शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

मी मृत्यूला घाबरत नाही; भय आहे राजकीय दहशतवादाचे! मनिंदरजीत सिंह बिट्टा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 06:20 IST

मृत्यू माझा मित्र आहे. मी मृत्यूला घाबरत नाही. मला भय आहे ते राजकीय दहशतवादाचे. उद्या दहशतवाद्यांच्या बॉम्ब-गोळ्यांनी माझे प्राण गेले, तर कुटुंबाला, मित्रांना माझा अभिमान वाटेल, पण राजकीय दहशतवादाने मृत्यू आला, तर माझे जीवन व्यर्थ ठरेल...

- नितीन नायगांवकरनवी दिल्ली : मृत्यू माझा मित्र आहे. मी मृत्यूला घाबरत नाही. मला भय आहे ते राजकीय दहशतवादाचे. उद्या दहशतवाद्यांच्या बॉम्ब-गोळ्यांनी माझे प्राण गेले, तर कुटुंबाला, मित्रांना माझा अभिमान वाटेल, पण राजकीय दहशतवादाने मृत्यू आला, तर माझे जीवन व्यर्थ ठरेल... पंधरा वेळा दहशतवाद्यांचे वार झेलूनही ‘जिंदा शहीद’ ठरलेले मनिंदरजीत सिंह बिट्टा यांचे हे बोल आहेत. बिट्टांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना अंगावर काटा उभा करणारी आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून निधड्या छातीने आयुष्य जगणारे बिट्टा यांचा प्रत्येक शब्द आजही तिरंग्यात लपेटलेला आहे की काय, असाच भास होतो. त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘जिंदा शहीद’ हा चित्रपटही पुढील वर्षी येऊ घातला आहे. तिरंग्याचे रक्षण, स्वातंत्र्याचे रक्षण हे बिट्टा यांच्या जगण्याचे एकमेव उद्दिष्ट्य राहिले आहे. ७२व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, घटना, राजकीय अनुभव आदींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या माध्यमातून केला आहे...दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्याची प्रेरणा कुठून मिळाली?सात वर्षांचा असताना जालियनवाला बागमध्ये मी माझ्या आजोबांसोबत फिरायला जायचो. एकीकडे हरमिंदर साहिब व दुसरीकडे जालियनवाला बाग. मी एकदा आजोबांना विचारले, जालियनवाला बागमध्ये भिंतींवर निशाण कशाचे आहेत? आजोबांनी जनरल डायरच्या निर्दयतेचा इतिहास सांगितला. त्यानंतर, मी सुभाषचंद्र बोस व भगतसिंगांची पुस्तके वाचली आणि जिथे बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण आहेत, तिथल्या मातीवर हात ठेवून ‘स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी मीदेखील आपले जीवन मातृभूमीला अर्पण करेन’ अशी शपथ घेतली. पुढे मोठा झाल्यावर मी वस्तीतील मित्रांसोबत १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीच्या कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले. खलिस्तान्यांनी पंजाबला भारतापासून तोडण्याचे ठरविले होते. रोज गोळ्या झाडायचे, पण आम्ही स्वातंत्र्य दिनाला ‘भारत माँ के चार सिपाही हिंदू मुस्लीम सिख इसाई’ असे नारे देत गावागावांमध्ये फिरायचो. त्या गावातील जो कुणी आमच्या रॅलीत सहभागी होईल, त्याला खलिस्तानी मारून टाकायचे. रक्ताने माखलेली इतिहासाची पाने आम्हाला सतत अस्वस्थ करायची. दहशतवाद्यांचे वार झेलताना हीच अस्वस्थता मला प्रेरणा द्यायची.दहशतवाद्यांशी पहिला सामना कधी झाला?मी नवव्या वर्गात असताना अमृतसरमध्ये एका ठिकाणी १५ आॅगस्टचा कार्यक्रम आयोजित केला. १९८३चा प्रसंग आहे. भिंद्रानवाले सुवर्ण मंदिरात येऊन बसला होता. राष्ट्रध्वजाला धोका निर्माण झाला होता. अशात हा कार्यक्रम होऊ नये, असाच दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. चमनलाल नावाचा पोलीस अधिकारी मला म्हणाला की, राष्ट्रध्वज फडकवू नका, पण माझ्यासाठी तो परीक्षेचा दिवस होता. मी त्याचे ऐकले नाही आणि पहाटे पाच वाजता तयारी सुरू केली. आम्ही तोरणे बांधत असतानाच कार्यक्रम स्थळाजवळ बॉम्ब फुटल्याचा आवाज झाला. माझ्याजवळ बंदूक होते. मी लगेच हवेत गोळीबार केला. दहशतवादी पळून गेले. त्यानंतरही ते कार्यक्रमाच्या वेळी आले आणि ‘खलिस्तान जिंदाबाद’चे नारे देऊ लागले. त्यांना तिरंगा जाळायचा होता. आम्ही सारे एकत्र आलो आणि त्यांना पकडून पोलिसांच्या हवाले केले. पुन्हा काही वेळाने त्यांचे साथीदार तलवारी घेऊन आले, आम्हीही सज्ज होतो, पण बीएसएफचे जवान आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतरही सायंकाळपर्यंत तिरंग्याचे रक्षण केले व रात्री तिरंगा अंगावर लपेटून घरी गेलो. हा माझ्या आयुष्यातील पहिला प्रसंग होता.मंत्री झाल्यावर पहिला हल्ला कधी झाला?मला निवडणूक लढायची नव्हती, पण देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी आग्रह धरला. दक्षिण अमृतसर हा दहशतवाद्यांचा गड मानला जायचा. मी तोच मतदारसंघ निवडला. मंत्री झाल्यावर एकदा स्वातंत्र्य दिनाला सरकारी कार्यक्रमासाठी जात होतो. त्यापूर्वी आदल्या दिवशी रात्रीच मित्रांना सांगितले होते की, उद्या बॉम्बस्फोट होणार आहे. सर्वांना आश्चर्य वाटले, पण मी कार्यक्रम रद्द होऊ दिला नाही. प्रत्येक हल्ल्याच्या वेळी मला आधीच अंदाज यायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी कुर्ता चढवला आणि तयार झालो. एक बुलेटप्रूफ गाडी आणि एक सरकारी गाडी सोबत होती. मी सरकारी गाडीत बसलो. अमृतसरच्या हाइड मार्केटमधून जात असताना, मृत्यू पुढे उभा असल्याचे मला माहिती होते. दहशतवाद्यांनी एका गाडीत ४५ किलो आरडीएक्स लावून ठेवले होते. अचानक स्फोट झाला आणि माझ्यापुढे असलेली गाडी चक्काचूर झाली. सोबत असलेले जखमी झाले, पण माझा चालक मोठा हिंमतवाला होता. त्या रस्त्याने जाणाºया शाळकरी मुलांनाही यात प्राण गमवावे लागले. काही वेळाने मला लक्षात आले की, माझा एक पाय पूर्णपणे तुटलेला होता. मला माझे सहकारी घेऊन जायला लागले, तेवढ्यात दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि पुन्हा बॉम्ब फेकले. मला दवाखान्यात नेले, तेव्हा मी पूर्णपणे शुद्धीवर होतो. डॉक्टरांशी बोलत होतो. जोपर्यंत बेशुद्धीचे इंजेक्शन दिले नाही, तोपर्यंत ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ म्हणत होतो. स्वातंत्र्यासाठी रक्त सांडविणाऱ्यांची कदर करीत असाल, तर बॉम्ब, बंदुकीच्या गोळ्या तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत, हे मी अनुभवले आहे.दिल्लीतील हल्ल्याचीही माहिती होती का?पी. व्ही. नरसिंहराव यांनी १९९३ मध्ये मला युवक काँग्रेसचा अध्यक्ष केल्यावर मी दिल्लीत आलो. त्यावेळी नागपूरचे अविनाश पांडे यांना मी युवक काँग्रेसचा महासचिव केले. आठ महिन्यांनी माझी रेकी करून जनपथच्या एका हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी मुक्काम ठोकला. माझ्या जिवाला धोका आहे, हे नरसिंहराव यांना माहिती होते. मला सुरक्षा मिळाली आणि पंधरा दिवसांत काढून घेतली. त्याचा जाब विचारायला, मी गृहमंत्र्यांकडे गेलो. मी मंत्रालयात गेलो, तेव्हा बाहेर रायसिना रोडवर एका कारमध्ये बॉम्ब लावलेला होता. मला शंका आली होती. त्यावेळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मला भेटण्यासाठी बाहेर उभे होते. तिथेच दहशतवाद्यांची कार होती. मी बाहेर आलो असतो, तर कार्यकर्त्यांनाही प्राण गमवावे लागले असते. मी अर्धा तास आतच थांबलो. सगळे निघून गेल्यावर मी कारमध्ये बसून बाहेर निघालो आणि थोड्याच वेळात स्फोट झाला. आमच्या पुढची गाडी स्फोटाने उडाली. माझ्या चालकाचे डोळे गेले. मलाही मार लागला. मी फायरिंगचे आदेश दिले. मला राममनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये नेणार होते, पण तिथेही कारमध्ये बॉम्ब लावून ठेवलेला आहे, हे मला माहिती होते. त्यामुळे मी एम्समध्ये घेऊन चला म्हणालो. एवढे हल्ले झाले, तरीही मला काहीही झाले नाही, ही भारतमातेचीच कृपा आहे. त्यानंतर, नरसिंहराव यांनीच मला ‘जिंदा शहीद’ अशी उपाधी दिली.राष्ट्रध्वजाचे महत्त्व कुणामुळेकमी झाले असे वाटते?आज देशात वंदेमातरम्, राष्ट्रप्रेम यावर लोक दुकानदारी चालवतात. माझ्या शरीराच्या अर्ध्या भागावर बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्बच्या स्फोटांच्या खुणा आहेत, पण देशावर मनापासून प्रेम करतो. तिरंग्याचे महत्त्व कधीही कमी होऊ दिले नाही. दुर्दैवाने मधल्या काळात राष्ट्रध्वजाला महत्त्व देण्यात आले नाही, पण विद्यमान सरकारच्या काही धोरणांमुळे तिरंग्याचे महत्त्व राखले जात आहे. तिरंग्याला कागदाचा किंवा कापडाचा तुकडा समजू नका. स्वातंत्र्य दिनाचा उत्सव ‘प्रोफेशनल’ करण्यापूर्वी जालियनवाला बागच्या शहिदांचे स्मरण करा. स्वातंत्र्य कसे मिळाले, याचा विचार करायला हवा.आपण सतत राजकीय दहशतवादाचाउल्लेख करता, नेमके काय म्हणायचे आहे?मी लाल बहादूर शास्त्री व सरदार पटेल यांच्या विचारांचा काँग्रेसी आहे. या दोघांनंतर आपण राजकीय गुलामीत जगतोय. हळूहळू राजकीय दहशतवादही फोफावत गेला. माझी सुरक्षा काढून घेण्यात आली, तो राजकीय दहशतवादच होता. मृत्यू माझा मित्र आहे, पण मी राजकीय दहशतवादाला घाबरतो. त्यामुळे मी ईश्वराकडे कायम प्रार्थना करतो, मला तिरंग्याचे रक्षण करताना मृत्यू येऊ दे, राजकीय दहशतवादाने नाही. तिरंग्याचे रक्षण करताना मृत्यू येईल, तर माझी मुले, परिवार म्हणेल, देशासाठी प्राण गमावले. मी ‘शहीद होणे’ आणि ‘कुर्बानी देणे’ हे शब्द वापरत नाही. कारण त्याने देशावर उपकार केल्यासारखे होईल.नक्षलवाद, दहशतवादकमी होईल, असे आपल्याला वाटते का?नक्षलवादी असो, खलिस्तानी असो किंवा काश्मीरचा दहशतवाद असो. आता संवादाची वेळ त्यांच्या हातून निघून गेली आहे. मला भाजप किंवा मोदींशी काही घेणे-देणे नाही, पण नरेंद्र मोदींची नजर ज्या दिवशी यांच्यावर पडेल, त्या दिवशी यांचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात येईल. त्यामुळे आता शरण येण्याशिवाय यांच्याकडे पर्याय नाही. भविष्यात भारतातून दहशतवादाचा समूळ नायनाट होईल, याचा मला विश्वास आहे.३७० कलम हटविण्याचा विरोध करणारे राष्ट्रभक्त नाहीतकुणाला तरी मृत्यूचे कफन माथ्यावर बांधून हा निर्णय घ्यायचाच होता. भारत आता खºया अर्थाने स्वतंत्र झाला आहे. आधी पूर्ण स्वातंत्र्य मिळाले नव्हते. आता माता-भगिनी विधवा होणार नाहीत, मुलं अनाथ होणार नाहीत आणि रक्ताचे पाटही

टॅग्स :TerrorismदहशतवादIndiaभारत