शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बधिर झालेला देश गुंगीतून जागा व्हावा म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 05:47 IST

केवळ निवडणुकीतल्या विजयाने पालटेल इतके ‘वास्तव’ सोपे नाही. देशाची विवेकबुद्धी जागी करण्यासाठीच ‘भारत जोडो’चे पदयात्री निघाले आहेत!

डॉ. गणेश देवी‘दक्षिणायन’चे प्रणेते, सांस्कृतिक क्षेत्रातले कार्यकर्ते

केवळ निवडणुकीतल्या विजयाने पालटेल इतके ‘वास्तव’ सोपे नाही. देशाची विवेकबुद्धी जागी करण्यासाठीच ‘भारत जोडो’चे पदयात्री निघाले आहेत!

आधुनिक जगाच्या इतिहासात ‘३५०० किलोमीटर अंतर पार करणारी एक सामूहिक पदयात्रा’ ही घटना निर्विवादपणे विलक्षण आहे. अशा प्रकारच्या पदयात्रा याआधीही निघाल्या. मात्र पायी चालत, एवढे अंतर कापून ही पदयात्रा जात आहे, हे ‘भारत जोडो यात्रे’चे खास वैशिष्ट्य आहे. ज्या परिस्थितीमुळे राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी पदयात्री यांनी या पदयात्रेचा निर्णय घेतला ती परिस्थिती केवळ राजकीय दृष्टीने पाहून वास्तवाचे पूर्णपणे आकलन करता येणार नाही. केवळ राजकीय अर्थाने गेल्यास या सामूहिक पदयात्रेचे विश्लेषण पूर्ण होणार नाही.

गेल्या सात-आठ वर्षांत भारतीय घटनेत अनुस्यूत असणाऱ्या संस्थांचे सातत्याने अध:पतन होताना दिसते आहे. त्याकडे पाहता केवळ निवडणुकीतल्या विजयाने वास्तवाला कलाटणी देणे अशक्य झालेले दिसते. भारतीय राज्यघटनेला अपेक्षित चैतन्य देशात पुन्हा जिवंत करायचे, तर संपूर्ण समाजात निर्माण झालेली एकप्रकारची बधिरता कमी करणे  आवश्यक आहे. संपूर्ण देशाची विवेकबुद्धी जागी करणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर कळपाप्रमाणे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. पक्षबदल ही एक सर्वसामान्य, सर्वमान्य कृती आहे असे वाटावे इतपत राजकीय बधिरता या देशात रुजत चालली आहे. त्या गुंगीतून देशाला जागे करण्यासह राजकारणातली हरपलेली नीतिमत्ता पुन्हा जागृत करणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे. ही यात्रा एक प्रकारची तपश्चर्या आहे असे राहुल गांधींनी पुन्हा पुन्हा म्हटले आहे. हे केवळ सभेमध्ये टाळ्या घेण्यासाठी केलेले विधान नाही.

सुरुवातीला ही यात्रा केवळ काँग्रेस पक्षाच्या पडझडीला आवर घालण्यासाठी असेल असे बऱ्याच जणांना वाटत होते. परंतु कन्याकुमारीहून निघालेल्या या यात्रेला प्रारंभीच्या नऊ आठवड्यांच्या अवधीत ७०० हून अधिक सामाजिक संघटना, कामगार संघटना, जन आंदोलनांचे समर्थन मिळाले आहे.  हा उत्साह बघता, या यात्रेने भारतीय लोकशाहीच्या वृक्षाला नवीन पालवी फुटत आहे याचे संकेत स्पष्टपणे दिले आहेत.

या यात्रेचे नाव ‘‘भारत जोडो’’ असल्याने ‘काय जोडता’? किंवा ‘काय जोडायचे आहे?’ असा विचित्र प्रश्नही उपस्थित केला गेला होता. या शीर्षकामागे एक विस्तृत सामाजिक इतिहास आहे. या शीर्षकाचा संबंध थेट १९४२ च्या भारत छोडो किंवा मराठीत चले जाव, इंग्रजीत क्विट इंडिया म्हटले गेले त्या ऐतिहासिक आंदोलनाशी आहे विसरून चालणार नाही.

१५ जुलै १९४२ रोजी वर्ध्यामध्ये महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली कॉँग्रेसची बैठक झाली होती. म्हणजे आंदोलनाच्या तीन आठवडे आधी. त्या बैठकीत चार ठराव मंजूर करण्यात आले. त्यापैकी एक होता, ‘जेव्हा जेव्हा फॅसिझमशी लढावे लागेल तेव्हा तेव्हा तो लढा सुरु करणे.’

१९४२ च्या या ठरावाची आपल्या देशाला आज किती नितांत गरज आहे हे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. सर्व माध्यमे सरकारच्या दहशतीखाली थिजून गेलेली असताना,  केवळ विरोधी किंवा वेगळा विचार केला म्हणून व्यक्तींना ‘यूएपीए’खाली कैदेत टाकण्यात येत असताना, स्वतंत्र विचार मांडणारे नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, कलबुर्गी, गोविंदराव पानसरे यांच्यासारखे दिवसाउजेडी वैचारिक अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडत असताना; १९४२ च्या गांधींच्या ठरावास पुन्हा एकदा चालना देणे नितांत गरजेचे आहे. 

नोटाबंदी आणि कोरोना यात देशातील बहुसंख्य समाज भरडून निघत असताना केवळ तीनच उद्योगसमूहांची संपत्ती अफाट वाढत असणे हे आपल्या अर्थव्यवस्थेच्या खोलवरच्या दुखण्याचे स्पष्ट लक्षण आहे. भीतीचे वातावरण, प्रचंड आर्थिक विषमता यांच्याबरोबरच सामाजिक सलोखाही आज धोक्याची रेषा ओलांडून गेला आहे. राज्यघटनेत प्रत्येक नागरिक समान असण्याचे वचन दिलेले असले तरीही केवळ धर्माच्या आधारावर काही नागरिक उच्च आणि इतर कनिष्ठ बनवले जात आहेत. घटनेत सर्व अनुसूचित भाषांना समान दर्जा दिला असला तरीही हिंदीचा आग्रह विनाकारण अवघ्या देशावर लादला जात आहे. शिवाय देशाच्या संघराज्यात्मक रचनेला खो देण्याचे कामही राजरोस सुरु आहे. 

- या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी देश सज्ज करायचा असेल तर ते केवळ लोकसभेच्या दालनातल्या गोंधळातून साध्य होऊ शकणार नाही. प्रत्यक्ष नागरिकांबरोबर संवाद करुन भारताची विस्कटलेली राजकीय, आर्थिक, सामाजिक घडी पुन्हा बसवता येईल या विस्तृत हेतूने  मार्गक्रमण करणारी ही यात्रा आता महाराष्ट्रातून मार्गस्थ होते आहे.  गेल्या कितीतरी शतकात आपण कमावलेल्या प्रागतिक विचारांचे शिंपण या यात्रेवर करणे ही महाराष्ट्राची जबाबदारी असेल. 

१९४२ च्या चले जाव लढ्याची सुरुवात महाराष्ट्रातच झाली होती. त्याही आधी रयतेच्या राज्याची निर्मिती करण्याचे महान कार्य शिवबांनी केले ते महाराष्ट्रातच आणि आपल्या संपूर्ण संत परंपरेतून, शिवाय फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारातून समतेची कल्पना बहरली तीही महाराष्ट्रातच ! ज्या भागातून यात्रा जाणार आहे त्या भागातून मी फिरलो आणि आजपर्यंत कधीही न अनुभवलेला लोकांचा प्रचंड उत्साह अनुभवू शकलो. महाराष्ट्रातून ही यात्रा जेव्हा उत्तर हिंदुस्थानात प्रवेश करेल तेव्हा ती महाराष्ट्राच्या वैचारिक प्रागतिक परंपरेची छाप नक्कीच घेऊन पुढे जाणार असेल. भारत जोडो यात्रेमध्ये गोंगाट नाही, गोंंधळ नाही, फक्त गर्दीही नाही. फक्त घोषणाही नाहीत. त्यात निरागसतेचा एक अभूतपूर्व उत्सव आहे. त्यात माणुसकीचा एक अत्युच्च आविष्कार आहे. आणि म्हणूनच ही यात्रा आयुष्यात एकदाच पाहायला, घ्यायला मिळेल असा एक अनुभव आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस