शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

इम्रान यांच्या व्यक्तिमत्त्वाची मोहिनी होतीच...तरीही खेळ का बिघडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 06:34 IST

तरुणांना आकर्षित करणाऱ्या बऱ्याच ‘ऑफर्स’ इम्रान यांच्याकडे होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मोहिनीही होतीच... पण तरीही खेळ बिघडत गेला...

सलाम डीसामाजिक कार्यकर्ते, मुक्त पत्रकार, कराची, पाकिस्तान

तरुणांना आकर्षित करणाऱ्या बऱ्याच ‘ऑफर्स’ इम्रान यांच्याकडे होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मोहिनीही होतीच... पण तरीही खेळ बिघडत गेला...

‘शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मी लढत राहीन’ असे तो म्हणाला. आणि खेळलाही. लढलाही; पण शेवटचा चेंडू बाउन्सर पडला. कप्तानाच्या थेट डोक्यावरच आदळला. मात्र, आऊट फक्त कप्तानच झाला नाही तर तो आपलं भविष्य घडवेल म्हणून आशा लावून बसलेले हजारो लोक गेल्या रविवारी रात्री पाकिस्तानच्या सगळ्या लहान -मोठ्या शहरांत रस्त्यावर उतरले. त्यात तरुणांची संख्या सर्वाधिक होती. लहान मुलं होती. महिला मोठ्या संख्येनं होत्या. त्यांनी लष्कराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्ष आणि  अमेरिकेच्याही विरोधात घोषणा दिल्या. इस्लामाबादमध्ये तर रस्त्यावर उतरलेलं तारुण्य इतकं संतप्त होतं की, त्यांनी जाहीर घोषणा दिली : ‘हुएव्हर इज अ फ्रेण्ड ऑफ अमेरिका इज अ ट्रेटर’!

जो अमेरिकेचा दोस्त तो देशद्रोही आहे!- हे इम्रान खान यांचे तरुण समर्थक. त्यांनी राजकारणात ‘लष्करा’चं स्थान काय, असा खडा सवाल जाहीरपणे उपस्थित केला. 

एक फोटो देशभर समाजमाध्यमात प्रचंड व्हायरल झाला. तरुण मुलगा हातात फलक घेऊन उभा होता. त्यावर लिहिलेलं होतं, ‘इतनी व्हिगो कहांसे लाओगे?..’ - व्हिगो हे पाकिस्तानातले छोटे पिकअप ट्रक. राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी अनेकदा गुप्तचर संस्था या व्हिगो ट्रकचा वापर करतात. हा व्हायरल फोटो अनेकांनी शेअर केला. इम्रान खान समर्थकांनीच नाही तर पीटीआय समर्थकांनीही समाजमाध्यमांचा वापर जनमत तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला.

स्वत: इम्रान खान यांनीही रविवारी रस्त्यावर उतरलेले लोक पाहून ट्विट केलं की, आजवरच्या इतिहासात कधीही इतक्या उत्स्फूर्तपणे एवढ्या मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरलेले पाहिले नव्हते. ‘इम्रान शहरी तारुण्यात अत्यंत लोकप्रिय. त्यांचं नेतृत्व त्यांच्या पाठीराख्यांना भुरळ घालायचं. महिलांमध्ये तर त्यांच्या लोकप्रियतेला तोड नव्हती. त्यांच्या राजकीय विरोधकांच्या घरातही त्यांचे तरुण चाहते आणि समर्थक होते, इतकी लोकप्रियता. एकतर मोहक, मर्दानी व्यक्तिमत्त्व, क्रिकेटची अभिमानस्पद कारकीर्द, धाडसी-बेधडक राजकारण या साऱ्याची भुरळ पडलेल्या  अनुयायांच्या मनावर इम्रान यांनी राज्य केलं, हे तर खरंच! 

इम्रान देशातल्या समकालीन नेत्यांपेक्षा वेगळे! बड्या राजकीय घराण्याचा वारसा सांगत राजकारणात आले नाहीत, शिवाय त्यांच्या कपड्यांवर भ्रष्टाचाराचे डाग नव्हते. क्रिकेटचा कप्तान म्हणून देशाच्या संघाचा  यशस्वी नायक. क्रिकेटवेड्या देशानं डोक्यावर घेतलेलं. त्यांनीही क्रिकेटवेड्या देशाचा मूड ओळखत क्रिकेटची परिभाषा मोठ्या खुबीने राजकारणात वापरली. राजकीय टीकाटिप्पणी विश्लेषणातही क्रिकेटचे शब्द वापरले जाऊ लागले. अम्पायर, इनिंग, आऊट, बॉल, विकेट हे शब्द राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सतत वापरले जाऊ लागले.  ‘कप्तान’ इम्रान खानच्या क्रिकेट परिभाषेत राजकीय भाषा बदलली आणि बदल केवळ एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता.

राजकारणापासून दूर असलेल्या शहरी तारुण्याला राजकारणाच्या प्रवाहात आणण्याचे श्रेय इम्रानचे. त्यांनी ‘युथिया’ हा शब्द तरुण मुलांसाठी प्रचलित केला. अशी तरुण मुलं जी आजवर कधीच राजकारणाच्या काठाकाठानेही चालत नव्हती. इम्रान यांनी त्यांच्या राजकीय कार्यकर्त्यांना ‘युथिया’ म्हणणं सुरू केलं. राजकारणापासून दूर असलेल्या उच्चभ्रू वर्गातील ‘एलिट’ स्त्रियांनाही  कम्फर्ट झोनमधून बाहेर काढून इम्रान यांनीच रस्त्यावर उतरायला, निदर्शनांमध्ये सहभागी व्हायला लावलं. नंतर पक्षाच्या राजकीय कार्यक्रमातही त्या सहभागी होऊ लागल्या.  

तरुणांना राजकारणाकडे आकर्षित करतील अशा बऱ्याच ‘ऑफर्स’ इम्रान यांच्याकडे होत्या.  निदर्शनं, आंदोलन म्हणून सुरू केलेल्या गोष्टींचं रूपांतर पाहता पाहता सळसळत्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये होऊन जायचं. अनेक लोकप्रिय नामवंत गायक पक्षात आले. त्यांनी लयदार गाणी रचली. त्यातून पक्षनेता म्हणून इम्रान यांना बळ मिळवून दिलं. इम्रान यांचे राजकीय मेळे, राजकीय सभा हळूहळू राजकीय मनोरंजनाच्या जागा बनू लागल्या. हे सारं तरुण आयुष्यात नव्हतं. मनोरंजनाला ‘अन-इस्लामिक’ ठरवलं जाण्याच्या काळात, राजकीय असहिष्णुता वाढलेल्या काळात इम्रानच्या राजकीय सभा, कॉन्सर्टसारख्या तरुणांना भुरळ पाडू लागल्या.

आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी केलेले वायदे. देशाला  भ्रष्टाचारमुक्त करण्याचं वचन, कल्याणकारी राज्याचं वचन तरुणांसाठी फार मोठं स्वप्न घेऊन आलं. जो माणूस कधीही राजकीय सत्तेत नव्हता त्याच्याकडून तरुणांना मोठ्या अपेक्षा होत्या. जे आजवर झालं नाही ते होईल अशी आशा होती.  इम्रान खान यांनीही राजकारणातल्या बड्या आसामींना थेट आव्हान दिलं. देशातल्या ‘चलता है’ वृत्तींना थेट शिंगावर घेतलं. त्यांचा जाहीरनामा आक्रमक होता. भ्रष्टाचार करणाऱ्यांना पकडून गजाआड करण्याचं आश्वासन देत होता.  तरुण पिढीला हे सारं आश्वासक वाटत होतं. 

अर्थात हे बडेबडे वादे काही इम्रान खान यांना पूर्ण करता आले नाहीत. इनिंगच्या शेवटी शेवटी त्यांची लोकप्रियताही घसरायला लागली. महागाई वाढली, बेरोजगारी, वाईट राज्यकारभार हे प्रमुख प्रश्न जैसे थेच राहिले. सामान्य माणसं निराश झाली, तरुणांचा अपेक्षाभंग झाला. आपली पकड सुटते आहे हे लक्षात येताच इम्रान खान यांनी अखेरचं शस्त्र बाहेर काढलं. सगळ्यात लोकप्रिय राजकीय हत्यार. परकीय शक्ती देशाच्या सार्वभौमत्वावरच घाला घालत असल्याचं भय देशात पसरवायला त्यांनी सुरुवात केली. अखेरपर्यंत मी परकीय सुपर पॉवर्सच्या हातात देश जाऊ देणार नाही, गुलामी पत्करणार नाही असं ते म्हणू लागले. तरुण मुलांच्या मेंदूला आणि काळजाला त्यांनी पुन्हा हात घातला. त्यांच्यावर प्रेम करणारे तरुण पुन्हा त्यांना पाठिंबा देत रस्त्यावर उतरले.

तिकडे मध्यरात्रीपर्यंत इम्रान राजकीय वाटाघाटीत गुंतलेले असताना इकडे त्यांच्या राजकीय समर्थक तरुणी थेट संसद भवनावर जाऊन धडकल्या...  तिथं त्यांनी आवाज बुलंद करीत नव्या राजकीय वळणाचा विरोध केला. मात्र, ती इनिंग संपलीच...

‘बनी गाला’ या कप्तान साहेबांच्या घराच्या दिशेनं जाणारं हेलिकॉप्टर पंतप्रधान निवासातून बाहेर पडलं... ते बनी गालाच्या दिशेनं उडताना टीव्हीवर साऱ्या देशानं पाहिलं... खेळ संपला आणि कप्तान आऊट होत परतला...

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान