शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day 2021 : अन् अमेरिकी गहू खाणारा देश बदलला!, ‘पंचवार्षिक’ अभिमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 09:08 IST

Celebrating Happy Independence Day 2021: स्वतंत्र भारताच्या विकासाची वाट कृषी क्षेत्रातून काढता येऊ शकते, यावर ते ठाम होते. म्हणूनच पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी-औद्योगिक विकास आणि सिंचन योजनांवर भर देण्यात अला.

- नंदकिशोर पाटील

राज्यघटनेतील लोककल्याणकारी संघराज्याच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप देण्यात पंचवार्षिक योजनांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. लोकशाहीची तत्त्वे तळागाळापर्यंत रुजवायची असतील तर सर्वसामान्य माणसांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे, या नीतीवर पंचवार्षिक योजनांची आखणी करण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होताच. त्यामुळे जोसेफ स्टालिन यांनी सोव्हिएत युनियनमध्ये यशस्वीपणे राबविलेल्या पंचवार्षिक योजनेचे प्रारूप नेहरूंनी भारतात आणले आणि १९५१ मध्ये पहिली पंचवार्षिक योजना लागू केली.

स्वतंत्र भारताच्या विकासाची वाट कृषी क्षेत्रातून काढता येऊ शकते, यावर ते ठाम होते. म्हणूनच पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी-औद्योगिक विकास आणि सिंचन योजनांवर भर देण्यात अला. हिराकूड, भाक्रा-नांगलसारख्या धरणांची पायाभरणी केली. कधीकाळी अमेरिकेतील गव्हावर विसंबून राहणारा देश बघताबघता अन्नधान्याच्या बाबतीत नुसता स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देश बनला. नेहरूंची दूरदृष्टी आणि पंचवार्षिक योजनांची ही फलश्रुती आहे.

गेल्या ७४ वर्षांच्या कालखंडात आजवर बारा पंचवार्षिक योजना झाल्या. हरितक्रांती, श्वेतक्रांती, अणुऊर्जा, अण्वस्त्र निर्मिती, औद्योगिक विकास, संगणक क्रांती आणि जागतिकीकरण असे महत्त्वाचे टप्पे पार करत भारताची आज विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल सुरू आहे.

पंचवार्षिक योजनांचे फलित काय?- भारताच्या आर्थिक विकासाची पायाभरणी- सर्वसमावेशक विकास सूत्राची अंमलबजावणी- कृषी उत्पादनात स्वयंपूर्ण- औद्योगिक विकासाला चालना- शिक्षणाचे सार्वत्रीकरण, साक्षरता वाढली- हरितक्रांती, धवलक्रांती- अवकाश संशोधनात भरारी- अण्वस्त्रांची निर्मिती- पायाभूत सुविधांचा विकास- दळणवळण सुलभ- सिंचन क्षमतेत वृद्धी- आदिवासी, मागास वर्गांचा विकास

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन