शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

मानव

By admin | Updated: January 14, 2015 03:44 IST

मानव या शब्दामध्ये तीन अक्षरे आहेत. यामध्ये ‘मा’ म्हणजे अज्ञान, ‘न’ म्हणजे नष्ट करून, ‘व’ म्हणजे वर्तन करणारा! याचा पूर्ण अर्थ असा की, अज्ञान नष्ट करून वर्तन करणारा तो मानव!

अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले - मानव या शब्दामध्ये तीन अक्षरे आहेत. यामध्ये ‘मा’ म्हणजे अज्ञान, ‘न’ म्हणजे नष्ट करून, ‘व’ म्हणजे वर्तन करणारा! याचा पूर्ण अर्थ असा की, अज्ञान नष्ट करून वर्तन करणारा तो मानव! परंतु, प्रश्न असा आहे की, मानवाच्या ठिकाणी असलेले हे अज्ञान नष्ट करण्याकरिता मानवाने काय केले पाहिजे? योगवासिष्ठामध्ये वसिष्ठ मुनी अज्ञान नष्ट करण्याकरिता संतसंगती, शास्त्रश्रवण, स्वप्रयत्न अशा तीन मार्गांनी मानवाने स्वत:च्या ठिकाणचे अज्ञान नष्ट करावे, असे सांगतात. मानवाच्या सर्व दु:खाचे मूळ हे त्याचे आत्मस्वरूपाविषयीचे अज्ञान आहे, असे वेदांतशास्त्र स्पष्ट सांगते. हे अज्ञान घालविण्याकरिता ज्ञानाचीच गरज आहे आणि आत्मस्वरूपाविषयीचे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार हा फक्त मानव योनीलाच भगवंतांनी दिलेला आहे. वास्तविक विचार केला असता अलीकडच्या काळामध्ये मानवच मानवाला जाणत नाही, असेच आपल्याला दिसून येते. एका नावेमधून तीन मनुष्य नदीमध्ये विहार करायला निघाले. परंतु, अचानक मोठे वादळ आले आणि नाव पाण्यामध्ये बुडू लागली. तिघेही भगवंताचा धावा करू लागले. भगवान तिथे प्रकट झाले व तिघांकडेही पाहून भगवान म्हणाले की, मी कोणाही एकाला वाचवितो, बोला कोणाला वाचवू? त्यातील दोघे म्हणू लागले, देवा मला वाचवा. परंतु, तिसरा एका कडेला शांत बसलेला होता. भगवंतांनी त्याला विचारले, ‘तू काहीच बोलत नाही, तू सांग ना कोणाला वाचवायचे’, तो मनुष्य म्हणू लागला, ‘देवा मी ज्याला वाचव म्हणेन त्याला वाचवशील?’, देव म्हणाला, ‘हो वाचवेन’, सांग कोणाला वाचवायचे? तो मनुष्य म्हणाला, ‘देवा वाचवायचे असेल तर ‘वाचव मानवाला’!या कथेमध्ये इतर भाग जरी काल्पनिक असला तरी ‘वाचव मानवाला’ ही मात्र वस्तुस्थिती आहे. मानवाचे जीवन हे त्याच्या बाह्य संपत्तीवरून श्रेष्ठ ठरत नसून त्याच्या आंतरिक संपत्तीवरून श्रेष्ठ ठरत असते. त्या आंतरिक संपत्तीलाच संत ज्ञानेश्वर महाराजांनी दैवी संपत्ती असे म्हटले आहे. आंतरिक संपत्तीला सोडून मिळविलेली बाह्य संपत्ती ही मानवाच्या सुखाला कारण होऊ शकत नाही. बऱ्याच वेळा मनुष्य बाह्य संपत्तीने मोठा झाला की तो आपण मनुष्य आहोत, हेच विसरून जातो आणि मानवाचा दानव होतो आणि म्हणूनच मानव कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असला तरी त्याच्या मानवी जीवनाला अध्यात्म्याचा स्पर्श असावा, त्याचे ‘मन’ हे सत्वगुणी असावे, असे झाले तर संत निळोबाराय म्हणतात तसे,‘तनु मानवी दिव्य रुपीच केली।’ही अवस्था प्राप्त होईल.