शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

धर्मापेक्षाही माणुसकी महत्त्वाची

By admin | Updated: April 14, 2016 02:45 IST

डॉ. आंबेडकर. १९५२ साली कोल्हापुरातील राजाराम कॉलेजातील कार्यक्रमात मला त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. त्यानंतर माझ्या आजोळच्या आजीचे सख्खे भाऊ दत्तोबा दळवी (आर्टिस्ट) व डॉ. बाबासाहेब

- डॉ.डी.वाय.पाटीलडॉ. आंबेडकर. १९५२ साली कोल्हापुरातील राजाराम कॉलेजातील कार्यक्रमात मला त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. त्यानंतर माझ्या आजोळच्या आजीचे सख्खे भाऊ दत्तोबा दळवी (आर्टिस्ट) व डॉ. बाबासाहेब यांच्यासोबत कॉलेजपासून बुधवार पेठेपर्यंत टांग्यातून आलो़ त्या दिवसाचे जेवण दत्तोबा दळवी यांच्या घरीच झाले. संध्याकाळी स्टेशनवर सोडण्यासाठी टांग्यातूनच जाण्याचे भाग्य लाभले. डॉ. बाबासाहेबांनी समाजाच्या सुधारणा-परिवर्तनाचे तत्त्वज्ञान शिकविले. भौतिक विकास हा व्यक्तीच्या प्रगतीशी निगडित असतो. स्वातंत्र्यासाठी देशात चळवळी सुरू असताना या महामानवास स्वातंत्र्याची एक वेगळीच संकल्पना घेऊन झगडावे लागत होते. ती म्हणजे मानवतेची संकल्पना होय! त्यामुळेच ते गौतम बुद्धांनी दिलेल्या तेजस्वी विचारांकडे आकर्षित होताना दिसून येतात. व्यक्तीकडून राष्ट्राच्या उन्नतीपर्यंत असणाऱ्या समस्यांचे निवारण करणारे उपाय कोणते आहेत याची प्रभावी जाण डॉ. बाबासाहेबांना होती. ते म्हणतात, ‘समाजाच्या जाती-जमातीत, गटातटात, वर्गावर्गात जो दुरावा आहे तो लोकशाहीच्या यशाला मारक ठरेल. कारण, लोकशाहीत प्रत्येकाला मग तो पीडित असो वा हक्क भोगणाऱ्या वर्गातील असो, प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे. जे सत्ता, सवलती, हक्क भोगतात ते जर वंचित, दलित समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावयास तयार नसतील तर ‘आहे रे व नाही रे’ या दोन वर्गातील तणाव वाढत जाईल. लोकशाही उद्ध्वस्त होईल. सर्व माणसे जन्मत: समानच आहेत. लोकोपयोगाच्या दृष्टीने त्यांच्या दर्जात फरक पडू शकेलही. पण एरवी त्यांचा समान दर्जा कायम राहिला पाहिजे’. डॉ. आंबेडकर यांना धर्मापेक्षाही माणुसकी अधिक महत्त्वाची वाटत होती. वंचितांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना लोकशाहीची फळे चाखायला मिळाली पाहिजेत हेच त्यांना अपेक्षित होते. स्वातंत्र्यासाठी देशात चळवळी सुरू असताना या महामानवास स्वातंत्र्याची एक वेगळीच संकल्पना घेऊन झगडावे लागत होते. ती म्हणजे मानवतेची संकल्पना होय! त्यांना धर्मापेक्षाही माणुसकी अधिक महत्त्वाची वाटत होती. वंचितांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना लोकशाहीची फळे चाखायला मिळाली पाहिजेत हेच त्यांना अपेक्षित होते.