शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

'रोज किती तास स्क्रीन पाहता?' आजी-आजोबांनाही हा प्रश्न विचारायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 13:00 IST

स्क्रीनचं व्यसन जडलेल्या नातवंडांची काळजी अख्ख्या जगाला पडली आहे; पण आता त्या मुलांच्या आजी-आजोबांनाही हा प्रश्न विचारायला हवा!

सुखदा परवा खूप दिवसांनी भेटली. सु तिचे आईबाबा तिच्याबरोबर राहतात. 'आईबाबा काय म्हणतात?' असं विचारलं तेव्हा सुखदा जे म्हणाली, ते तिच्या पिढीतल्या बऱ्याच मुलामुलींचं उत्तर आणि अनुभव आहे. सुखदा म्हणाली, 'आईबाबा हल्ली काहीही म्हणत नाहीत, बोलत नाहीत, बोललेलं ऐकतही नाहीत. बघावं तेव्हा दोघं मोबाइलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. मोबाइल हातात नसतो तेव्हा डोळ्यांसमोर मोठ्या आवाजात टीव्ही सुरू असतो. 

एखादा प्रश्न तीन-तीनदा विचारल्याशिवाय त्याचं उत्तर मिळत नाही... डायनिंग टेबलावर हात वाळेपर्यंत गप्पा वगैरे गोष्टी आता जणू इतिहासजमाच झाल्या आहेत. सारखं काय त्या मोबाइलमध्ये? जरा बोला की घरातल्यांशी पण... असं म्हटलं की वादाला एक निमित्त!'

थोडीशी अशीच तक्रार अनिलचीही आहे. त्याच्या आईच्या खोलीतला टीव्ही सकाळी उठल्यापासून सुरू असतो. मुलगा, सून, नातवंडं कुणाशीही आईचा संवाद नाही. आपण बरं, आपला टीव्ही बरा... रात्री झोपताना मोबाइलवर स्क्रोलिंग करत राहते. बाहेर जा, मैत्रिणींना भेट, नातेवाइकांना बोलव असं काही म्हटलं तरी तिचा प्रतिसाद शून्य.... पूर्वी तिला वाचनाची आवड होती, स्वयंपाकघरात चार नवीन प्रकार करून बघायची हौस होती; पण, आता टीव्ही एके टीव्ही !

सध्या अनेक घरांमधल्या मध्यमवयीन मुला-सुनांची, लेक-जावयांची हीच कहाणी आहे त्यांचे आईवडील, सासू-सासरे सगळेच कुठल्या ना कुठल्या स्क्रीनला दिवसभर डोळे चिकटवून बसलेले असतात. हे असं का?

वाढलेलं आयुर्मान हे पहिलं कारण... बहुतेक मध्यम आणि उच्चमध्यमवर्गीय घरांमध्ये मदतनीस असतातच. ज्येष्ठ नागरिकांवर जबाबदाऱ्या नाहीत आणि हाताला काम नाही. मग, काय करायचं? - तर स्क्रीन पाहायचा! ज्या घरांमध्ये अजूनही एकत्र कुटुंब आहे तिथे उरलेल्या दोन पिढ्या आपापल्या नोकरीधंद्यासाठी, शिक्षणासाठी दिवसभर घराबाहेर पडतात... मग, ज्येष्ठांनी काय करायचं? - याचं उत्तर हाताशी असलेला स्मार्ट फोन आणि टीव्ही.

स्मार्ट फोनपूर्व काळात हे ज्येष्ठ नागरिक काय करीत? - वाहतुकीची भीती न बाळगता बाहेर फेरफटका मारणं सोपं होतं. असुरक्षितता तुलनेनं फारच कमी होती. घरात करण्यासारखी कामंही खूप होती. वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न नव्हता. आयुष्य एकसुरी, संथ आणि कंटाळवाणं असणं हे काहीसं गृहीत होतं... ते तसं असण्याबद्दल तक्रारी नव्हत्या. पण, मोबाइल स्क्रीन हाती आले आणि परिस्थिती झपाट्याने बदलली. व्हॉट्सअॅप वापरायला अत्यंत सोपं, फेसबुकपण जमायला लागतंच, यू-ट्यूबवर तर मनोरंजनाचा मोफत खजिना, त्यात अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स... 

मित्र-मैत्रिणींना फोन, मेसेजेस, फॉरवर्ड आणि गुड मॉर्निंग-गुड नाइटच्या खेळाची झिंग - हे सारं सर्वांच्याच मेंदूला गुंगवून टाकणारं आहे... हाताशी वेळच वेळ असलेले ज्येष्ठ त्या गुंगीतून कसे वाचतील? वापरणाऱ्याचा वेळ चांगला जावा, त्यातून त्यांना काहीतरी 'मिळावं' हा व्हर्चुअल माध्यमांच्या निर्मितीमागचा उद्देश नाही. जो 'आत' शिरतो, त्याला बाहेर पडताच येऊ नये यावर तर त्या जगात कोट्यवधींची उलाढाल होऊ शकते. 

पेपर वाचून संपतो. सिनेमा बघून संपतो. संपल्यावर मेंदूला 'स्टॉप क्लू' मिळतो; मग, मेंदू दुसऱ्या गोष्टींकडे वळतो. व्हर्चुअल जगात असा 'स्टॉप क्लू' मेंदूला मिळू नये अशी तजवीजच असते. त्यासाठी मग अॅक्सेसिबिलिटी, व्हॉल्यूम, पोटन्सी आणि नॉव्हेल्टी अशा चार निकषांवर बांधलेलं प्रॉडक्ट हातातल्या स्क्रीनवर येतं. बरं, ज्येष्ठांच्या हाती असलेल्या वेळाकडे आता 'प्रॉडक्टिव्ह मॅन अवर्स' म्हणूनही पाहिलं जात नाही, त्यामुळे ते त्या वेळाचं काय करतात याकडेही कुणाचं लक्ष नाही.

झोप न येणं, ऐकू न येणं, हाताला मुंग्या येणं, हाडं झिजणं, कुणाशीही संवाद नसणं, चिडचिड होणं हे प्रश्न ज्येष्ठांमध्ये दिसले की मुलं त्यांना डॉक्टरांकडे नेतात. विविध चाचण्या, गरजेच्या जीवनसत्त्वांची कमरतरता, एखाद्या संभाव्य आजाराची सुरुवात म्हणून या लक्षणांकडे पाहिलं जातं. पण, 'किती तास स्क्रीन पाहता?' हा प्रश्न मात्र डॉक्टर्सही अजून विचारताना दिसत नाहीत. तो प्रश्न आता आजी-आजोबांनाही विचारायला हवा.

डॉ शिरिषा साठे (मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक)shirisha1964@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Are grandparents spending too much time on screens? Ask them!

Web Summary : Many elders spend hours glued to screens due to increased lifespan and lack of responsibilities. This excessive screen time leads to isolation, irritability, and health issues. Doctors should ask seniors about their screen usage.
टॅग्स :MobileमोबाइलLifestyleलाइफस्टाइलSocial Mediaसोशल मीडियाSocialसामाजिक