शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंघाच्या शंभरीतून घ्यावा शांततेचा बोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 05:17 IST

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या छोट्या आवृत्तीची म्हणजे जगातील मोठ्या राष्ट्रांनी स्थापन केलेल्या राष्ट्रसंघाची स्थापना १0 जानेवारी, १९२0 रोजी युरोपात झाली होती.

- डॉ. रविनंद होवाळसंयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या छोट्या आवृत्तीची म्हणजे जगातील मोठ्या राष्ट्रांनी स्थापन केलेल्या राष्ट्रसंघाची स्थापना १0 जानेवारी, १९२0 रोजी युरोपात झाली होती. संपूर्ण जगावर आपली एक महत्त्वपूर्ण छाप सोडणाऱ्या या संघटनेच्या स्थापनेला या वर्षी १0 जानेवारीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. जरी या संघटनेत जगातील केवळ सव्वीस राष्ट्रेच सामील झालेली होती व सुमारे सव्वीस वर्षांनी या संघटनेचा अस्त झाला होता, तरी संपूर्ण जगावर झालेला तिचा परिणाम व तिच्या स्थापनेच्या अनुषंगाने घडलेल्या अनेक घडामोडी भावी काळाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाºया आहेत. त्यामुळे या राष्ट्रसंघाच्या शंभरीच्या अनुषंगाने तत्कालीन परिस्थिती व सध्याच्या प्राप्त परिस्थितीचा तुलनात्मक आढावा घेणे आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकेल.१९२0 च्या पूर्वीची काही वर्षे जगभर वसाहतवाद व साम्राज्यवादाची तीव्र स्पर्धा युरोपातील प्रबळ राष्ट्रांनी सुरू केली होती. युरोपासह आशिया व आफ्रिका खंडांतील अनेक राष्ट्रांना गुलाम बनवून त्यांचे आर्थिक शोषण करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. यातून त्यांची भूक वाढून एकमेकांच्या ताटातल्या गोष्टीही स्वत:कडे खेचून घेण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला व त्यातूनच १९१४ ते १९१८ या काळात जगातील पहिले महायुद्ध झाले. या युद्धात जगातील सव्वीस देश सामील झाले. सुमारे सव्वाचार कोटी लोक या युद्धात गुंतवले गेले. त्यातील सुमारे ऐंशी लाख वीस हजार सैनिक आणि सहासष्ट लाख बेचाळीस हजार नागरिक असे मिळून सुमारे दीड कोटी लोक मृत्युमुखी पडले. या युद्धासाठी सुमारे अठ्ठावीस हजार कोटी अमेरिकी डॉलर्स एवढा खर्च झाला.

सतराव्या व अठराव्या शतकातील युरोपातील औद्योगिक क्रांतीमुळे तयार झालेला बेसुमार माल कुठे तरी चांगल्या भावाने खपवण्याची निकड, त्यातून होत गेलेले सशस्त्र संघर्ष, एकमेकांविरोधात करण्यात आलेले अनेक गुप्त करार व या गुप्त करारांतून वाढत गेलेला द्वेष, संशय आणि असुरक्षिततेचे वातावरण यामुळे महायुद्ध झाले, असे जगभरातले तज्ज्ञ सांगतात. पण हे सगळे युद्ध घडून गेल्यानंतर लोकांच्या लक्षात आले. तोपर्यंत वेळ त्यांच्या हातून निघून गेलेली होती. हे सर्व लक्षात घेतल्यास कोणत्या परिस्थितीत कशामुळे काय घडते व काय घडू नये यासाठी काय केले पाहिजे, हे आपल्याला समजू शकते. कळत नकळत आपल्या हातूनही देशाच्या बाहेर किंवा देशाच्या आत असे काही छोटे किंवा मोठे अपघात घडू नयेत, यासाठी आपण ते समजून घेणे गरजेचे आहे.भेदभाव आणि अपमान यातून संघर्ष निर्माण होतो व हा संघर्ष आपलीही राखरांगोळी करू शकतो किंवा आपल्यालाही कमकुवत करू शकतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या काळातील अमेरिकेच्या वर्तनातूनही एक मोठा बोध आपल्याला घेता येईल. या संपूर्ण काळात अमेरिकेने सशस्त्र संघर्षापासून स्वत:ला शक्य तितके दूर ठेवले होते. याचा परिणाम असा झाला की, पहिल्या महायुद्धात पडलेली आॅस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, रशिया ही सारी प्रबळ राष्ट्रे युद्धातील विध्वंस व नुकसानीमुळे दुर्बल झाली, तर अमेरिकेचा युद्धोत्तर काळातील जगातील सर्वाधिक प्रबळ राष्ट्र म्हणून उदय झाला. स्वत:ची प्रगती साधून घ्यायची असेल, तर अनावश्यक भांडखोरपणापासून किंवा युद्धज्वरापासून आपण शक्य तितके दूर राहिले पाहिजे.
१९२0 मध्ये स्थापन झालेला हा राष्ट्रसंघ १९४६ साली विसर्जित करण्यात आला. परंतु तत्पूर्वीच, २४ आॅक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची म्हणजे सध्याच्या युनोची स्थापना करण्यात आली होती. हा दुसरा राष्ट्रसंघ शांतता संवर्धनाचे काम त्याच्या परीने सध्या करत असला, तरी त्याच्या कार्यपद्धतीबाबत काही प्रमाणात असंतोषही निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत १९२0 चा पहिला राष्ट्रसंघ अपयशी का ठरला, याची कारणमीमांसा आपण लक्षात घेतल्यास नव्या काळातील नव्या चुका आपल्याला मोठ्या प्रमाणात टाळता येतील. भविष्यात होऊ शकणारी मोठ्या प्रमाणातील मनुष्यहानी व वित्तहानीही कदाचित आपल्याला टाळता येईल. यातून देशांतर्गत व देशाबाहेरील मानवाधिकारांचे संरक्षण तर होईलच; पण वाचलेला पैसा लोककल्याणासाठी खर्च करण्याची ऐतिहासिक सुसंधीही आपल्याला प्राप्त होईल. युद्धानंतरच्या व्हर्साय तहातून विजेत्यांनी पराभूत जर्मनीवर तेहतीस हजार कोटी डॉलर्सची युद्धखंडणी लादली होती. पराभूतांच्या मनात यातून नकळतपणे अपमानाची एक ठिणगी पेटवली गेली. या ठिणगीतूनच पुढे दुसरे महायुद्धही झाले व त्यात सुमारे साडेसहा कोटी लोक मरण पावले.पहिल्या राष्ट्रसंघाच्या शंभरीच्या निमित्ताने या आणि अशा आणखी काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या, तर आपल्या देशाला व उर्वरित मानवी जगाला अनावश्यक संघर्ष आणि तदनुषंगिक आपत्तींपासून दूर ठेवणे आपल्याला काही प्रमाणात तरी शक्य होईल, असे दिसते. सध्याच्या परिस्थितीत भारतासंदर्भात विचार करता भारतीय सीमेच्या आतील व बाहेरील भांडखोर प्रवृत्तीच्या लोकांना बाजूला ठेवून सीमेच्या आतील व बाहेरील शांततावादी लोकांना परिस्थितीचे नियंत्रण करण्याची संधी मिळवून दिल्यास शांतता प्रस्थापनेचे प्रयत्न यशस्वी ठरतील. हे करण्यात जर आपण कसूर केली, तर उद्या कदाचित पश्चात्ताप करण्याची वेळ आपल्या सर्वांवर येऊ शकेल. त्यामुळे पहिले ते सावधपण, अशा सुधारित तत्त्वाचा सध्याच्या काळात आपण जाणीवपूर्वक स्वीकार केला पाहिजे, असे वाटते.(प्रवर्तक, शोषणमुक्त भारत अभियान)

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघ