Independence Day 2021: योग्य पाऊल उचललं अन् भारतानं झेप घेतली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 08:53 AM2021-08-15T08:53:28+5:302021-08-15T08:54:26+5:30

Celebrating Happy Independence Day 2021: सुरुवातीच्या पहिल्या २०-२५ वर्षांमध्ये आपण या ठळक धोरणासंदर्भात विचारविनिमय करत त्या आणल्या आणि राबविल्याही. ही सगळी क्षेत्रे आपल्यासाठी नवीन होती तरीही पहिल्या २० वर्षात आपण प्राथमिक स्तरावर का असेना उत्तम काम केले.

Independence Day 2021: India took the right step and took a leap! | Independence Day 2021: योग्य पाऊल उचललं अन् भारतानं झेप घेतली!

Independence Day 2021: योग्य पाऊल उचललं अन् भारतानं झेप घेतली!

Next

- विनायक पात्रुडकर

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण काय काय केले; तर सगळ्यात पहिल्यांदा १९४९ साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण केले. १९५० साली योजना आयोग, १९५१ साली आयआयटी खरगपुर आणि पहिली पंचवार्षिक योजना, १९५३ साली एअर इंडियाचे राष्ट्रीयकरण, १९५६ साली एलआयसी आणि १९६५ साली हरितक्रांती; आणि या सगळ्या नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९६९ साली झालेले १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण. 
सुरुवातीच्या पहिल्या २०-२५ वर्षांमध्ये आपण या ठळक धोरणासंदर्भात विचारविनिमय करत त्या आणल्या आणि राबविल्याही. ही सगळी क्षेत्रे आपल्यासाठी नवीन होती तरीही पहिल्या २० वर्षात आपण प्राथमिक स्तरावर का असेना उत्तम काम केले. यानंतर देशाने सर्वात मोठे पाऊल टाकले ते म्हणजे १९९१ साली; या काळात आपण आर्थिक उदारीकरण स्वीकारले. ही घटना आपल्यासाठी मैलाचा दगड ठरली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी उचललेल्या या पावलामुळे आपण दूरदर्शी ठरलो. आर्थिक उदारीकरणाने देशाची कवाडं खुली झाली आणि अनेक पातळीवर देशाने आणि सोबतच देशवासीयांनी मोठी झेप घेतली आहे. 

टेलिकॉम रिव्होल्यूशन
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आणलेल्या टेलिकॉम रिव्होल्यूशनमुळे डिजिटलायजेशन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. सुरुवातीच्या काळात आपली प्रगती धीमी होती, असे म्हणणे योग्य नाही. कारण माहिती तंत्रज्ञानाचे युग १९९४ नंतर सुरू झाले. तेथूनच आपल्या खऱ्या प्रगतीची सुरुवात झाली. 

डिजिटल इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधार कार्ड आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा घेतलेला आधार महत्त्वाचा ठरत आहे. डिजिटल इंडिया कार्यक्रम देशाच्या प्रगतीला पूरक ठरला. 

स्टार्टअप इंडिया
गेल्या २० वर्षात आणखी एक महत्त्वाचे काम झाले ते म्हणजे स्टार्टअप. याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली. त्यामुळे तरुणांकडून स्वयंरोजगार निर्माण झाला. आता सरकार या तरुणांना मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे. 
    (संदर्भ सहकार्य : नितीन पाेतदार, काॅर्पाेरेट लाॅयर)
 

Web Title: Independence Day 2021: India took the right step and took a leap!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.