छाननीच्या धोक्याची तपासणी कशी करावी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 04:37 AM2019-09-16T04:37:03+5:302019-09-16T04:42:26+5:30

कृष्णा, इन्कम टॅक्स आॅडिटची अखेरची तारीख ३0 सप्टेंबर आहे आणि सर्व करदाते आयकर रिपोर्टला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत,

How to investigate the threat of scrutiny? | छाननीच्या धोक्याची तपासणी कशी करावी?

छाननीच्या धोक्याची तपासणी कशी करावी?

Next

- उमेश शर्मा । सीए
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, इन्कम टॅक्स आॅडिटची अखेरची तारीख ३0 सप्टेंबर आहे आणि सर्व करदाते आयकर रिपोर्टला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत, तर छाननीच्या धोक्याची तपासणी करदात्याने कशी करावी?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, आयकर विवरणपत्र भरताना करदात्याने लक्षपूर्वक काळजी घ्यावी आणि टॅक्स आॅडिट रिपोर्ट दाखल करतानासुद्धा लक्षपूर्वक माहिती द्यावी. दोन कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यास हा नियम लागू होतो. नुकतेच आयकर विभागाकडून कॉम्प्यूटराइज असेसमेंट आणि छाननीचे धोरण लागू करण्यात आले आहे.
अर्जुन : कृष्णा, टॅक्स आॅडिट रिपोर्ट भरताना छाननीच्या धोक्याची तपासणी कशी करावी?
कृष्ण : अर्जुना, करदात्यांनी आयकर लेखा परीक्षण आणि आयकर रिटर्न भरताना खालील काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.
च्फॉर्म २६ एएसमध्ये दाखवलेल्या रिसिप्ट अथवा टीडीएस आणि खात्यांमधील रिसिप्ट्स/टीडीएसशी अचूक जुळले पाहिजेत. तीच माहिती आयटीआरमध्ये अचूक दर्शवली पाहिजे. आयटीआर आणि २६ एएसमध्ये दिलेल्या तपशिलांमध्ये काही जुळत नसल्यास अशा गैरसमजुतीबद्दल एखाद्यास नोटीस प्राप्त होऊ शकते.
आयटीआरमध्ये जीएसटी उलाढालीची माहिती देणे आवश्यक आहे, परंतु जीएसटीची उलाढाल आणि पुस्तकानुसार उलाढाल जुळत नसेल तर एखाद्याला नोटिसीला उत्तर द्यावे लागेल. करदात्यांनी उलाढालीतील फरकांचा तपशील नोंदवून ठेवावा.
आयटीआरमध्ये माहिती देताना करदात्यांना स्वतंत्रपणे ट्रेडिंग आणि मॅन्यूफॅक्चरिंग खाते सादर करावे लागेल. ही एक नवीन माहिती देण्याची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारे जर चालू वर्षाचे ग्रॉस प्रॉॅफिट/नेट प्रॉॅफिट प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत खूप कमी झाले तर एखाद्याला त्या नोटिसीचा सामना करावा लागू शकतो.

खात्याच्या पुस्तकात आणि आयसीडीअनुसार नफ्यात तफावत झाल्यास किंवा त्याची योग्य माहिती न दिल्यास त्यास नोटीस प्राप्त होऊ शकते.
आयटीआरमध्ये इतर खर्चाची रक्कम देताना इतर खर्चांमध्ये जास्त रक्कम नोंदविल्यास कर अधिकारी अशा प्रकारच्या खर्चाच्या प्रकाराबद्दल प्रश्न विचारू शकतात.
जर करदात्याने कर माफ उत्पन्नाच्या संपत्तीत गुंतवणूक केली असेल तर करदात्याने आयकर कायदा १९६१ च्या कलम १४ (अ)अनुसार खर्च वजावटीची काळजी घ्यावी.
आयकर लेखापरीक्षण अहवालाच्या कलम २३ मध्ये करदात्याने संबंधित नातेवाइकांना दिलेल्या खर्चाचा तपशील सादर करावा लागतो. मागील वर्षाच्या तुलनेत संबंधित व्यक्तींना दिलेली देय रक्कम जास्त प्रमाणात कमी झाल्यास एखाद्याला नोटीस येऊ शकते.
प्राप्तिकर लेखापरीक्षण अहवालाच्या कलम ३१ मध्ये करदात्यास असुरक्षित कर्जाची माहिती द्यावी लागेल. मागील वर्षाच्या तुलनेत रक्कम जास्त प्रमाणात कमी-जास्त झाल्यास करदात्याने याची काळजी घेतली पाहिजे.
च्व्यवसायाचा कोड आयटीआरमध्ये योग्यरीत्या नमूद केलेला असावा आणि नफा व तोटा खात्यात नोंदविल्यानुसार उत्पनाशी व्यवसायाचा कोड जुळत नसल्यास नोटिसीचा सामना करावा लागेल.
३१ मार्चनंतर भरलेल्या विविध कायद्याच्या कराची पावती ज्याचा अहवाल कायदा ४३(ब) नुसार ठेवला पाहिजे. करदात्यास केलेल्या कर भरणाचा तपशील देण्यास पुढे सांगितले जाऊ शकते.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, मोठ्या करदात्यांकडे अद्याप टॅक्स आॅडिट रिपोर्ट आणि आयकर रिटर्न देण्यास वेळ आहे. म्हणून वरील मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत. छाननीत, एकदा अडकल्यास त्यातून सुटणे कठीण होते. म्हणून योग्य काळजी घेतली पाहिजे.

Web Title: How to investigate the threat of scrutiny?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.