भारतीय एकतेचे शिल्पकार..

By Admin | Updated: October 31, 2014 00:14 IST2014-10-31T00:14:04+5:302014-10-31T00:14:04+5:30

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील संस्थानांचे विलीनीकरण करणो ही एक अत्यंत कठीण समस्या होती.

Indian Solidarity Architect .. | भारतीय एकतेचे शिल्पकार..

भारतीय एकतेचे शिल्पकार..

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील संस्थानांचे विलीनीकरण करणो ही एक अत्यंत कठीण समस्या होती. 6क्क् च्या जवळपास संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्याचा कार्यक्रम यशस्वीपणो राबविल्याबद्दल देशातील जनता सरदार वल्लभभाई पटेल यांना ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ही आदरांजली..
 
सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातील एक नामवंत विधिज्ञ आणि प्रसिद्ध राजकीय मुत्सद्दी नेते म्हणून देशातील जनतेला परिचित होते. भारतात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जी आंदोलने झाली त्या आंदोलनातील एक 
प्रमुख नेते सरदार वल्लभभाई पटेल होते. 1947 मध्ये 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, पहिली तीन वर्षे देशाचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री या नात्याने त्यांनी देशाचा कारभार बघितला.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 ला गुजरात राज्यातील नाडियाड येथे झाला. करमसदमध्ये प्राथमिक विद्यालय आणि पटेलादमध्ये उच्च शिक्षण त्यांनी घेतले. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली. पुढे त्यांनी वकिलीची परीक्षा पास केल्यानंतर ते 19क्क् पासून गोधरा येथे स्वतंत्रपणो वकिली करीत असत.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील संस्थानांचे विलीनीकरण करणो ही एक अत्यंत कठीण समस्या होती. 6क्क् च्या जवळपास संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्याचा कार्यक्रम यशस्वीपणो राबविल्याबद्दल त्यांना देशातील जनता ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखते.
सरदार पटेल यांनी भारतातील सामाजिक आणि आर्थिक संरचनेमध्ये समाजवादी विचारांना आचरणात आणण्याचे प्रयत्न केलेत. त्यांनी गुजरातमध्ये खेडा, बोरसाड आणि बारडोली येथे शेतक:यांची व्यापक चळवळ उभारली होती. ब्रिटिश राजवटीविरुद्ध ‘चले जाव’ आंदोलन उभे केले.
1929 मध्ये लाहोर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी सरदार वल्लभभाई पटेल व महात्मा गांधी यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. महात्मा गांधी 
यांना कळले होते की, या लाहोरच्या अधिवेशनात ‘स्वाधीनता’च्या प्रस्तावाला मान्यता मिळू शकते. त्यामुळे महात्मा गांधी यांनी आपले नाव परत घेतले. सरदार पटेल यांच्यावरही अध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणला गेला. शेवटी  काँग्रेसने 1929 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली. 193क् मध्ये मिठाच्या सत्याग्रहात उतरल्यामुळे ब्रिटिश शासनाने सरदार वल्लभभाई पटेल यांना तीन महिन्यांसाठी तुरुंगात टाकले होते.
मार्च- 1931 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या कराची अधिवेशनात त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. जानेवारी 1932 ला त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. जुलै 1934 मध्ये ते तुरुंगातून बाहेर पडले आणि 1937 च्या निवडणुकीत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीची संघटनात्मक बांधणी केली.
ऑक्टोबर 194क् मध्ये काँग्रेस पक्षातील अन्य नेत्यांसोबत सरदार पटेल यांना अटक करण्यात आली होती. दुस:या महायुद्धाच्या काळात जेव्हा जपानकडून भारतावर हल्ले होण्याची भीती होती, त्या वेळी सरदार पटेल यांनी महात्मा 
गांधी यांच्या अहिंसेच्या विचारधारेला अव्यावहारिक ठरवून विरोध केला. त्याचसोबत सत्ता हस्तांतरणाच्या मुद्यावर 
सरदार पटेल यांचे महात्मा गांधी यांच्यासोबत वैचारिक मतभेद होते. पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र मुसलमानांना देऊन टाकणो भारतसाठी हिताचे ठरेल, असे सरदार वल्लभभाई पटेल यांचे मत होते.
1945-46 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पटेल पुन्हा  उमेदवार होते; पण महात्मा गांधी यांनी हस्तक्षेप करून पंडित  नेहरू यांना अध्यक्षपदी पुन्हा बसविले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष या नात्याने पंडित नेहरू यांना ब्रिटिश व्हाईसरॉयनी अंतरिम सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. भारताची पहिली तीन वर्षे उपपंतप्रधान, गृहमंत्री म्हणून सरदार पटेल राहिले; पण त्यापेक्षा एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून भारतातील राजे-महाराजे यांना अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने भारतीय संघात समाविष्ट करून, भारत देशाला एकसंध ठेवण्यात ते यशस्वी ठरले होते.
पटेल यांनी 5 जुलै 1947 रोजी हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढला वगळून भारतातील सगळी संस्थाने भारतात विलीन करून घेतली. जुनागढचे नवाबच्या विरोधात तेथील जनतेत असंतोष होता त्यामुळे तो पाकिस्तानमध्ये निघून गेला आणि जुनागढ भारतात विलीन झाले. हैदराबादच्या निजामाने भारतात विलीन होण्याच्या प्रक्रियेत विरोध केला होता. तेव्हा त्याच्या विरोधात भारतीय सेना पाठवून सरदार पटेल यांनी  हैदराबादच्या निजामाला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले.
भारतीय राष्ट्रीय आंदोलनाला वैचारिक व विधायक दिशा देऊन राजकीय पटलावर गौरवशाली इतिहास घडविल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय राजकारणातील चाणक्य म्हटले जाते. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे देशातील जनता बघते.
चीनचे पंतप्रधान चाऊ-एन-लाय यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहून तिबेटला चीनचा भाग म्हणून मान्यता द्या, अशी मागणी केली. त्या वेळी सरदार पटेल यांनी तिबेटवर चीनचे प्रभुत्व कदापि मान्य करू नये, असा सल्ला नेहरूंना दिला पण पटेल यांचे म्हणणो नेहरू यांनी मानले नाही. त्या लहानशा चुकीमुळे चीनने भारताच्या भू-भागामधील 4क् हजार वर्ग फूट जमीन आज बळकावली आहे. लक्षद्वीप समूहाला भारतात विलीन करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती.
 
विलास मनोहर
मुक्त पत्रकार

 

Web Title: Indian Solidarity Architect ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.