शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

जुने भाजपावाले म्हणून किती लाड करायचे?

By अतुल कुलकर्णी | Updated: November 28, 2017 00:32 IST

छगन भुजबळ यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे प्रसाद लाड यांना भाजपाने आमदारकी देऊ केली. नारायण राणे यांची सोय लावणे बाकी आहे. पक्ष वाढीसाठी हे सगळे करावे लागते. पण जुन्या मानसिकतेच्या भाजपावाल्यांना हे कळत कसे नाही ! ‘पार्टी विथ अ डिफरन्स’चा अर्थच कळला नाही या जुन्या भाजपावाल्यांना...

छगन भुजबळांचे खंदे समर्थक असणाºया व राष्ट्रवादीची सत्ता जाताच सत्तापक्षात प्रवेश करणा-या प्रसाद लाड यांना भाजपाने विधान परिषदेचे तिकीट दिले. यात काय चूक? उगाच आम्ही वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करतोय, असे सांगत एकाच पक्षात अनेक वर्षे चिटकून राहणा-यांनी एकदम संताप करण्याचे कारण नाही. सत्ता वाढवण्यासाठी हे करावेच लागते. पण सतत बौद्धिक चर्चेत अडकलेल्या पक्ष प्रवक्त्यांना या गोष्टी नाही कळणार.शंभर वर्षाच्या काँग्रेसला संपवायचे तर या गोष्टी कराव्या लागणार. काहीही देण्याची वेळ आली की यांना वाटते ‘मीच लाभार्थी...!’ एवढे ‘लाड’ नाही जमणार! बरं काही द्यायचे ठरवले तरी एकाही प्रवक्त्याची ना एसआरए योजना ना धनसंचय करण्याची क्षमता. यांना साधे मुख्यमंत्र्यांच्या मागेपुढेही करता येत नाही. मात्र दुसºयांना काही दिले की हे रुसतात. पक्ष वाढीसाठी काँग्रेसच्या आर.एन. सिंह यांना आमदारकी दिली. त्यामुळे उत्तर भारतीयांच्या मनात भाजपाबद्दल आदर वाढला. मनसे संपवायची म्हणून प्रवीण दरेकरांना पक्षात घेऊन आमदारकी दिली तर हेच जुने भाजपावाले म्हणतात, मुंबै बँकेच्या भानगडी लपवायच्या म्हणून दरेकर भाजपात आले. त्याचा काय संबंध त्यात? नागपूरचे मूळ काँग्रेसी, नंतर अपक्ष नगरसेवक म्हणून काम करणारे परिणय फुके यांना भाजपात घेऊन आमदारकी दिली पण त्याचेही कौतुक नाही. आता ते किती कामे करून घेतात, याकडेच सगळ्यांचे लक्ष...! कधीकाळी काँग्रेसमध्ये असणाºया मुन्ना यादवना भाजपात घेऊन असंघटित कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्षपद दिले. या मंडळाकडे सात हजार कोटी रुपये आहेत. त्यातून ते कामगारांचे कल्याण करतील शिवाय नागपुरात काँग्रेस कमकुवत करतील. असा दुहेरी विचार करणाºयांवर टीका होते. जुन्या भाजपावाल्यांचे वय वाढले तसे विचारही जुने होत चाललेत. विधिमंडळातून निवृत्त झालेले गोपाळ दळवी पक्ष कार्यालय मंत्री म्हणून काम पाहात होते. त्यांना सिध्दीविनायक ट्रस्टचे सदस्यत्व दिले तर बिघडले कुठे? तर जुने भाजपावाले म्हणतात, त्यांनी पक्षासाठी काय केले? भाजपाने शिवसेनेचाही विचार केला. पुण्याचे बिल्डर विशाल चोरडियांना शिवसेनेने पक्षात घेताच खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्षपद दिले. तर जुने भाजपावाले म्हणतात, आणखी डझनभर महामंडळे रिकामी का ठेवली. तीन वर्षे लागतात का भरायला? यांना कसे सांगणार, पक्ष वाढीसाठी बाहेरून पक्षात येणाºयांसाठी अशी मंडळ रिकामी ठेवावी लागतात.माजी आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित, ज्यांच्या काळात नांदेड, परभणीच्या जिल्हा बँका अडचणीत आल्या ते काँग्रेसचे भास्करराव खतगावकर व राष्टÑवादीचे रामप्रसाद बोर्डीकर यांना पक्षात घेऊन त्यांच्या जिल्ह्यात भाजपा वाढवण्याचे काम केले ना. माधव भांडारी हे संघाचे काम करणाºया व्ही.सतीश यांचे मेहुणे. त्यांचे वडील संघाचे कट्टर; म्हणून का त्यांना आमदारकी द्यायची का? केशव उपाध्येंना प्रवक्तेपद दिले ना... यापेक्षा जास्त काय देणार? प्रसाद लाड यांचा अर्ज भरताना नक्की हजर राहा, असा निरोप दिलाच होता की सगळ्यांना. अजून नारायण राणेंची सोय लावायची चिंता असताना हे मधेच लुडबूड करू लागले तर पक्ष कसा वाढणार?सध्या राजकीय फेरीवाल्यांचे दिवस चांगले आहेत असे बाळा नांदगावकर म्हणाले. यांच्या हातगाडीवर माल नाही म्हणून कुणी जात नाही त्यांच्याकडे. आपल्यासारख्या फेरीवाल्यांना दारोदार माल विकावा लागतो. भाजपाने किमान कौशल्य विभागाला गती दिलीय. पक्षाकडे एवढे प्रवक्ते. पण एकाकडेही लाडाने माध्यमांना कसे हाताळावे याचे किमान कौशल्यसुध्दा नाही. त्यांनी आता लाडांकडून प्रसादरुपी क्लास घ्यायला हरकत नाही.जाता जाता : चांगली स्कॉच किंवा व्हिस्की बनविण्यासाठी मळीच वापरावी लागते. या विधानाचा तसा संबंध नाही. kkatual@gmail.com

टॅग्स :Prasad Ladप्रसाद लाडBJPभाजपा