शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास नव्याने निवडणूक?; ६९ प्रकरणांची चौकशी, ‘नोटा’चे काय?
2
‘बिनविरोध’वर गंडांतर; चेंडू आता हायकोर्टात, मनसेने दाखल केली याचिका, चौकशी करण्याची मागणी
3
काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
4
शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!
5
ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
6
आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा
7
भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण
8
‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी?
9
सत्ता अबाधित ठेवायला पक्ष, घर फोडत आहेत, आमच्या कामांचे श्रेय तुम्ही का घेता?: उद्धव ठाकरे
10
सत्ताधाऱ्यांच्या काळात ठाणे शहराची ओळख बदलली; संजय राऊतांची महायुतीवर टीका
11
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मनमानीला अखेर चाप; निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचे ताशेरे
12
उमर खालीद, शरजिल इमामला दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळाला; अन्य ५ जणांना जामीन
13
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला; एकाला अटक, हेतूची चौकशी सुरू
14
ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर
15
Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद
16
मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी
17
खुला प्रवर्ग कुणासाठी राखीव नाही, सरकारी नोकरीत निवड मेरिटवर व्हावी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
18
उल्हासनगरमध्ये अर्धे उमेदवार कोट्यधीश! ९३ कोटींचे मालक भाजपाकडे तर ५७ कोटींचे धनी शिंदेसेनेकडे
19
"तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडी देतील"; तानाजी सावंतांचा भाजपासह पाटलांवर टीकास्त्र
20
निवडणूक आयोगाचा अजब कारभार, उमेदवाराचा AB फॉर्म गहाळ; अधिकाऱ्याला बसला फटका
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीची प्रतिमा ‘फेअर’ होईल आणि प्रॉडक्ट ‘लव्हली’ वाटेलही; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 07:06 IST

शेवटी या दिसण्यालाच भावनेची जोड देत व्यापार केला जातो. नाव बदलण्याची वेळदेखील नेमकी हीच कशी असते..?

‘फेअर’ म्हणजे गोरा की नि:पक्षपातीपणे वागणारा? अर्थ ज्याचा त्याने काढायचा आहे. दिसण्याचा आणि बुद्धिमत्तेचा संबंधच नाही; पण शेवटी या दिसण्यालाच भावनेची जोड देत व्यापार केला जातो. नाव बदलण्याची वेळदेखील नेमकी हीच कशी असते..? पुढच्या पिढीचा व्यवहार दिसण्यावरच जास्त होईल, असे ६२ वर्षांपूर्वी ग. दि. माडगूळकरांना कळाले असावे. त्यामुळेच त्यांनी- ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक’ हे गाणे लिहिले असावे. गदिमांवर सुंदर आणि कुरूपतेचा संस्कार ‘पी हळद हो गोरी’ अशा म्हणींनी केला असावा असे वाटेलही; पण गदिमां थोडेच म्हणींवर विसंबून बसले? स्वत:चे रूपडे न पाहणाऱ्या त्या कुरूप पिलास त्यांनी पाण्यात चोरून पाहायला लावलेच..! आणि काय आश्चर्य,‘एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले,भय वेड पार त्याचे, वा-यासवे पळाले,पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक,त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक..!’जे गदिमांना तेव्हा कळाले ते अजून आम्हाला उमजलेदेखील नाही. त्यामुळेच तर ‘फेअर’ नसणारे स्वत:ला गोरेगोमटे समजू लागले आणि ‘लव्हली’ नसणारे स्वत:ला ‘फेअर’ समजू लागले. आता कोणी म्हणेल की याच गदिमांनी-‘गोरी-गोरी पान, फुलांसारखी छान,दादा मला एक वहिनी आण...’

हे गीत लिहिलं ना; पण ते बालगीत होतं. बालकांच्या कल्पनाशक्तीला साजेसं होतं. आपण मात्र समाज म्हणून पुन्हा पुन्हा ‘गोरी-गोरी पान’मध्ये अडकत जातो आणि अजूनही आपण बालबुद्धीतच आहोत हे सिद्ध करत राहतो. आपल्याला संधी मिळूनही आपण बालबुद्धीच्या पलीकडे जात नाही. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर जगात वांशिक रूढीबद्धतेविरुद्ध आवाज उठताना जागतिक पातळीवरच्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने सहानुभूतीची गुंतवणूक करत आपले ‘प्रॉडक्ट’ नव्याने विकण्यास काढले. यातच सगळे काही आले. चर्चा सुरू झाली ती ‘फेअर अ‍ॅण्ड ‘लव्हली’ या ब्रँड नेममधून ‘फेअर’ शब्द काढण्याच्या निर्णयामुळे. वंशवादविरोधी चळवळीचा आणि नाव बदलण्याचा काहीही संबंध नाही, आम्ही ब्रँडच्या उत्क्रांतीवर अनेक वर्षांपासून काम करत आहोत, असे कंपनी सांगते, मात्र वंशवादाविरोधी चळवळ वेगात असतानाच नाव बदलण्याचा निर्णय घेते. त्यामुळे कंपनीची प्रतिमा ‘फेअर’ होईल आणि प्रॉडक्ट ‘लव्हली’ वाटेलही. मुळात ‘फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ हे फक्त प्रॉडक्टचे नाव नाही.तो एक विचार आहे आणि तो जास्त घातक आहे. सिनेमातला हिरो, नाचणारी अभिनेत्री, रियॅलिटी शोमधील स्पर्धकसुद्धा गोरेगोमटे असण्याची अदृश्य अटच याच विचारांतून आलेली असतेच की. आपल्याकडे बुद्धिजीवी, श्रमजीवी, रूपजीवी आणि परोपजीवी असे चार प्रकारचे लोक आढळतात. आपण कोणत्या प्रकारात मोडतो याचा विचार कधी होतच नाही. उलट दिसायला बरे नसणारे न्यूनगंडात आणि रूपजीवी समजणारे अहंगडात जगत आल्याची असंख्य उदाहरणे आहेत. ‘फेअर’ शब्दाचे न्याय, सचोटीचा, प्रामाणिक, नियमांनुसार वागणूक देणारा, नि:पक्षपाती असे अनेक अर्थ आहेत. पण वर्षानुवर्षे या शब्दाने, सुंदर आणि नितळ एवढेच अर्थ जगाला सांगितले. त्याच्या जोडीला ‘लव्हली’ शब्द आला आणि या दोन शब्दांनी सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकली. अमूक साबण वापरला की वयाचा पत्ता लागत नाही, अशी जाहिरात असो की अमूक क्रीम वापरल्यावर तुम्ही गोरे दिसलाच म्हणून समजा असा दावा असो. आजवर एकही व्यक्ती खºया आयुष्यात साबण वापरून तरुण आणि क्रीम वापरून गोरी झाली नाही. दिसण्याचा आणि बुद्धिमत्तेचा संबंध नसतोच; पण दिसण्याला भावनेशी जोडून रग्गड कमाई करणाºया कंपन्यांनी याच भावनेचा बाजार थेट आपल्या घरापर्यंत आणला. एकाच वर्षी भारतात ‘मिस इंडिया’ आणि ‘मिस युनिव्हर्स’ असे दोन किताब इथली बाजारपेठ काबीज करण्यासाठी दिले गेले. कंपनी कशासाठी का असेना, त्यांच्या नावातून ‘फेअर’ शब्द काढत असेल, आपल्या आयुष्यातून ‘फेअर’ म्हणजे फक्त गोरा हा अर्थ कधीतरी पुसून नको का टाकायला...?