीरव शांततेत वसलेल्या राजभवनात सध्या निराळीच खदखद सुरू आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील वादाला आवर घातला गेला पाहिजे!

- राही भिडे

मुंबई शहरातील अतिशय सुंदर वास्तू असलेले राजभवन हे राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान. भव्य वनराईने नटलेले.  राजभवनाचे अप्रतिम सौंदर्य डोळे भरून पाहत रहावे असे. ब्रिटिशांनी उभारलेली ही वास्तू दाद द्यावी अशीच. ब्रिटिश गव्हर्नर तिथे राहात असे. समुद्र कितीही उसळी मारु लागला, भरतीच्या लाटा खडकांवर एका पाठोपाठ आदळू लागल्या, वादळ धडकून निसर्गाने रौद्ररुप धारण केले तरी राजभवनाला निसर्ग प्रकोपाचा फटका कधी बसला नाही. जणू या ऐतिहासिक निसर्गरम्य, शांत निरामय वास्तूचे लावण्य टिकून राहावे असे त्या वादळालाच वाटत असावे. या देखण्या राजभवनाला कधी कशाचा तडाखा बसला नाही हे विशेष. 

नीरव शांततेत वसलेले हे राजभवन सध्या वरकरणी शांत दिसत असले तरी आत निराळीच खदखद सुरू  आहे. राज्यपाल आणि सरकार यांच्यातील वादविवाद विकोपाला जाईल की काय अशी शंका निर्माण झाली आहे. राज्यपाल पद हे संविधानिक पद. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार राज्यपालांनी जबाबदारीचे वहन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांचा सरकारशी विचार विनिमय आवश्यक असतो. पण सध्या मात्र संवादाची जागा विसंवादाने घेतली आहे. राजभवन आणि सरकार यांच्यात खटके उडणे हे  लोकशाहीच्या संवर्धनासाठी योग्य  नाही. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मूळचे कट्टर स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले. बोलणे कमी पण आपल्याला हवे ते करून घेणारे, अधिकार बजावणारे आणि उक्ती पेक्षा कृती करावी असे दाखवून देणारे !  संघाची काळी टोपी  त्यांनी कायम धारण केलेली असते. ही टोपी कधी काढायची नाही, बाजूला सारायची तर अजिबात नाही ! मध्यंतरी एकदा राज्यपालांची भेट झाली, फोटो काढताना गप्पांच्या ओघात ते  हसत हसत म्हणाले, माझी टोपी हिच माझी ओळख आहे. (मेरी टोपी मेरी पहचान है) यावरुन त्यांच्या निष्ठेची कल्पना करता येईल. तेव्हा जे करायचे आहे ते  आपल्या अधिकारात करणारच असा त्यांचा एकंदर खाक्या दिसतो. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदग्रहण केल्यापासून सहा महिन्यात त्यांना विधान परिषदेवर निवडून जाणे आवश्यक होते. त्यात राज्यपालांनी वेळकाढूपणा केला तेव्हापासून वादाची ठिणगी पडली. विधान परिषदेवर नामनियुक्त केल्या जाणाऱ्या १२ जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या भरल्या तर आघाडी सरकारचे विधान परिषदेतील संख्याबळ वाढेल. पण त्याबद्दल राज्यपाल कोश्यारींनी मौन बाळगले आहे. “भरु सावकाश, काय घाई आहे”, असाच त्यांचा अविर्भाव असतो. परंतु “रिक्त झालेले विधानसभा अध्यक्षपद केव्हा भरणार?” हे मात्र  त्यांनी सरकारला अधिकारवाणीने पत्राद्वारे विचारले आहे.

राज्यपालांचे हे वागणे काहींना गंमतीचे वाटू शकते परंतु सरकारचा तणाव वाढवणारे मात्र नक्कीच आहे.  मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याऐवजी काेरोना काळात परस्पर अधिकाऱ्यांची बैठक बोलावणे, मुख्यमंत्र्यांनी वापरलेल्या ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दावरुन उपहासात्मक भाषेत पत्र लिहून “आता हिंदुत्व सोडले का?”- असा खोचक प्रश्न विचारणे, त्यावर शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहिणे अशा प्रकारे सरकारला कामाला लावायचे आणि गंमत पहायची असे राज्यपाल करत राहातील, तर कसा राहणार सुसंवाद?

राज्यपाल सरकारला जुमानत नाहीत हे बघून उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे विमान जमिनीवरून उडू दिले नाही. राज्यपालांनी लोकशाहीचे संकेत बाजूला सारून सरकारला बोचकारे ओढण्याचे प्रकार केले. त्याबदल्यात सरकारने राजशिष्टाचार अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना जो झटका दिला ते सारेच राज्यपाल पदाची अप्रतिष्ठा करणारे होते.

राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत असून एरवी शांत असलेल्या राजभवनात चांगलेच वादळ उठले आहे. लोकशाहीचे संकेत या वादळाने उधळून लावले आहेत. लोकशाहीचे प्रतिक असलेल्या राजभवनाची प्रतिष्ठा राखायची असेल, तर हे वादळ थोपवावे लागेल.  (‘यथार्थ’ हा स्तंभ दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी प्रसिद्ध होईल.)

 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार