शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मग कसं.. दादा म्हणतील तसं !.. पण कोणते दादा ? दादागिरी !

By सचिन जवळकोटे | Published: February 03, 2019 6:50 AM

‘परिवर्तनाचा निर्धार’ करू पाहणाºया ‘घड्याळ’वाल्यांच्या स्टेजवर ‘थोरले दादा अकलूजकर’ बोलण्यासाठी उठू लागले, तेव्हा ‘धाकटे दादा बारामतीकर’ यांनी पटकन् माईक ...

‘परिवर्तनाचा निर्धार’ करू पाहणाºया ‘घड्याळ’वाल्यांच्या स्टेजवर ‘थोरले दादा अकलूजकर’ बोलण्यासाठी उठू लागले, तेव्हा ‘धाकटे दादा बारामतीकर’ यांनी पटकन् माईक ताब्यात घेतला. ‘अकलूजकरांनी बोलू नये’, अशी बारामतीकरांची इच्छा असेल तर ती वर्षानुवर्षे पूर्ण होतच आलेली की... कारण थोरले दादा मनातलं घडाघडा बोलल्याचं कधीच ऐकिवात नाही. मग कदाचित ‘अकलूजकरांनी उभारू नये’, अशी स्ट्रॅटेजीच असेल तर मात्र लगाव बत्ती... याच पार्श्वभूमीवर अकलूजचे विजयदादा अन् माढ्याचे बबनदादा एकत्र आले, परंतु वेळ निघून गेल्यावर... कारण तोपर्यंत साता-याच्या प्रभाकर आॅफिसरांची सोलापुरात एन्ट्री झालेली की हो... त्याच राजकीय ‘दादा’गिरीची ही अनोखी कहाणी !

दोन राजे’ एकत्र येऊ शकतात...... मग दोन ‘दादा’ का नाही येत ?

सोलापूर म्हणजे ‘दादा’ मंडळींचं गाव, अशी एक बाहेर चर्चा. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ‘दादा’ लोकांनीच राजकारण भरून गेलेलं. भारून गेलेलं, असा एकही तालुका नसावा की, जिथं ‘दादा’ नामक नेत्याचं राजकारण चाललं नसावं. अकलूजच्या ‘थोरल्या दादां’चं साम्राज्य तर जिल्ह्यावर अनेक दशकं राहिलेलं. मात्र, ‘अकलूजची गढी’ सोडून ‘निमगावचा वाडा’ जेव्हा थोरले काका बारामतीकर ‘लाईक’ करू लागले, तेव्हापासून जिल्ह्याच्या राजकारणात वेगवेगळ्या ‘कॉमेंट्स’ पडू लागल्या. त्यानंतर ‘थोरले दादा निमगावकर’ यांचंही बस्तान माढा तालुक्यात मजबूत होत गेलं. आता तर याच ‘बबनदादां’नी मशागत केलेल्या माढा-करमाळ्याच्या रानात ‘संजय मामां’ची ‘साखर’पेरणी सुरू. या दोन्ही साखर सम्राटांना साखर चालत नसली तरी गोड बोलण्यातून त्यांनी जनमानसावर चांगलीच पकड निर्माण केलेली.  घड्याळ पार्टीच्या ‘निर्धार’ यात्रेत ‘विजयदादा’ अन् ‘बबनदादा’ खूप वर्षांनी एकत्र आले, हे ‘परिवर्तन’ही नसे थोडके. आजकाल ‘माण’च्या ‘प्रभाकर आॅफिसरां’पेक्षा ‘माढ्या’चे ‘बबनदादा’ परवडले, असंही असू शकतं कदाचित. दगडापेक्षा वीट मऊ. राजकारणात असंच असतं. चार वर्षे दहा महिने केवळ एकमेकांची पाठच माहीत असणारी नेतेमंडळी शेवटच्या दोन महिन्यांत एकमेकांच्या चष्म्याचा नंबरही ओळखू लागतात. हाही असावा वयोमानानुसार काचेच्या वाढलेल्या अनुभवी नंबरचा परिपाक. खरं तर, तिकडं साता-याचे दोन ‘राजे’ बारामतीकरांच्या गाडीत एकत्र येऊ शकतात, मग इकडं सोलापूरचे दोन ‘दादा’ का नाही, असाही सवाल विचारला जातोय... पण त्यासाठी म्हणे बारामतीकरांच्या गाडीची इच्छाही हवी ना ? लगाव बत्ती... 

  या ‘निर्धार’ यात्रेत दोन दादांचं एकत्र येणं जेवढं चर्चिलं गेलं, त्याहीपेक्षा जास्त ‘प्रभाकर आॅफिसरां’ची स्टेजवरची वर्दळ अधिक लक्षवेधी ठरली. फलटणपासून पंढरपूरपर्यंत लोधवड्याचे देशमुख कसं परळीच्या ‘धनुदादां’सोबत रुबाबात फिरले. मात्र, संध्याकाळी अकलूजच्या कार्यक्रमात यायला त्यांनी पद्धतशीरपणे टाळलं. जंगलभर ढोल पिटविताना सिंहांच्या गुहेत मात्र विनाकारण हात घालायचा नसतो, असाही मुरब्बी विचार त्यांनी केला असावा. बारामतीकरांच्या तालमीत कार्यकर्तेच नव्हे तर अधिकारीही तयार होतात, हा अनुभव नवाच.

फलटणच्या सभेत ‘विजयदादा’ बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांना बोलू न देता ‘अजितदादां’नीच माईक ताब्यात घेतला. लगेच समोरच्या ‘मॉब’मध्ये चर्चा रंगली. हे पाहून ‘इस्लामपूरच्या पाटलां’नी शेवटी आभाराचं भाषण ‘विजयदादां’ना दिलं. तिथंही पुन्हा खुसपुस पिकली... कारण माढा मतदारसंघातील मतदारांचे ‘आभार’ मानण्यासाठीच दादांना पद्धतशीरपणे पुढं करण्यात आलं, असंही काही लोकांना वाटलं. जाऊ द्या सोडाऽऽ लोक काय काहीही बोलतात. तिकीट मिळालं तर ओरडतात, नाही मिळालं तर रडतात. फक्त ‘विजयदादां’ची ऐनवेळची भूमिका काय असणार, हे अकलूजच्या जनतेला समजायला हवं... कारण ‘त्यांचा निर्धार पक्का’ असं तेच होमपीचवर म्हणालेले. आता हा कसला नवा निर्धार हे ‘रणजितदादां’नाच विचारायला हवं. कारण ‘विजयदादा’ तर म्हणे कधी मनातलं घडाघडा बोलतच नाहीत.. अन् ऐनवेळी धाडसी निर्णय घ्यायला ‘रणजितदादा’ मागंपुढं पाहत नाहीत. लगाव बत्ती...

दादा’ असतील तर ‘मामा’ उभारणार..... पण देशमुखांशी कोण झगडणार ?

  सध्या सर्वाधिक नेत्यांचं लक्ष माढा मतदारसंघावरच.. कारण ‘थोरले काका बारामतीकर’ जोपर्यंत आपलं गुपित ओपन करत नाहीत, तोपर्यंत विरोधकांनाही आपला हुकुमी पत्ता टाकता येईनासा झालाय. तरीही ‘सुभाषबापूं’नी दोन खमके पर्याय म्हणे तयार केलेत. अकलूजला बारामतीचं तिकीट मिळालं तर ‘संजय मामां’नाच घोड्यावर बसविण्याचा घाट या ‘कमळ’वाल्यांनी घातलाय... अन् ‘प्रभाकर आॅफिसरां’चं नाव निश्चित झालं तर थेट अकलूजकरांनाच कमळांचा गुच्छ देऊन मैदानात उतरविण्याचाही प्लॅन आखला गेलाय... कारण ‘बापूं’ची म्हणे स्वत:साठी पुन्हा माढ्याच्या शिवारात रानोमाळ भटकण्याची बिलकूल इच्छा नाही. त्यांना माढा-माणदेशातल्या माळरानापेक्षा भंडारकवठ्याची साखर गोड वाटतेय. म्हणूनच की काय, त्यांनी ‘दक्षिण’मध्ये हुरडा खात फिरणाºया सुशीलकुमारांना हटकण्याचा प्रयत्न केलाय.

दिलीप मालकां’ऐवजी ‘सुभाषबापूं’नासुशीलकुमारांचा हुरडा का झोंबला ? खरं तर, सुशीलकुमारांची ‘दक्षिण स्वारी’ वडाळ्याच्या ‘सुभाषबापूं’पेक्षा कुमठ्याच्या ‘दिलीप मालकां’ना अधिक अस्वस्थ करणारी. गेल्या दहा वर्षांत या भागात सुशीलकुमारांना घेऊन ते स्वत: कधी फिरल्याचं आम्ही पाहिलं नाही, असं त्यांचेच कार्यकर्ते खासगीत कौतुकानं (!) सांगतात. अशावेळी जुन्या मंडळींसोबत गावोगावी परस्पर हुरड्याचा धुरळा पद्धतशीरपणे उडविला जातोय. त्यात पुन्हा शेळकेंची चटणी, शिवदारेंचं वांगं, म्हेत्रेंचा गूळ अन् हसापुरेंची राजाराणी सोबतीला. पण तोंड कडवट होऊनही बिच्चारे ‘दिलीप मालक’ तरी काय करणार ? ... कारण त्यांना पाठविलंय ‘विजू मालकां’च्या ‘उत्तर’ टापूत राखणीसाठी. तेही कुणाच्या सोबतीला? अक्कलकोटचे ‘सिद्धूअण्णा’, वळसंगचे ‘राजूअण्णा’ अन् कसब्यातले ‘प्रकाशअण्णा’.. आता या तिघांची ‘इग येनू माडादू ?’ ही सांकेतिक भाषा मालकांना समजेपर्यंत ‘दक्षिण’मध्ये सुशीलकुमारांचं ‘नमस्कार रीऽऽ चमत्कार रीऽऽ’ही परस्पर झालेलं. जाता-जाता : शहराध्यक्षपदाची जबाबदारी गळ्यात पडल्यापासून ‘प्रकाशअण्णा’ म्हणे भलतेच भांबावलेत. कारण पक्ष चालवणं हे थेटराजवळचं हॉटेल चालविण्याइतकं सोप्पं नाही, हे त्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळंच नेहमी गल्ल्यावर बंडलं मोजायची सवय झालेले हे ‘हात’वाले आजकाल ‘जनवात्सल्य’वरही सारखं-सारखं ‘पक्षखर्चा’ची मागणी करू लागलेत. त्यामुळं सध्या सत्तेपासून दूर असलेले त्यांचे नेतेही पुरते कंटाळलेत. पडला का डोक्यात प्रकाश ?..लगाव बत्ती !

- सचिन जवळकोटे,( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस